29/04/2026
🐦 Jungle Babbler | सातभाई – निसर्गातील गप्पिष्ट मित्र! 🌿
🔸 नाव आणि ओळख:
Jungle Babbler म्हणजेच आपला ‘सातभाई’. हे पक्षी सहसा ६ ते १० च्या समूहात राहतात, म्हणून त्यांना Seven Sisters असेही म्हणतात.
🔸 स्वरूप:
राखाडी-तपकिरी रंग, लांब शेपटी आणि पिवळसर डोळे — साधे पण खूपच आकर्षक!
🔸 स्वभाव:
अत्यंत सामाजिक आणि सतत गोंधळ घालणारे 😄
एक पक्षी टेहळणी करत असतो, तर बाकीचे जमिनीवर खाद्य शोधतात — परफेक्ट teamwork!
🔸 आहार:
कीटक, वाळवी, अळ्या, धान्याचे दाणे, लहान फळे आणि फुलांतील मध.
🔸 घरटे आणि प्रजनन:
दाट झुडपात किंवा झाडावर काटक्यांचे वाटीसारखे घरटे.
मादी फिकट निळ्या रंगाची अंडी घालते.
🔸 स्थानिक नावे:
कोकणात केकाटी, भोलुगड्या, चिकाटी; तर काही ठिकाणी रानभाई, केकाट्या अशीही नावे.
🔸 महत्त्व:
शेतातील किडे खात असल्यामुळे शेतकऱ्यांचे खरे मित्र! 🌾
✨ असा सुंदर निसर्ग, पक्ष्यांचा गोड आवाज आणि शांत वातावरण अनुभवायचंय?
तर एकदा नक्की या SAKA Kadam’s Homestay, गुहागर