HOTEL Mahila Aghadi

HOTEL Mahila Aghadi Special and

23/05/2024
Mahila aghadi's special “kharada chicken”
21/04/2024

Mahila aghadi's special “kharada chicken”

27/02/2018
महिला आघाडीतर्फे सीमाबांधवानो जागे व्हा या पुस्तिकेचे वितरणमहाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीतर्फे शनिवारी ता २० रोजी स...
21/01/2018

महिला आघाडीतर्फे सीमाबांधवानो जागे व्हा या पुस्तिकेचे वितरण

महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीतर्फे शनिवारी ता २० रोजी सीमाप्रश्नाची माहिती घरोघरी पोहचावी यासाठी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने आणि दैनिक तरुण भारत यांनी तयार केलेल्या सदर पुस्तिकेचे वितरण शहर म ए समितीचे उपाध्यक्ष टी के पाटील आणि मराठा बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर यांच्या हस्ते पांगुळ गल्ली येथे करण्यात आले.
यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी पांगुळ गल्लीतील प्रत्येक घरात जाऊन सदर पुस्तिकेचे वाटप केले.
यावेळी प्रिया कुडची,अर्चना कावळे,अर्चना देसाई,कांचन भातकांडे,दीपा मुतकेकर,भाग्यश्री जाधव,आशा सुपली, मंजुश्री कोलेकर,प्रभावती सांबरेकर,अनुपमा कोकणे,सुहास किल्लेकर,अजित कोकणे,महादेव पाटील,मोतेश बारदेशकर,गजानन बामुचे व इतर बरेच नागरिक उपस्थित होते.

 # # Mahila Aghadi, Nag panchami faral stall opening. Guests lokmanny society director Gayatri Kakatkar and Ex Dy mayor ...
25/07/2017

# # Mahila Aghadi, Nag panchami faral stall opening. Guests lokmanny society director Gayatri Kakatkar and Ex Dy mayor Renu Mutkekar.
Pakka chivada
Besan ladoos
Poha ladoos
Rava ladoos are available at mahila Aghadi hotel.

28/03/2017
Happy Holi
12/03/2017

Happy Holi

शेतकरी कुटूंबातील महिलांचा सत्कार हा स्तुत्य उपक्रम - महापौर संज्योत बांदेकरबेळगाव :-  ता, 9 आपला देश शेतीप्रधान असून गर...
09/03/2017

शेतकरी कुटूंबातील महिलांचा सत्कार हा स्तुत्य उपक्रम - महापौर संज्योत बांदेकर

बेळगाव :- ता, 9 आपला देश शेतीप्रधान असून गरीब , कष्टकरी कुटूंबातील महिलांचा सत्कार महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडी तर्फे करण्यात येत आहे, हि महिला दिनी अत्यंत अभिमानाची गोस्ट आहे,आणि त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले , त्याबद्दल मी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांची कृतघ्न आहे, असे उदगार महापौर संज्योत बांदेकर यांनी काढले.
महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या शेतकरी कुटूंबातील कर्तबगार महिलांचा व नुतन महापौर संज्योत बांदेकर यांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, महापौर संज्योत बांदेकर,माजी महापौर सरिता पाटील होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली,
प्रास्ताविक करताना महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी 'महिला दिनाचे' महत्व सांगून , शेतकरी कुटूंबातील महिलांचा सत्कार करण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली आणि सर्व उपस्थितांचे स्वागत केले. अर्चना कावळे यांनी महापौर संज्योत बांदेकर यांचा परिचय करून दिला. रेणू किल्लेकर व सरिता पाटील यांच्या हस्ते महापौर संज्योत बांदेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
त्यांनतर आजच्या सत्कारमूर्तीचा परिचय श्रद्धा मांडोळकर, शामिनी पाटील, प्रभावती सांबरेकर, मंजुश्री कोळेकर, रेणू भोसले, निकिता उसुलकर, रूप मुतकेकर, अनुपमा कोकणे, भाग्यश्री जाधव यांनी करून दिला,
त्या सर्व सत्कारमूर्ती अनुसया सांबरेकर, रुक्मिणी अडकुलकर, शांताबाई कंग्राळकर, रुक्मिणी कंग्राळकर, आशादेवी रायजाधे, छाया हंडे, इंदूबाई डोंगरे, यशोदा इंगवले, लक्ष्मीबाई इंगवले, शोभा इंगवले, सुवर्णा मोरे, यांचा महापौर संज्योत बांदेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आभार कांचन भातकांडे यांनी मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया कुडची यांनी केले,
या कार्यक्रमाला महिला आघाडी व महिला आघाडी सोसायटीच्या सदस्या मोठया संख्येने उपस्थित होत्या.

08/03/2017
म. ए. समिती महिला आघाडीच्यावतीने भाषिक अल्पसंख्यांक सहआयुक्तांना निवेदन देण्यात आले.श्री. एस. शिवकुमार,सहआयुक्तकेंद्रीय ...
08/03/2017

म. ए. समिती महिला आघाडीच्यावतीने भाषिक अल्पसंख्यांक सहआयुक्तांना निवेदन देण्यात आले.

श्री. एस. शिवकुमार,
सहआयुक्त
केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक
आयोग, पश्चिम विभाग,
यांना,
भारतीय घटनेनुसार अल्पसंख्यांकांना त्यांच्या भाषेतून सरकारी परिपत्रके, माहिती देण्याचा आदेश असूनही तसेच कर्नाटक उच्च न्यायालयाच्या दि. १८ नोव्हेंबर २०१३ च्या आदेशानुसारही अद्याप येथील सरकारी कार्यालयातून मराठीतून माहिती, परिपत्रके इ. दिली जात नाहीत, तरी आपण याचा गांभीर्याने विचार करून मराठीतून माहिती देण्यास भाग पाडावे, अशा मागण्यांचे निवेदन महिला आघाडीच्यावतीने आम्ही आपणास देत आहोत, असे सांगत मराठी भाषिकांच्या सर्व अडचणींचा पाढा रेणु किल्लेकर यांनी आयुक्तांना ऐकविला. यावेळी त्यांच्यासोबत सरिता पाटील, प्रिया कुडची,मंजू कोलेकर, रेणू भोसले,अर्चना कावळे, अर्चना देसाई, दीपा मुतकेकर, भाग्यश्री जाधव,रूपा नेसरकर, सह बाळासाहेब काकतकर , नारायण अतिवाडकर, रतन मासेकर, सुहास किल्लेकर, चंद्रकांत कदम, अजित कोकणे इ. उपस्थित होते.

Address

Tarale Building, Kaktives Road
Belgaum
590001

Telephone

08312463366

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when HOTEL Mahila Aghadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share