06/06/2026
*⭕️🙏विषय - लहान बाळांसाठी 24 तास मोफत (विनामूल्य) दूध व शितूत मम्मम सेवा, रत्नागिरी/कोकण.*(🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻)
*🛑रत्नागिरी गणपतीपुळे रोडलगत* असणाऱ्या आमच्या *"शितूत मिसळ" (🛑 उर्फ मन्याची मिसळ 🛑) ह्या छोट्याशा हॉटेलमध्ये लहान बाळांसाठी मोफत दुधाची आणि मोफत मम्मम सेवा आम्ही सुरू केलेली आहे.*
*🛑 तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये आल्यावर कोणतीही खाण्याची ऑर्डर द्या किंवा नका देऊ, तरीदेखील लहान बाळांना विनामूल्य दूध आणि मम्मम सेवा दिली जाते.*
*🛑 मम्मम सेवेमध्ये- मऊ भात, मेतकूट तूप – वरण – भात, साजूक तुपातील रवा पेज, भरडी इत्यादी सर्व मिळेल आणि फ्रेशचं मिळेल.* आणि हे सर्व लहान बाळाला देण्यापूर्वी मी *स्वतः टेस्ट करून खात्री करूनच देतो,* त्यामुळे, अजिबात काळजी नसावी.
तसेच, लहान बाळांच्या *पातेल्या,भांडी,चमचे, डिश* आणि सर्व साहित्य वेगळे ठेवण्यात आले आहे.
⭕️ *त्यामुळे, गणपतीपुळे "तीर्थक्षेत्र" येथे येताना किंवा त्यारोडवर प्रवास करताना तुमच्या गाडीत जर "लहान बाळ असेल" आणि तुम्ही मला व्हॉट्स अँप 🛑 "शितूत मम्ममचे" रजिस्ट्रेशन करून आगाऊ कळवून ठेवलत की "आमच्या गाडीत लहान बाळ" आहे, तर आम्ही गरम किंवा कोमट तुम्हाला हवी तशी दुधाची बॉटल तुम्ही येईपर्यंत आम्ही तयार ठेवू, आणि तुमच्या गाडीपाशी पण आणून देऊ, कोणतेही चार्जेस घेतले जाणार नाहीत.*
*🛑 पत्ता:-* तरवळ स्टॉप, रत्नागिरी-निवळी-गणपतीपुळे मुख्य रोड.(कोकण/रत्नागिरी). (JSW जिंदाल कंपनी रोड)
🛑 *मो.9421143890.* (फक्त व्हॉटस अँप मेसेजकरिता)
*🛑मो.9075662003.* (फक्त व्हॉट्स अँप मेसेजकरिता).
------------------------------------------------------
*हॉटेलमालक- हृषिकेश उदय शितूत.*
*(ll 🔴शितूत ज्योतिष कार्यालय रत्नागिरी 🔴ll)*
*ZANZANIT SH*TUT MISAL* ह्या नावाने आमचे *📍👉🏻इंस्टाग्राम* अकाउंट आहे. ह्यावर *ज्योतिषचे व बाळसेवेचे* सर्व व्हिडिओ आपल्याला पहायला मिळतील.
------------------------------------------------------
*🙏झणझणीत शितूत मिसळ.🙏*
*(⭕️मन्याची मिसळ⭕️)* (कोकण,रत्नागिरी).
*मिसळची वेळ:- सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत.*
((*दर सोमवारी आणि मंगळवारी बंद.*))
-------------------------------------------------------
*🛑महत्त्वाचे:-* 0 ते 120 ह्या कोणत्याही वयोगटातील कोणत्याही *मतिमंद (दिव्यांग), मूकबधिर, अंध व्यक्तींसाठी व कोणत्याही वयातील कॅन्सर झालेल्या (कॅन्सर पेशंटसाठी)* शितूत मिसळ (⭕️मन्याची मिसळ⭕️) *पूर्णपणे मोफत/विनामूल्य* आहे, त्यांच्या कडून कोणतेही चार्जेस घेतले जात नाहीत.
*📍🛑👉🏻 नवीन बातमी* – लवकरच आपले शितूत मम्मम किचन सुरू होत आहे, लहान बाळाची आई स्वतःच्या घरात जसा अन्नपदार्थ बाळासाठी बनवते आणि खाऊ घालते, सेम तसेच, नवीन सुरू होणाऱ्या शितूत मम्मम किचन मध्ये सर्व सोयी विनामूल्य उपलब्ध असतील. अगदी *गॅस शेगडी पासून चमचा – डिश पर्यंत आणि इंद्रायणी तांदळापासून ते अगदी साजूक तुपापर्यंत...* सर्व साहित्य उपल्ब्ध असेल...*तेही विनामूल्य...* 🛑*श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नावानेच आणि त्यांच्या कृपेमुळेच* ही सेवा लहान बाळांसाठी *100% विनामूल्य सेवा उपलब्ध असेल...*
*(मेसेज अपडेट 14 मे 2026)*
(⭕️imp तळटीप :- *पोलिसांच्या सूचनेनुसार* लहान बाळांच्या सिक्युरिटीसाठी *बाळसेवेचे रजिस्ट्रेशन* आम्ही अनिवार्य करत आहोत. *रजिस्ट्रेशनसाठी *📍शितूत मम्मम फॉर्म भरताना* बाळाच्या आई-वडिलांचा *📍👉🏻🛑आधार कार्ड नंबर व 📍👉🏻🛑गाडी नंबर देणे अनिवार्य, आणि एक फॅमिली फोटो देणे (बाळासह आई-वडिलांचा LIVE फोटो) देणे अनिवार्य आहे.)
कृपया हा मेसेज *सर्व लहान बाळांच्या आई-वडिलांपर्यंत आणि कुटुंबीयांपर्यंत पोहोचवून* मला आणि ह्या बाळ सेवेला मोलाचे सहकार्य करावे. अशी नम्र विनंती.
*♦️🙏श्री स्वामी समर्थ♦️🙏*