30/07/2022
And you left us
51 हा आकड़ा कितीही शुभ असला तरी वयासमोर लागला की थोड़ अखरतच!
50 पर्यन्त समतोल असलेला तराजू एक्कावन म्हणताच एकीकडे झुकतो!
अस वाटत की इथेच वयाच्या स्पीडोमीटर ला ब्रेक लागावा!
आजपर्यंत मनासारख खुप काही झाल आहे तरीपण मनासारख खुप काही जगायच राहुनच गेल आहे!
कधी वाटत आयुष्याची पाटी पुसून परत बे एक बे सुरु कराव....... भूतकाळात जाउन केलेल्या चुका दुरुस्त कराव्या, त्यावेळी किम्मत नसलेल्या त्या बेशकीमती क्षणांना परत जगाव. थोडक्यात आयुष्याची खरी किम्मत कळते!
आज वळून पाहता लक्षात येत की जेवढ़ सुखाच्या शोधात पुढे चाललो होतो ते सुख नेहमीच आपल्या सोबत होत, फक्त नव्हती ती फक्त त्या सुखाची जाणीव!
आता सुखाच्या मागे लागण्या पेक्षा सुखानी जगाव!
राग लोभ, द्वेष मत्सर थोडस बाजूला ठेवून मनसोक्त जगाव, कोणाला माहिती किती गेले आणि किती उरले!!!!
खुप झाली भागाभागी, ताणाताणी, डोकेफोडी...
आता वाटत की डोक्यासोबत मनालाही ताण नको, आता मनालाही थोड़ हलक करू!
भरल्या डोक्यानी आणि भारी मनानी आयुष्याचा आनंद घेता येत नाही हेच खर!!
खुप काही लपवून ठेवल आहे एवल्याश्या मनाच्या कप्प्यात!
आता एक एक करत सगळे रुसवे फुगवेनां वाट मोकळी करून देऊ या!
कुणाला मनमोकळेपणाने माफी मागु तर कुणाला मोठ्यामनाने माफ करू.
झाल्या तेवढ्या चुका भरपूर झाल्या आता अजुन त्याच्यात भर नको!
खरच भारी हलक वाटेल!
जमेल त्याला मदत करा, हसत रहा, स्वस्थ रहा आणि आनंदी रहा! मित्रांसोबत रहा!! परिवारा सोबत वेळ घालवा!!!!!
जिंदगी जीने के लिए और क्या चाहिए दोस्त!!!!!!
✍️written by Vijesh
Miss you badly my dear