Viraj Garden Resort & Banquet Hall

Viraj Garden Resort & Banquet Hall Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Viraj Garden Resort & Banquet Hall, Hotel, VIRAJ GARDEN RESTAURANT AT PO-PAUD, KONDAWAE, TALMULSHI, PUNE, Pune.

अजेय योद्धा, प्रजाप्रीय राजा, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या  जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #महाराणाप्रताप
22/05/2023

अजेय योद्धा, प्रजाप्रीय राजा, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

#महाराणाप्रताप

भारताचे माजी पंतप्रधान, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे प्रणेते आणि आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न राजीव गांधी यांच्य...
21/05/2023

भारताचे माजी पंतप्रधान, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे प्रणेते आणि आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

#राजीवगांधी

अखंड मानवतेसाठी नाते जपूया... दूरसंचारच्या माध्यमातून जगाशी संपर्क साधूया...जागतिक दूरसंचार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक...
17/05/2023

अखंड मानवतेसाठी नाते जपूया...
दूरसंचारच्या माध्यमातून जगाशी संपर्क साधूया...

जागतिक दूरसंचार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

#जागतिकदूरसंचारदिन

योगी पावन मनाचा | साहे अपराध जनाचा ।। विश्व रागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी । |शब्दशस्त्रे झाले क्लेश। संती माना...
14/05/2023

योगी पावन मनाचा | साहे अपराध जनाचा ।।
विश्व रागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी । |

शब्दशस्त्रे झाले क्लेश। संती मानावा उपदेश ।।
विश्वपट ब्रह्मदोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।

थोर मराठी संत कवयित्री मुक्ताबाई यांच्या अभंगांनी समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम केले. अध्यात्म आणि साक्षात्कार या दोन्हींचा संगम यांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून लोकांसमोर मांडला. अश्या या संत कवयित्री मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

#संतमुक्ताबाई

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते |यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि ||वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षांचे असल्यापास...
14/05/2023

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते |
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि ||

वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षांचे असल्यापासून नियतीने धाडलेल्या प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जाऊन खासा दिल्लीपती औरंग्याला सगळा लवाजमा सोबत घेऊन दिल्ली सोडायला लावणारे आणि शत्रूंना नामोहरम करत स्वराज्याची धुरा समर्थपणे पेलणारे शिवपुत्र व स्वराज्याचे दुसरे छत्रपती...शंभूराजे

संस्कृतपंडित, बुधभूषणकार, स्वराज्याचे धाकले धनी,धर्मवीर स्वराज्यरक्षक शिवपुत्र छत्रपती शंभूराजे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दाही दिशेला उजळणाऱ्या लखलखत्या पराक्रमास विनम्र अभिवादन !

#छत्रपतीसंभाजीमहाराज

मातृदिनकधी मायेची ऊब तर कधी प्रेमाची शितलता असते आई..कधी गुरू, कधी मैत्रीण तर कधी जीवनाचा आधार असते आई..जागतिक मातृदिनाच...
14/05/2023

मातृदिन

कधी मायेची ऊब तर
कधी प्रेमाची शितलता असते आई..
कधी गुरू, कधी मैत्रीण तर
कधी जीवनाचा आधार असते आई..

जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा..!

#मातृदिन

सलाम तुमच्या निस्वार्थ सेवेला...निस्वार्थ भावनेने रुग्णांची सेवा करणाऱ्या सर्व परिचारिका भगिनींच्या कार्याला सलाम आणि पर...
12/05/2023

सलाम तुमच्या निस्वार्थ सेवेला...

निस्वार्थ भावनेने रुग्णांची सेवा करणाऱ्या सर्व परिचारिका भगिनींच्या कार्याला सलाम आणि परिचारिका दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!

#परिचारिकादिन

तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य बदललेले आहे. अवजारे, यंत्रे, त्यांपासून बनलेल्या प्रणाल्या यांची निर्मिती आणि उपायोजना अभ्य...
11/05/2023

तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य बदललेले आहे. अवजारे, यंत्रे, त्यांपासून बनलेल्या प्रणाल्या यांची निर्मिती आणि उपायोजना अभ्यासणारी, तसेच त्यांत सुधारणा घडवून आणण्यासंबंधीची विद्याशाखा म्हणून तंत्रज्ञानाचे महत्व अनमोल आहे.

पूर्वीच्या काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास करत आला आहे. तंत्रज्ञान विकासनामुळेच मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर बनले आहे.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त सर्वांना तंत्रज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

#राष्ट्रीयतंत्रज्ञानदिन

"शिक्षण हेच कर्म आणि समाजसेवा हाच धर्म"गरिबांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्य...
09/05/2023

"शिक्षण हेच कर्म आणि समाजसेवा हाच धर्म"

गरिबांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

#कर्मवीरभाऊरावपाटील

कवी, संगीतकार, गीतकार, चित्रकार, नाटककार, राष्ट्रगीताचे जनक भारत व आशिया मध्ये पहिले नोबेल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टा...
09/05/2023

कवी, संगीतकार, गीतकार, चित्रकार, नाटककार, राष्ट्रगीताचे जनक भारत व आशिया मध्ये पहिले नोबेल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

#रविंद्रनाथटागोर

आदर्शचा तू लोकनायकाधर्मसंस्कृतीचा..अग्रदूत तू समाजपुरुषासमता क्रांतीचा..लोकनायक छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिम...
06/05/2023

आदर्शचा तू लोकनायका
धर्मसंस्कृतीचा..
अग्रदूत तू समाजपुरुषा
समता क्रांतीचा..

लोकनायक छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

#छत्रपतीशाहूमहाराजपुण्यतिथी

लोभाला दानाने, क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, व असत्याला सत्याने जिंकता येते...भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त म...
05/05/2023

लोभाला दानाने, क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचाराने, व असत्याला सत्याने जिंकता येते...

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

#बुद्धपौर्णिमा

Address

VIRAJ GARDEN RESTAURANT AT PO-PAUD, KONDAWAE, TALMULSHI, PUNE
Pune

Telephone

+919922489805

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Viraj Garden Resort & Banquet Hall posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category