Aamrayog

Aamrayog Amrayog is one of the best Dapoli resorts with the perfect blend of magnificent Mango trees, beautifu

अचानक एखाद्या ग्रुपवर आलेला अभिप्राय आपल्याला कोणी तरी पाठवतं तेव्हा भारीच वाटतं! --------------------------------------...
07/02/2022

अचानक एखाद्या ग्रुपवर आलेला अभिप्राय आपल्याला कोणी तरी पाठवतं तेव्हा भारीच वाटतं!

------------------------------------------------------------------
सायली जोग यांचेकडून साभार!




2021 मध्ये lockdown आणि बंद बंद पाहता मला वाटलं नव्हतं की यावर्षी आपण 31 कुठे तरी बाहेर celebration करू पण आताच्या सरकारची कृपा आणि ते शक्य झालं.. म्हणतात ना जहा चाह वाहा राह तस काहीस.. आता 31 ला बाहेर म्हणजे सगळं बघायला हवं कारण करोना नावाचा बागड बुवा अजून गेला नाहीये ना. मग काय आधी ठिकाण तर जायचं ठरलं दापोलीला मग हॉटेल सोधा 4 दिवस झाले तरी मना सारखं काही मिळेना शेवटी मिळालं एकदाच जरा बीच पासून लांब होत पण सुंदर ते म्हणजे आम्रयोग नाव पाहूनच मन अगदी उडायला लागलं... नवऱ्याने नाक मुरडले की किती लांब हे काय वैगरे 😏😏😏 पण मी कुठली लक्ष देतीये आंबा म्हणजे प्रेम.. लगेच बुकिंग केलं. पण हल्ली ऑनलाईन बुकिंग मध्ये सुध्दा दाखवतात तशी रूम असते अस नाही जे बुकिंग केलं आहे ते तसच आहे ना हे पाहण्या साठी मग शोधा शोध सुरू.. लगेच आहोनी नाक खुपसल की झालं ना बुकिंग आता का शोधती आहेस.. पण शेवटी मी सोधल आणि कुठे सापडलं ते म्हणजे आपल्या ग्रुप वर होय होय पुला वर Mijiri barve ह्यांची पोस्ट पहिली आणि निर्धास्त झाले. आता मात्र वेध लागेल ते जायचे. 29 तारखेला सकाळी निघालो पहाटे की लवकर जाऊन पोचू मध्ये नाष्टा केला आणि 12 वाजता आम्रयोग इथे पोचलो. पोचल्यावर आजू बाजूंनी फ्कत आंब्याची बाग 🌳🌳आणि शांतता हे पाहून नवरा आणि त्याचा मित्र खुश. लगेच तिथे मुकुल बर्वे हे आले आणि आमच्या रूम दाखवल्या कोकणातील कौलारू घरं आणि सारवलेली जमीन हे गणितच सुंदर आहे. रूम जश्या ऑनलाईन बघित्याला होत्या तशाच. खिडकीतून आंब्याच झाड दिसत आहे. बाहेर झोपाळा आहे. अजून काय हवं. 1 वाजता जेवणाला बोलावलं. आहाहा बिन मोसमी आमरस म्हंटल्यावर अजून काय हवं आणि तो ही हापूस चा नादच खुळा. बरोबर ताज्या घरी लावलेल्या मुळ्याची कोशिंबीर, पापड, फणसाची भाजी, बटाटा भाजी, वरण, पोळी आणि गरम भात.. 😋😋😋😋 फारच पाणी सुटलं तोंडाला. पोट भरलं पण मन काही भरेना एवढं सुंदर होत की ते शब्दात नाही मांडू शकत. रात्री माझ्या नवऱ्याने सांगितलं व्हेज झालं आता जरा 🐟🐟🐟 मासा होऊन जाऊ देत. मग काय बंगडा फ्राय आणि बांगडा थाळी अस ठरलं. बांगडा खाऊन सगळे तृप्त कारण एकदम फ्रेश आणि चवदार मी खात नाही पण त्यांनी दिलेली ही पावती आहे. रात्री मस्त मिक्स व्हेज भाजी, शिरा, उसळ, पोळी, काकडी कोशंबीर, वरण, आणि पोळी, माशाचा रस्सा, भात आणि पोळी...सुंदर अस जेवण झाल्यावर झोप हवीच. मी गेली 7 वर्षात खूप ठिकाणी कोकणात गेली आहे पण व्हेज कोकणात एवढं सुंदर कुठेच मिळत नाही. दुसऱ्या दिवशी कॉफी आणि चहा घेऊन कोलथरे बीचला गेलो🌊🌊🌅 मस्त मज्जा केली आणि परशुरामाची भूमी पाहून परत आलो. रात्री मस्त खेडा भजी (कांद्याची). चवळी उसळ, कुळीथ पिठले, सुक्की भाजी, पोळी, टोमॅटो कोशिंबीर आणि इंद्रायणी भात आहाहा... सुंदर एका व्हेज खाणाऱ्या माणसाला अजून काय हवं..खरतर 3 नॉनव्हेज आणि एक व्हेज अशी टीम झाली होती पण आम्ही तिथून निघे पर्यंत 2 नॉनव्हेज आणि एक 2 व्हेज अस झाल. जेवण कमाल होतच ते खाऊन मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं हे गाणं म्हटलं तर चुकीचं नक्कीच नाही वाटणार. हे झालं जेवणाच आता रूम मोठ्या आणि ऐसपैस. स्वच्छता सुंदर एक नंबर एकदम साफ कुठे पण पिवळा डाग नाही . त्याचा स्टाफ अगदी छान. मी फोटो शेअर करत आहे नक्की जा आणि review टाका.
रूम - 2500 पर night
व्हेज थाळी unlimited - 200 ( god limited)
Bangada Fry - 350
Thali fish - 350 ( unlimited)
Mukul barve
+91 94224 44086
Payment Bank transfer. Photo share karate aahe. Nakki ekda Jaun ya. Someone please tag to manjiri barve

घाट वगरे नाहीये हा!!! आम्रयोग निवास  आहे!!! सध्या हे असं आहे सगळं😍😍😍 कांद्याची खेकडा भजी आणि चहापात, आलं घातलेला चहा पॅक...
15/07/2021

घाट वगरे नाहीये हा!!! आम्रयोग निवास आहे!!! सध्या हे असं आहे सगळं😍😍😍

कांद्याची खेकडा भजी आणि चहापात, आलं घातलेला चहा पॅकेजमध्येच आहे😀😀 चला मग... बंद.... चालू.... बंद ...... च्या अधेमधे एक हिरवी चक्कर होऊद्या!!

"प्रतिकूल ते घडेल" हे डोक्यात ठेवून माणसाने योजना करावी असं आमचे वडील नेहमी म्हणायचे. दोन वर्षांपूर्वी मला कुणी म्हणालं ...
14/05/2021

"प्रतिकूल ते घडेल" हे डोक्यात ठेवून माणसाने योजना करावी असं आमचे वडील नेहमी म्हणायचे. दोन वर्षांपूर्वी मला कुणी म्हणालं असतं की तुझी आई लोणचं मस्त घालते, आणशील का? तर मी म्हटलं असतं अग बाई आंब्याची उस्तवार संपली की घालेल आई तेव्हा आणते! पण करोना ने जशी सगळ्याची गणितं बदलली तशीच आमच्या आम्रयोगचीही! गेल्यावर्षी पासून आंबे बाजारात वेळेवर जातील का नाही, गाडी मिळेल का नाही, आपले आंबे लोकांच्या घरी सुखरुप पोचतील का नाही, परवानगी घेऊन कधी/कुठे/कुठल्या वेळात माणूस जाईल हे सगळं जुळवताना सतत टांगती तलवार असतेच. मग नाहीच जुळून आले सगळे योग तर काय करायचं?? हातातोंडाशी आलेलं, वर्षातून एकदाच येणारं फळ असंच कसं जाऊ द्यायचं?
मग काय, जो उपक्रम सगळे आंबे खाऊन झाल्यावर करायचा तो आधीच करायला घेतला आईने! फेसलेल्या मोहरीत घातलेली लोणची, मिरची ही आमची कोकणची खासियत! झटकदार आंब्याचं लोणचं दोन प्रकारात, एक साधं आणि एक फेसलेल्या मोहरीतलं, आम्रयोगची अगदी विशेष अशी आंबट-तिखट आंबा मिरची, कुठेही न मिळणारं हिरव्या करवंदाचं गोड-तिखट लोणचं, खारातली मिरची आणि नेहमीचं उपासाच गोड लिंबू लोणचं असं सगळं घेउन आलोय छान बरणीत. इतक्या सगळ्या चटकदार लोणच्यावर उतारा म्हणून मस्त आंबट-गोड मुरांबा आणि खमंग गुळंबा!! सगळे पदार्थ अगदी शुद्ध तेलात आणि परिरक्षक (preservative😀) विरहित आहेत.
अक्षय्य तृतीया म्हणजे कधी क्षय न पावणारा मुहूर्त. चवीचा वारसा जपून पुढे न्यायला, सगळ्यासाठी घेऊन यायला उत्तम मुहूर्त! घ्या तर मग, आम्रयोग घेऊन आलंय तुमच्या घरी, तुमचा आम्र "योग" वेगवेगळ्या आठ चवीत!! आणि हो, अजून आंबे खायचे आहेतच... संपले नाहीयेत.
हे सर्व पदार्थ लवकरच वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होतीलच. सध्या मात्र पटकन पिंग करून तुमची ऑर्डर नोंदवा🙏
8408093595/ 9890583726

मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन...आणि, खरंच आले😀 कोण कोण काय अहो?? हे सगळे!!! तुम्हाला नाही येता येत ना?? पण आम्रयोग आलंय...
12/05/2021

मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन...
आणि, खरंच आले😀
कोण कोण काय अहो??
हे सगळे!!!
तुम्हाला नाही येता येत ना?? पण आम्रयोग आलंय ना, तुमच्या गावात!!
मग करा पिंग 8408093595/ 9890583726 ला, आणि आणा तुमचा आम्र "योग" तुमच्या घरी!!

काही वर्षांपूर्वी मराठीतील तरुण, लोकप्रिय अश्या काही कवी, संगीतकारांनी मिळून ऑर्केस्ट्रा केला होता, त्याला आम्ही काही मि...
22/02/2021

काही वर्षांपूर्वी मराठीतील तरुण, लोकप्रिय अश्या काही कवी, संगीतकारांनी मिळून ऑर्केस्ट्रा केला होता, त्याला आम्ही काही मित्रमंडळीनी हजेरी लावली होती. कविता, गाणी आणि मधे मधे गप्पा चालू होत्या. संवादकांनी सर्वाना प्रश्न विचारला की तुम्हाला कविता/ चाली/गाणी हे सुचण्यासाठी उत्तम वेळ, जागा कोणती असते. यावर पाचही कलाकारांनी आम्हाला कोकण, कोकणातली शांतता, पाऊस इत्यादी इत्यादी आवडतं.....तिकडे गेलं की एकांतात संगीताचा, कवितेचा विचार होतो.... वगैरे वगैरे.... ! मी आपली विचार करत बसले पाऊस वगरे असला की आपल्या कोकणातल्या घरच्या लोकांच्या काळज्या साधारण वीज, पिण्याचे पाणी, चूल न पेटवता येणं वगरे अश्या सामान्य असतात🤔 यांना कुठून कविता बिविता होतात😐 एकांतात आम्हाला बारीक कुठून तरी हूssssप असा आवाज येतो, आणि घरातली मोठी लहानांना पत्र्याचे डबे बडवायला पाठवतात... त्या हूssssप मागून मोठी वानरसेना अवतरुन असेल नसेल ते झाड रिकामं करेल याची काळजी असते!

थोडक्यात काय तर मी ही अशी जागा अनुभवली नव्हती तोपर्यंत मला हे प्रतिभेचे हुंकार/ धुमारे वगरे प्रकरण खरं वाटलं नव्हतं. पण आता या कोपऱ्यात बसून समोर दिसणारी पानं किंवा खारुताई बघण्याचा जो आनंद असतो तेव्हा वाटतं की खरंच इथे मनातलं कागदावर झरझर उतरू शकतं... किंवा वाचताना कधी पुस्तक संपून गेलं हेच कळणार नाही.

Wishing you a very Happy New Year from team Amrayog! We hope you have an amazing year ahead!
01/01/2021

Wishing you a very Happy New Year from team Amrayog! We hope you have an amazing year ahead!

📢 LADIES❗️Are you bored of your everyday routine? Do you need a break? Plan a women’s trip with your friends and come ov...
30/12/2020

📢 LADIES❗️Are you bored of your everyday routine? Do you need a break? Plan a women’s trip with your friends and come over to Amrayog!
-
Visit our website today! (Link in bio)

While there is plenty for you to do at Amrayog, you can also visit places around it! -20 minutes away from Amrayog, we’v...
29/12/2020

While there is plenty for you to do at Amrayog, you can also visit places around it!
-
20 minutes away from Amrayog, we’ve got a beach called ‘Ladghar beach’!
-
Book your stay today! Visit our website to know more!

25/12/2020

Wishing you a Merry Christmas from team Amrayog! 🎄🎅🏽
🎄

Have a relaxing staycation at Amrayog! Our rooms are spacious and perfect for families. To know more about Amrayog, visi...
22/12/2020

Have a relaxing staycation at Amrayog! Our rooms are spacious and perfect for families. To know more about Amrayog, visit our website: https://bit.ly/34yV51b

We’re calling out all the foodies in and around town to come over to Amrayog! Give your tastebuds a treat with our Jackf...
17/12/2020

We’re calling out all the foodies in and around town to come over to Amrayog! Give your tastebuds a treat with our Jackfruit Curry!
-
Visit our website to book your stay!

https://amrayog.com

Have you booked a stay at Amrayog yet? Don’t wait, visit our website to book your stay today!
15/12/2020

Have you booked a stay at Amrayog yet? Don’t wait, visit our website to book your stay today!

Address

Shrikrushna Nagar, Pangar Wadi
Jalgaon
415712

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aamrayog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aamrayog:

Share

Category

The Divine coincidence of enjoying quality mangos

In 1975, Mr Jayant Kisan Barve an agriculture graduate from ‘Konkan Krushi Vidyapeeth’ decide to start growing mangoes instead of opting for a government job that was easily available at that time. He was very determined and put tons of hard work, and nature supported his efforts.

Modern agricultural knowledge and techniques were used to develop the serenity of Amrayog. Mr Barve did not look at his plantations as an income but he looked after them like his own children.

It is truly said, the best things in life are made out of love. The experience that we offer here at Amrayog is nothing but the dream of Mr Jayant Barve.

-