21/12/2022
हिरव्यागार वनराईने नटलेल्या व नारळा पोफळीच्या कुशीत व प्रसिद्ध अरबी सागराच्या किनारी वसलेले एक छोटेसे गाव म्हणजे कोलथरे.
नैसर्गिक सौंदर्याने नटलेला दापोली तालुका म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरील स्वर्ग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील अनेक भाग स्वप्नवत वाटणारे आहेत. तेथील रमणीय परिसर मनाला भारावून टाकतो. त्यापैकीच एक गाव म्हणजे कोलथरे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या गावाला सुंदर व स्वच्छ अशी २ कि. मी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. येथील सूर्यास्ताचे दर्शन म्हणजे समुद्रकिनारपट्टीवरून दिसणारे विलोभनीय दृश्य. संपूर्ण समुद्रकिनारी मोठमोठया नारळापोफळीच्या वाड्या आहेत, आशाच एका वाडीमध्ये वसलेलं आमचं #हॉटेल #मानस आहे.. आमच्याइथे अत्यंत रास्त दरात A/C व NON A/C रुम उपलब्ध आहेत,
तसेच स्वच्छ स्वयंपाक घरात घरच्यासारखे शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सुविधा आहे नारळापोफळीच्या बागेत प्रियजनांबरोबर पंगतीत जेवायला तुम्हाला नक्कीच आवडेल आणि रूम पासून जवळच फक्त हाकेच्या अनंतराव आहे समुद्र किनारा, संध्याकाळी शांत निवांत समुद्र किनारी आपल्या प्रियजनांबरोबर वाफाळता चहा घेत गप्पा मारायला कोणाला नाही आवडणार.
तसेच समुद्रिसफर व डॉल्फिन दर्शन ही तर पर्वणीच,
कोळथरे बीच समुद्र सफर आणि डॉल्फिन दर्शन ...
तसेच आमच्याइथे मोफत सुविधा उपलब्ध आहे.
एकदा आवश्य भेट द्या आपल्या हॉटेल मानसला.
-हॉटेल मानस, कोलथरे, दापोली.
प्रो. प्रा. श्री. मंदार रमाकांत भाटकर
(माझी सैनिक)
09404357437
07499469254