कोकण माझा डॉट कॉम

कोकण माझा डॉट कॉम Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from कोकण माझा डॉट कॉम, Hotel & Lodging, Mumbai.

उभा जन्म झिजुदे माझा चंदनापरी🍃,सगुण रूप दावी देवा एकदा तरी ||2||
24/07/2025

उभा जन्म झिजुदे माझा चंदनापरी🍃,
सगुण रूप दावी देवा एकदा तरी ||2||

14/04/2025
12/04/2025

लहानपणापासुनच मला विविध झाडे लावायची आवड आहे. गावाकडील धरणाचे दरवाजे बंद झाल्यावर सरकारने दिलेल्या नव्या जागेत बाबांनी घर बांधले आणी घराच्या परिसरात मी झाडे लावली.
लहानपणापासुन मी जिथे जिथे झाडे लावली आहेत त्यापैकी एकही झाड सुकले किंवा मेले नाहीये हे विशेष.
२०१० साली पदवीच्या शेवटच्या वर्षी असताना घराशेजारी लावलेल्या तमालपत्र मसाल्याच्या झाडाची वाढ एवढी झाली आहे की, संपुर्ण गावातील लोकांना वर्षभराचा मसाला तयार करताना त्याचा उपयोग होतो. आमच्या आजीला या झाडाच्या पानाचे बाजारी मुल्य माहित नव्हते तेव्हा ती झाडावरुन सुकुन पडलेली पाने एकत्र करुन पातेरा म्हणुन जाळत असे.
आपण स्वत: लावलेल्या झाडाची पाने स्वयंपाक करताना, मसाला तयार करताना वापरत असताना सुगंधाने मन तृप्त होते व समाधान मिळते.
#छंद
#कोकणप्रेमीआशिष 🌴❤️

Ashish Ballal

#गावं_वाचवा #राजापूरकर

11/04/2025

#कोकण #रत्नागिरी #सिंधुदुर्ग #भजनीमंडळ
कोकणफ्रेश ऍग्रो प्रोडक्टस- राजापूर
कुणबी तरुणांची व्यावसायिक क्षेत्रात गरुडझेप
असंख्य अडचणी,अनेक संकटं, यावर प्रयत्नांच्या मेहनतीच्या आणि दूरदृष्टीच्या बळावर मात करत कुणबी तरुणांनी व्यावसायिक क्षेत्रात उतरलं पाहिजे या कुणबी युवाच्या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवत आमचे सहकारी मित्र किशोर मांडवकर,प्रकाश दिवाळे, संजय आग्रे,रामचंद्र रांबाडे ,सूर्यकांत गोताड या तरुणांनी एकत्र येत सामूहिकपणे कोकणफ्रेश ऍग्रो प्रोडक्टस या कंपनीची निर्मिती केली असून कोकणातील निसर्गाने भरभरून बहाल केलेल्या पाणी या गोष्टीवर प्रक्रिया करून हे पाणी कोकणफ्रेश या नावाने व्यवसायिक हेतू नजरेसमोर ठेऊन आपल्या सेवेत आणलं आहे. आपल्या युवकांनी सामूहिकपणे उचललेलं हे पाऊल भविष्यात अजून कुणबी युवकांना व्यवसायात उतरण्यासाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.
कुणबी युवा मुंबईतर्फे कोकणफ्रेश ऍग्रो प्रोडक्टसच्या पुढील दैदिप्यमान वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..
आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.आपल्या या सहकाऱ्यांच्या व्यवसायाची माहिती प्रचार प्रसाराच्या माध्यमातून तळागाळात कोकणात पोहचविणे.यापुढे पाणी म्हटलं की लोकांनी कोकणफ्रेशचीच पाण्याची बॉटल घेतली पाहिजे..
जय हो
💐💐💐💐💐💐💐💐💐

06/04/2025

सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ShriRam #

21/03/2025
09/03/2025

आज शेवटचा दिवस नक्की भेट द्या.

02/03/2025

नमस्कार,

आयडियल ऍग्रो टुरीझम एल एल पी तर्फे आपले सहर्ष स्वागत....

_या चिमण्यांनो परत फिरा....._

*येवा कोकण आपलोच असा….*
याचा अर्थ कोणालाच कळला नाही....

“हि” भावनिक साद... आपल्या पूर्वजांनी आपल्यालाच, म्हणजे *“कोकणी माणसांनाच”* घातली होती....

पण,
त्याला प्रतिसाद मात्र परप्रांतीयांनी दिला आणि कोकणच्या नैसर्गिक साधन-संपतीवर डल्ला मारला.
हीच ती वेळ आहे....
- आपल्या जमिनी परत आपणच विकत घेण्याची...
- आपल्या कोकणी लोकांनीच कोकणात परत यावं....
यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे...

या चीमाण्यानो परत फिरा रे …..
कोकणाकडे आपुल्या...

चला तर मग...

निसर्गाच्या सानिध्यात एक स्वप्नवत नंदनवन....
_*कोकणातलं माझं घर…*_

*पर्यटन संचालनालयाच्या "आई" (AAI) योजनेमुळे, कोकणातली बंद घरं कायमस्वरूपी उघडणार...*

"कोकणातील तरुण-तरुणी कायमस्वरूपी कोकणांतच स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरिता व पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करणे तसेच राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाचा दि. १९ जून २०२३ च्या शासन निर्णयांतर्गत "आई" हे महिला केंद्रित / लिंग समावेशक धोरण जाहीर करण्यात आले आहे.

महिलांचा “पर्यटन” क्षेत्रातील सहभाग त्यांच्या आर्थिक विकासासाठी एक चांगले साधन असल्याने, जागतिकa महिला दिनाच्या औचित्याने दि. ८ मार्च 2025 पासून “आयडियल एग्रो टुरिझम एल एल पी” तर्फे पर्यटन संचालनालयाच्या "आई" (AAI) योजनेंतर्गत, *कोकणातली बंद घरं कायमस्वरूपी उघडण्याकरीता व त्यातून दरमहा आर्थिक उत्पन्न निर्माण होण्याकरिता एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.*

आपले कोकणातलं घरं बंद असेल व शहरांतील आपल्या व्यस्त जीवनशैली मुळे आपणास त्याची देखभाल करणे शक्य नसेल तर आपण हा गुगल फॉर्म नक्कीच भरा.
आमचे प्रतिनिधी आपणास संपर्क करतील.
*टीप - हि योजना महिलांसाठी आहे*
अटी व शर्ती लागू

आपला स्नेहांकित,

सतिश हिर्लेकर
(आयडियल ऍग्रो टुरिझम एल एल पी)
08291045848.
🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfbQZZqC2e5xFh-ypyogoC3wNHzZ19pA4eelOpSdy25UgsLHQ/viewform?usp=header

24/11/2024

किल्ले सिंधुदुर्ग
📸 • Sindhudurg

24/11/2024

कशेळी

📸 जयेश मुंगेकर

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोकण माझा डॉट कॉम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share