18/02/2026
#
FishingLife
"दर्याचा राजा आम्ही, काळजाचा तुकडा...
कोकणची पारंपारिक मासेमारी आणि आमचा 'रापण' संघ! 🌊🐟"
लाटांच्या तालावर डुलते आमची होडी,
दर्या अन् कोळ्याची अतूट ही जोडी...
पहाटेच्या प्रहरी सुटतो गारवा वारा,
जाळं टाकुनी शोधतो रूपेरी माशांचा धारा...
रापण लागली किनारी, ताकद लावली सारी,
एकजुटीने ओढतो आम्ही 'रापण' भारी...
पापलेट, सुरमई अन् बांगड्याची रास,
दर्या देतो आम्हाला घामाचा गोड घास...
कधी वादळ, कधी लाटा, जीव टांगणीला असतो,
पण दर्या माऊलीच्या मायेवर हा कोळी जगतो...