20/12/2020
*हास्य_तराना*
*सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत*
*संगीत, हास्यांचे फवारे उडविणारा दर्जेदार कार्यक्रम*
*धामणवणेतील एसआर अॅग्रो आणि जंगल रिसॉर्टमध्ये रंगणार*
▪️ ग्लोबल चिपळूण टूरिझमतर्फे ३१ डिसेंबर रोजी आयोजन
▪️ जीप सफारी, राहण्यासाठी टेन्ट, पक्षीनिरीक्षण आणि बरच काही
*चिपळूण:* गेल्या दहा महिन्यांपासून आपण सारेच कोरोनाच्या संकटातून जात असताना कोरोनाचे संकट आणि त्यातून आलेले टेन्शन संपवून नवीन वर्षाची फ्रेश सुरुवात करण्यासाठी एक चांगला पर्याय, चांगली संधी ग्लोबल चिपळूण टूरिझम मल्टी. को- ऑप सोसा. लि. चिपळूण घेऊन आली आहे. चिपळूण शहराजवळील धामणवणे येथील एसआर अॅग्रो आणि जंगल रिसॉर्ट येथे दि. ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत, जुनी-नवी मराठी-हिंदी गाणी, हास्यांचे फवारे, असा एक दर्जेदार कार्यक्रम रसिकांसाठी खास आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ ते १२ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर शाकाहारी-मांसाहारी जेवणाची मेजवानी, शिवाय जीप सफारी, राहण्यासाठी टेन्ट, पक्षीनिरीक्षण आणि बरंच काही या ठिकाणी असणार आहे. मनोरंजनाच्या कार्यक्रमात स्वरदा कुलकर्णी, तन्मय वारे या दोन नव्या दमाच्या गायकांचा सहभाग असेल. त्यांच्या साथीला राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धा गाजविणारे अनिकेत जोगळे, अथर्व भेकरे यांचे मनाला आनंद देणारे संगीतही असेल. त्याचबरोबर महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ओंकार भोजने, स्टार प्रवाहवरील एक टप्पा आऊट स्टॅण्डअप कॉमेडी फेम केतन साळवी, सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा, कलर्सवरील कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम अंकित म्हात्रे यांच्यासह नाटक कंपनी, चिपळूणचे योगेश बांडागळे आणि आदेश कांबळी यांचा सहभाग असेल. या कार्यक्रमासाठी केवळ ७५० रुपयांचा पास ठेवण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी व आपली नोंदणी करण्यासाठी विश्वास पाटील यांच्याशी ९८२३१३८५२४, ८७६७५७७५४६ या क्रमांकावर संपर्क साधा, प्रवेश मर्यादित आहे. त्यामुळे २७ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे, असे कळविण्यात आले आहे.