Shreeswamikrupasadan

Shreeswamikrupasadan Its basically a Lodge built for all the tourists who visit Shree Swami Samarath Maharaj Mandir

13/05/2022

Video tour of the whole facility

13/05/2022

Video Tour of the whole facility

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी च्य ा निम्मिताने आज आमचा लोगो प्रकाशीत करत आहोत.|| श्री स्वामी समर्थ ||      #स्वामी #स्वामी...
28/04/2022

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी च्य ा निम्मिताने आज आमचा लोगो प्रकाशीत करत आहोत.

|| श्री स्वामी समर्थ ||


#स्वामी #स्वामीसमर्थ

01/01/2022
By the blessings of Shree Swami Samarth Maharaj we complete 7 years today.
05/12/2020

By the blessings of Shree Swami Samarth Maharaj we complete 7 years today.

02/09/2019

Sarvana Ganesh Chaturthichya Hardik Shubhecha

  you a HAPPY INDEPENDENCE DAY..!
15/08/2018

you a HAPPY INDEPENDENCE DAY..!

गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ...!|| जय जय स्वामी समर्थ || #विसावा_भक्तांचा
27/07/2018

गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ...!
|| जय जय स्वामी समर्थ ||

#विसावा_भक्तांचा

Shree Swami Samarth What is Devotion...? #विसावा_भक्तांचा
25/07/2018

Shree Swami Samarth
What is Devotion...?

#विसावा_भक्तांचा

 #अन्नछत्राची_स्थापनाकाही वर्षापूर्वी दत्तस्थान औदुंबर येथुन काही साधुमंडळी स्वामी दर्शनासाठी अक्कलकोट येथे मंदिरात आले ...
24/07/2018

#अन्नछत्राची_स्थापना
काही वर्षापूर्वी दत्तस्थान औदुंबर येथुन काही साधुमंडळी स्वामी दर्शनासाठी अक्कलकोट येथे मंदिरात आले होते. दर्शना नंतर दुपारी भोजनाकरिता त्यांनी प.पु. मोहन पुजारी आणि श्री. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना विचारले. तेव्हा या साधुमंडळीची मोहन पुजारी जन्मेजयराजे भोसले महाराज यांनी भोजन व्यवस्था केली. पण अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र असुन सुद्धा परगांवच्या भाविकांसाठी मोफत महाप्रसादासाठी अन्नछत्र नाही. ही खंत जन्मेजयराजे भोसले महाराज यांना लागुन राहिली. काही दिवसांनी मंदिरामध्ये श्री दत्त आणि श्री जगदंबा भवानी मातेचे फोटो पेंटीग चालले होते. जगदंबेचे पेटींग पहात प.पु. मोहन पुजारी गुरुजी यांनी साक्षात दत्तावतारी श्री. स्वामी समर्थाच्या या पावननगरी मध्ये अन्नछत्र असावे ही कल्पना त्यांनी सन्मा. जन्मेजयराजे भोसले महाराजांना बोलुन दाखवली आणि ही प्रेरणा कल्पना सन्मा. जन्मेजयराजे भोसले महाराजांनी उचलुन धरली व त्याबाबत तेथे उपस्थित भाविकांशी चर्चा केली..
श्री. गुरुपौर्णिमा शुभ मुहर्तावर अन्नछत्र सुरु करावे हे भोसले महाराजांनी मनोमन ठरविले. भोसले राजघराण्यावर श्री स्वामी समर्थाची असीम कृपा दृष्टी होतीच त्यामुळे अन्नदानाचे पुण्यकार्य श्री स्वामी समर्थांनी श्री.जन्मेजयराजे भोसले महाराज यांचेकडून घेतले. अन्नछत्राची व्यवस्थित आखणी करूनश्री. गुरुपोर्णिमा दिवशी सकाळी कांही उत्साही तरुणांना हाताशी धरून श्री. स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे सामुदायिक पारायण करून मंदिर परिसरातील ४५घरी सन्मा. जन्मेजयराजे भोसले महाराजांनी माधुकरी भिक्षा मागितली, ह्या भिक्षेतून मिळालेल्या ३ किलो तांदुळाचा भात शिजवुन त्यांनी श्री. स्वामी समर्थांना महानैवेध दाखविला आणि तेथेच मंदिरात पाच पन्नास स्वामी भक्तांना “महाप्रसाद” वाढला. अशा तऱ्हेने अन्नछत्राची गुरुपोर्णिमा शुभमुहूर्तावर मुहूर्तमेढ रोवली गेली.
२९ जुलै १९८८ श्री गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरु झाले. या अन्नछत्राचे “श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट” असे नामकरण करण्यात आले. शासनदरबारी मान्यता असावी हया उदेशाने हया अन्नछत्र मंडळाचे सुरुवातीस सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यात आले. रेजिस्ट्रेशन नं. २०९४ सोलापूर. हया अन्नछत्राचा विस्तार व्हायला लागला. अन्नदानासाठी परगांवच्या भक्तांच्या देणग्या यायला लागल्याने ट्रस्ट स्थापनाची आवश्यकता भासु लागली. त्यामुळे सन्मा. जन्मेजयराजे भोसले महाराजांनी आपले निकटवर्तीयसंबधीत व सहकारी असलेल्या स्वामीभक्तांना सभासद करून घेऊन पब्लिक ट्रस्ट (सार्वजनिकन्यास) ची नोंदणी केली. (पब्लिक ट्रस्ट नं एफ / २२७९ / सोलापुर दि. २९/११/१९८९). त्या वेळेस या सर्वांनी सन्मा.जन्मेजयराजे भोसले महाराजांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट ह्या नावाने हे धर्मदाय संस्थान कार्यरत झाले. सुरूवातीस दर गुरूवारी अन्नदान सुरू झाले. अल्पावधित दर गुरूवारी व दर रविवारी अन्नदान सुरू झाले. या अन्नछत्राच्या स्वामी कार्यासाठी तसेच परगांवच्या स्वामी भक्तांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन सन्मा. जन्मेजय भोसले महाराजांनी देवस्थानच्या उत्तर महाद्वारालगत असलेल्या जागेत अन्नछत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी थोर साध्वी मातोश्री. अंबुतार्इ खंडेराव सरदेशमुख यांनी या पुण्यकर्मासाठी आपली स्वत:ची जागा अन्नछत्रास देऊ करून अन्नछत्रास मायेच्या ममतेने दिलासा दिला आणि अन्नदानाचे स्वामी कार्य दुप्पट जोराने सुरू झाले. गांवातील स्वामीभक्त असलेल्या कांही मंडळींनी मदतीसाठी हात पुढे केला. त्यामुळे त्यांच्या मदतीने व स्वामी भक्तांच्या मिळालेल्या देणग्यांमधुन ह्या ठिकाणी अन्नछत्रासठी २०० स्वामी भक्त बसतील एवढे मोठे पत्र्याचे शेड उभे करण्यात आले. जानेवारी १९८९ पासुन दैनंदिन एक वेळ अन्नछत्र सुरू झाले, अल्पवधीतच स्वामी भक्तांचा वाढता प्रतिसाद पाहुन दैनंदिन दोन्ही वेळेस अन्नछत्र सुरू झाले. अन्नछत्र आता नवीन जागेवर आणि पूर्वी पेक्षा भव्य असे तयार झाले आहे. सगळी समर्थांची कृपा ...! (source-swamiannacchatra.org)
अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचे अन्नछत्र हे आपल्या “श्री स्वामी कृपा सदन” पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तर मग नक्की या अन्नछत्र पाहायला तसेच दर्शनाला. अन्नछत्र साठी कोणीही भाविक दान धर्म तर करू शकतोच पण स्वामींनी उपदेश केल्याप्रमाणे इथे काही काळासाठी सुद्धा स्वयं प्रेरित “स्वयंसेवक” म्हणून सेवाही करता येते.

या गुरुपोर्णिमेला २७ जुलै रोजी अन्नछत्रास ३० वर्षे पूर्ण होत आहेत तर मग आता निघा दर्शनाला. "श्री स्वामी कृपा सदन" नेहमीच आपल्या सेवेसाठी तत्पर असेल. धन्यवाद!!!

Interior of Shree Swami Krupa Sadan
23/07/2018

Interior of Shree Swami Krupa Sadan

घेता हरीनाम मुखी ....!!!माऊली माऊली ...! #विसावा_भक्तांचा
23/07/2018

घेता हरीनाम मुखी ....!!!
माऊली माऊली ...!
#विसावा_भक्तांचा

Address

Station Road, Hippargi
Akalkot
413216

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shreeswamikrupasadan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shreeswamikrupasadan:

Share

Category

Shree Swami Krupa Sadan

We are One of the leading lodging service provider in Akkalkot Solapur.We are here to serve our Luxurious services in Affordable price special for Swami Maharaj Devotee. For Serving you that means we have a opportunity to do SEVA kram towards Swamiji Path. Please Come And enjoy your devotional journey. We are here only for you. Thank You..! ~|| Jay Jay Swami Samarth ||~