11/08/2023
पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून स्थानिक ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासनातर्फे १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीत ‘आंबोली वर्षा महोत्सव’ आयोजित केला आहे. पाच दिवसांच्या या वर्षा महोत्सवाची सुरुवात आंबोली येथे १२ ऑगस्टला सकाळी ११ वाजता स्थानिक ढोलताशा, गणेशवंदनाच्या माध्यमातून होईल. साहसी क्रीडा प्रकार, झिप लाईन सफर, दशावतार, नाईट सफर, १३ ऑगस्टला जलक्रीडा प्रकार, जेटस्की, स्पीड बोट, बनाना बम्पर राईड, हिरण्यकेशी ट्रेकिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, फुगडी, जंगल सफर, १४ ला रॅपलींग जैवविविधता माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम ”चांगभलं”, जंगल सफर, १५ ला सैनिक स्कूल मुलांच्या कवायती, शहीद हवालदार पांडुरंग गावडे स्मारक येथे माजी सैनिकांचे संचलन, सांस्कृतिक कार्यक्रम चित्रकथी, जंगल सफर, १६ ला महादेव गड ट्रेकिंग, आंबोली सफर आदी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.