30/11/2021
पर्णांनील बेड न ब्रेकफास्ट,
MTDC मान्यताप्राप्त निसर्ग पर्यंटन केंद्र
मु. पो. मेढा, ता. जावळी , जी. सातारा
२ डे पिकनिक
Check -in 12.00 PM Checkout 10.00 AM
About पर्णांनील बी न बी
पर्णांनील हे ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना एकत्र आणण्याचे संस्कृती जपणारे निसर्ग पर्यंटन केंद्र आहे .
पर्णांनील ला आपण आजूबाजूचा निसर्ग अनुभवायला व निवांत वेळ घालवायला येतो.
पुण्यापासून २ तासाच्या अंतरावर (पुणे- सातारा- NH4 - पाचवड पासून २१ किमी अंतर असलेल्या )मेढा या गावी उभारलेले आहे.
सभोवताली वेड लावणारा निसर्ग, समोर कण्हेर धरणाचे बॅक वॉटर व त्यामागे डोंगरच डोंगर , डोंगरावर आपले स्वागत करण्यासाठी उभ्या असलेल्या पवनचक्या आहेतच.
मिनटामिनटाला बदलणारे निसर्गाचे रूप , निसर्गाच्या सानिध्यातील मोरांचा आवाज,विविध पक्ष्यांचे प्रकार आपल्याला अनुभवायला मिळतील.
आपली इनर बॅटरी चार्जे करून आठवडाभर ताजेतवाने राहण्यासाठी , पर्णांनील येथील मुक्काम आपल्याला हवाहवासा वाटेल.
फॅमिलीसाठी स्वतंत्र रूम, १ दिवस आलात तर चक्क २-३ दिवस राहून जाल असे ठिकाण . आमच्याइथे याल तर १२-१५ लोकांच्या ग्रुपनि या.
नियम व अटी
१) पर्णांनील हे निसर्ग पर्यंटन केंद्र आहे त्यामुळे रिसॉर्ट सारखे गेम झोन्स नाहीत. फोटो व सेल्फीसाठी अप्रितम ठिकाण त्यामुळे येताना भरपूर कपडे घेऊन या.
२) बुकिंग चे पैसे भरल्यानंतर को-ओर्डीनेटर चा नंबर १ दिवस आधी दिला जाईल .
३) दुपारी १२ वाजता चेक-इन आहे , त्यामुळे येताना ब्रेकफास्ट करून १/२ टुरिस्ट ठिकाणांना विझिट करून येऊ शकता. दिवसभर रूम मध्ये चहा आणि कॉफीची सोय केलेली आहे .
४) पर्णांनील ला जेवणाची बुफे पद्धत आहे त्यामुळे जेवणासाठी लागणार वेळ लक्षात घेऊन जेवणाची वेळ दुपारी १२.३० ते २ अशी आहे. कोणाला काही गोळ्या, औषधे , पथ्य असेल तर तशी पूर्व कल्पना अगोदर द्यावी.
५) पर्णांनीला दर वीकेंडला
नाश्ता : पोहे /उपमा/ इडली-वडा सांभार / मिसळपाव यातले कोणतेही २ पदार्थ मिळतील .
दुपारच्या जेवणाला : ३ पोळ्या किंवा २भाकरी ,सिझनल भाज्या(१ कोरडी आणि १ रस्सा भाजी ), मसाले भात / वरण भात , तळणीचे पदार्थ , लोणचे , पापड , कोशिंबीर , चटणी मिळेल.
-संध्याकाळी ५.३० वाजता
चहा, कॉफी, गरमागरम कांदा भजी व बटाटा भजी मिळतील .
- चिकन आणि अंडी हवी असतील तर एक्सट्रा चार्जेस परप्लेट लागतील .
रात्री जेवणाला : Veg /Non-veg available आहे .विथ एक्सट्रा चार्जेस.
अन्न हे पूर्णब्रह्म आहे ,वाया जाणार नाही याची काळजी घायवी व त्या प्रमाणे ऑर्डर द्यावी हि विनंती . सर्वांसाठी १ च मेनू राहील.
६) बैलगाडी वर ट्रॅक्टर सफर साठी कमीतकमी १० लोक आवश्यक आहेत . ४ वाजता गाडी येईल.
७) रूम बद्दल
पर्णांनीलमध्ये प्रत्येक फॅमिलीसाठी स्वतंत्र रूम आहे. अश्या टोटल ४ रूम्स आहेत, एका रूममध्ये ३ Adults व १ child ( below 8 years ) आरामात झोपू शकतात . Attached toilet bathroom आहे . गरम पाण्याची सोय आहे, TV with remote control आहे , सामान ठेवायला कपाट दिलेले आहे. चहा कॉफीसाठी इलेक्ट्रिक किटली आहे .
८) मेढा गावामध्ये दारू विक्रीस बंदी आहे. कोल्डड्रींक्स उपलब्ध आहेत .
९) आमच्याकडे इनडोअर आणि आऊटडोअर गेम्सचे साहित्य available आहे. तशी जागा सुद्धा आहे .
१०) पर्णांनीलचा उद्देश्य येणाऱ्या सर्वांच्या जीवनात २ दिवसाचा आनंद निर्माण करणे हाच आहे , यासाठी आम्ही सर्वपरीने प्रयत्न करत आहोत, त्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे . काही उणिवा जाणवल्यास Managementशी संपर्क साधावा हि विनंती.
पर्णांनील हे रिसॉर्ट नसून , निसर्ग पर्यटन केंद्र आहे . तुमच्या हक्काचे माहेर समजा.
पर्णांनील म्हणजे भरपूर फोटो, त्यामुळे येताना भरपूर कपडे घेऊन या, आपल्याला whatsapp , Instagram , facebook च्या DP साठी १०० पेक्षा जास्त फोटोज मिळतील .
सर्वानी आनंदानी नक्की या .
पर्णांनील पासून खालील ठिकाणे पाहता येतील .
महाबळेश्वर , पाचगणी, मेरुलिंग, तापोळा , बामणोली , सज्जनगड , ठोसेघर, शेंबडी मठ , लिंबची विहीर , चाफळ ,कोयनागर इत्यादी .
बुकिंग्स ओपन झालेली आहेत, तर त्वरित बुक करा आणि येऊन फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत सभोवतालचा निसर्ग एन्जॉय करा.
अधिक माहितीसाठी संपर्क,
पर्णांनील बी न बी
कण्हेर डॅम बॅकवॉटर
मेढा, सातारा ४१५०१२
तेजस कापरे : ७४९९०५३५००
parnanil23bnb@gmail .com