Joshi Mess & Lunch Home

Joshi Mess & Lunch Home Pure Veg

IngredientsRice - 1.5 cupsMoong Dal - 1 cupSpinach - 1 bunch (chopped)Onion - 1/4 (finely chopped)Garlic - 3 (minced)Gin...
22/01/2018

Ingredients
Rice - 1.5 cups
Moong Dal - 1 cup
Spinach - 1 bunch (chopped)
Onion - 1/4 (finely chopped)
Garlic - 3 (minced)
Ginger - 1" piece (minced)
Tomato - 1 (chopped)
Green Chillies - 2 (minced)
Turmeric Powder - 1/4 tsp
Goda Masala - 1 tsp
Ghee/ Oil - 1 tblsp
Cumin Seeds - 1 tsp
Salt - to taste

Method
1. Wash and soak the rice and dal for 10-15 minutes.
2. Heat oil in a pressure cooker and add the cumin seeds.
3. Next add the onion, garlic and ginger. Fry till it becomes soft.
4. Add the tomato, green chilly, goda masala, turmeric powder and fry for a minute.
5. Next add the chopped spinach and cook till it wilts.
6. Add the rice, dal, 5 cups of water and required salt.
7. Pressure cook for 2-3 whistles or transfer to a rice cooker and cook till done.
8. Serve this warm and comforting meal with some papad and pickle.

Note :- If you do not have goda masala, just skip it.

आलू पालक - Aloo Palakसाहित्य:४ कप पालक, बारीक चिरलेला३ टेस्पून कसूरी मेथी, चुरडून१ मध्यम बटाटा, सोलून मध्यम तुकडे१/२ कप ...
05/12/2013

आलू पालक - Aloo Palak

साहित्य:
४ कप पालक, बारीक चिरलेला
३ टेस्पून कसूरी मेथी, चुरडून
१ मध्यम बटाटा, सोलून मध्यम तुकडे
१/२ कप कांदा, बारीक चिरून
२-३ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
२ टेस्पून तेल
२ चिमटी जिरे, १/४ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट
चवीपुरते मीठ

कृती:
१) मायक्रोवेव्ह सेफ बोलमध्ये बटाट्याचे तुकडे घ्यावे. बटाट्याचे तुकडे बुडतील इतपत पाणी घालावे. मायक्रोवेव्हमध्ये ८ ते १० मिनिटे शिजवून घ्यावे किंवा बटाटे शिजेस्तोवर शिजवून घ्यावे. पाणी निथळून घ्यावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हळद, लसूण, आणि मिरची पेस्ट घालून फोडणी करावी. १० सेकंद परतून मग कांदा घालावा. कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावा.
३) कांदा शिजल्यावर पालक आणि कसुरी मेथी घालावी. १/२ टीस्पून मीठही घालावे, मिडीयम-हाय फ्लेमवर ५-७ मिनिटे परतावे. पालकामधील अधिकचे पाणी निघून गेले पाहिजे.
४) आच मध्यम करावी. बटाटे घालून मिक्स करावे. चव पाहून लागल्यास मीठ घालावे. झाकण ठेवून २ मिनिटे शिजवावे.
गरम भाजी पोळीबरोबर सर्व्ह करावी.

टीप:
१) पालक फोडणीला घातल्यावर लगेच मीठ घालावे. म्हणजे रंग चांगला राहतो. तसेच पालक शिजताना झाकण ठेवू नये, झाकण ठेवल्याने रंग थोडा काळपट होतो.
२) कसूरी मेथीमुळे चव छान येते. जर कसूरी मेथी आवडत नसेल तर ती नाही घातली तरीही चालेल.

बिटाची भाजी - Beetachi Bhajiसाहित्य:२ मध्यम बीट, उकडलेले१ टेस्पून तेल, १/४ टीस्पून जिरे, १/८ टीस्पून हिंग, १/८ टीस्पून ह...
05/12/2013

बिटाची भाजी - Beetachi Bhaji

साहित्य:
२ मध्यम बीट, उकडलेले
१ टेस्पून तेल, १/४ टीस्पून जिरे, १/८ टीस्पून हिंग, १/८ टीस्पून हळद
१ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट
२ ते ३ टेस्पून ताजा खोवलेला नारळ
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट, भरडसर
चवीपुरते मीठ
१ टीस्पून साखर
१ टीस्पून लिंबाचा रस

कृती:
१) उकडलेले बीट सोलून घ्यावे. बारीक चिरून घ्यावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हळद, आणि हिरवी मिरची पेस्ट घालावी. त्यात चिरलेले बीट आणि मीठ घालावे.
३) नारळ घालून झाकण ठेवावे. मंद आचेवर ५ मिनिटे वाफ काढावी. नंतर शेंगदाणा कूट आणि चवीपुरती साखर घालून २ मिनिटे ढवळावे.
४) लिंबाचा रस घालून मिक्स करावे. गरम वाढावी.

Guess it....??आपल्या नाशिकची खास ओळख असलेला हा एक पदार्थ....!!!
05/12/2013

Guess it....??

आपल्या नाशिकची खास ओळख असलेला हा एक पदार्थ....!!!

'मालपोवा' साहित्य : १ वाटी साखर. १.५ वाटी चाळलेली कणीक. ४ मोठे चमचे दही, १०-१५ नग गव्हाचे पोहे,दूध,पाणी कृती : एका पातेल...
02/12/2013

'मालपोवा'

साहित्य : १ वाटी साखर. १.५ वाटी चाळलेली कणीक. ४ मोठे चमचे दही, १०-१५ नग गव्हाचे पोहे,दूध,पाणी
कृती : एका पातेल्यात १/२ दूध व १/२ पाणी घ्या, त्यात दही,साखर घाला व मिश्रण चांगले फेटून घ्या व नंतर त्यात चाळलेली कणीक घालून डोशासारखे सरबरीत होईल असे बघा व हलके होण्यासाठी रूबवून घेऊन नंतर त्यात १०-१५ नग गव्हाचे पोहे घाला व पीठ चांगले फुगून वर येण्यासाठी पातेले २-२.५ तास ताटाने झाकून ठेवा.
कढईत तेल घालून मध्यम आंचेवर उकळे पर्यंत गरम करून घ्या व गरम तेलात एका मोठ्या डावाने पीठ गोलाकाऱ ५-६ इंच आकारात पुरी प्रमाणे टाका. विशेष म्हणजे तो गोल गोळा प्रथम कढईच्या तळाला जाईल व नंतर गोल पुरी सारखा होऊन वर तेलाच्या पृष्ठभागी येईल.सोनेरी रंगावर तळून घ्या व चाळणीत काढून घेऊन निथळून घ्या.
पिस्ते व क्रीम घालून सर्व्ह करा.

"टोमॅटोचे आमलेट"साहित्य : एक मोठ्ठा टोमॅटो,एक मोठ्ठा कांदा,कोथिंबीर,हिरव्या मिरच्या,जिरे-धने पावडर,चवीपुरती साखर व मीठ आ...
02/12/2013

"टोमॅटोचे आमलेट"

साहित्य : एक मोठ्ठा टोमॅटो,एक मोठ्ठा कांदा,कोथिंबीर,हिरव्या मिरच्या,जिरे-धने पावडर,चवीपुरती साखर व मीठ आवश्यक तेव्हढे बेसन (चणा डाळ) पीठ , २-३ चमचे तांदळाचे पीठ व तेल.
कृती : प्रथम टोमॅटो ,कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्या,चवीनुसार हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घ्या. एका पातेल्यात बेसन पीठ,तांदळाचे पीठ घ्या,त्यात बारीक चिरलेले टोमॅटो,कांदे व कोथिंबीर , हिरव्या मिरचयांचे तुकडे,जिरे-धने पावडर चवीनुसार साखर आणि मीठ घालून सरबरीत होईल इतपत पाणी घाला व मिश्रण डावाने चांगले एकजीव करून घ्या. गॅसवर तवा ठेऊन चांगला तापल्यावर त्यावर ओला कापलेला कांदा फिरवून घ्या व नंतर चमचाभर तेल टाकून त्यावर डावाने आमलेट टाका. थोड्या वेळाने उलटे करून दुसर्याओ बाजूने तयार करून घेऊन टोमॅटो सॉस बरोबर गरम आमलेटसर्व्ह करा

"भरली मिरची"साहित्य : ६-७ पोपटी-हिरवा रंग असलेल्या जाड मिरच्या , ३ मोठे चमचे चणा डाळीचे पीठ (बेसन) मध्यम आचेवर खमंग भाजू...
02/12/2013

"भरली मिरची"

साहित्य : ६-७ पोपटी-हिरवा रंग असलेल्या जाड मिरच्या , ३ मोठे चमचे चणा डाळीचे पीठ (बेसन) मध्यम आचेवर खमंग भाजून , ३ मोठे चमचे सुके गोटा खोबरे किसून व मध्यम आचेवर भाजून व पूड करून , १ चमचा धने-जिरे पूड, १ चमचा पांढरे तीळ मध्यम आचेवर खमंग भाजून,१ चमचा बडीशेप मध्यम आचेवर भाजून , १ चमचा लाल तिखट (मिरची पावडर) , १ चमचा साखर , १/२ चमचा गरम मसाला , ३-४ लसूण पाकळ्या , ३ मोठे चमचे लिंबाचा रस , ४ मोठे चमचे तेल , मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , चवीपुरते मीठ,हिंग
कृती : मिर्च्यांचे देठ तसेच ठेऊन उभी चीर घ्यावी व आतील ७५ टक्के बिया काढून टाका. १/२ चमचा तेलात थोडे मीठ व १/२ चमचा लिंबाचा रस घालून ते ह्या मिरच्यांना आतून-बाहेरून चोळून ठेवा.मिक्सरमधून खमंग भाजलेले बेसन,सुक्या खोबर्यायची पूड,बडीशेप,तीळ,लसणाच्या पाकळ्या ह्या सर्वांचे थोडे पाणी घालून वाटण करून घ्या. एका भांड्यात हे वाटण, धने-जिरे पूड, लाल तिखट, गरम मसाला, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग, चवीनुसार मीठ व मावेल इतपतच पाणी घालून ( फार सैल नाही परंतु घट्टही नाही ) कालवून घ्यावे आणी हलक्या हाताने मिरच्यांमध्ये नीट भरावे. ( पोकळ/कमी भरू नये ) एका नॉनस्टिक तव्यावर एक चमचा तेल घालून सगळ्या मिरच्या सहज उलटता येतील अश्या लावाव्यात. बाजूने व वरून थोडे तेल सोडून झाकण ठेवावे. सात-आठ मिनिटांनी उलटवाव्यात मात्र झाकण ठेवू नये. पुन्हा पाच मिनिटांनी कुशीवर वळवून ठेवून थोडे तेल सोडावे.दोन्ही बाजूने चांगल्या खरपूस होऊन किंचितशा लागल्यावर लगेच गासवरून उतराव्यात.
तोंडीलावणे म्हणून ह्या मिरच्या चांगल्याच आहेत परंतु एखादेवेळी भाजी कमी असेल किंवा जर अजिबातच नसेल तर ह्या मिरच्या ती भाजीची उणीव नक्कीच भरून काढतील.

"उकडीचे मोदक"साहित्य :४ वाट्या ओला नारळ खवलेला कीस , २ वाट्या किसलेला गुळ ,१/२ चमचा वेलदोद्याचे किंवा जायफळाची पुड३ वाट्...
02/12/2013

"उकडीचे मोदक"

साहित्य :४ वाट्या ओला नारळ खवलेला कीस , २ वाट्या किसलेला गुळ ,१/२ चमचा वेलदोद्याचे किंवा जायफळाची पुड
३ वाट्या तांदुळाची पीठी,३ कप पाणी,३ चमचे लोणी,१/२ चमचा मीठ (चवीपुरते)

कृती : एका भांड्यात खवलेला ओला नारळाचाकीस , किसलेला गुळ, वेलदोडे किंवा जायफळ पुड एकत्र करा व ते मिश्रण बर्या:पैकी कोरडे व मोकळे होई पर्यंत एक चमचा लोण्यावर परतून घ्या व नंतर बाजुला ठेवा.
हे मिश्रण गरम होई पर्यंत , दुसर्याई बाजुला एका भांड्यात पाणी गरम करा. त्या पाण्यात चिमुटभर मीठ आणी 1एक चमचा लोणी टाकून हळुहळू त्या पाण्यात तांदुळाचे पीठ सोडा व ढवळत रहा. पीठ सोडत असताना पीठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. दहा मिनीटे भांड्यावर झाकण ठेऊन मंद आचेवर गरम होऊ द्या.
ही उकड गरम असतानाच चांगली मळुन घ्या. मळताना हाताला थोडेसे तेल लावा म्हणजे उकड हाताला चिकटणार नाही.
उकड मळुन झाल्यावर त्याचे लिंबा एवढे गोळे करा व गोळे पुरीच्या आकारात लाटा किंवा हातावर सपाट करा. नारळ आणी गुळाचे मिश्रण उकडीत भरा. उकड भरुन झाल्यावर सर्व बाजुने बंद करा व मोदक टोकदार करा.
मोदक तयार झाल्यावर एका भांड्यात पाणी ते भांडे गॅस वर ठेवा. त्या भांड्यावर चाळणी अथवा पातळ सुती कापड ठेवा. त्या चाळणीत अथवा कापडावर मोदक ठेऊन चाळणी अथवा कापड झाका. २० मिनीटे मोदक वाफेवर उकडुन घ्या. ही क्रिया तुम्ही ईडली पात्रात सुध्दा करू शकता.

झाले आता हे उकडीचे मोदक खाण्यास तय्यार ! हे उकडीचे मोडक साजूक तुपाबरोबर खायला द्या.

आजची माझी रेसिपी आहे एका नव्या पदार्थाची ज्याचे नांव आहे "दही बुत्ती भात "साहित्य : एक वाटी दिल्ली राईस किंवा बासमती तां...
02/12/2013

आजची माझी रेसिपी आहे एका नव्या पदार्थाची ज्याचे नांव आहे "दही बुत्ती भात "
साहित्य : एक वाटी दिल्ली राईस किंवा बासमती तांदळाचा नेहमीप्रमाणे शिजवलेला साधा भात , दोन वाटया गोड घट्ट दही , एक वाटी दुध , चवीनुसार मीठ व साखर , एक मोठा चमचा साजूक तूप , एक चमचा जिरे ,पाच –सहा सांडगी तळणीच्या मिरच्या ,दोन तीन काश्मिरी सुक्या लाल मिरच्या , आठ – दहा कढीपत्त्याची पाने , थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर .
कृती : शिजलेल्या मोकळा भातात गोड घट्ट दही , दुध , चवीनुसार साखर व मीठ घालून भात मऊसर कालवावा .
गॅसवर एका कढईत एका मोठ्ठ्या चमचाभर साजूक तुपात जिरे , कढीपत्ता आणि सांगडी मिरच्या व दोन तीन काश्मिरी सुक्या लाल मिरच्या घालून परतून घ्याव्या , व मिरच्या जरा कुस्कराव्या आणि ती फोडणी भातात मिसळावी .
सर्व्ह करतेवेळी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भात वाढवा .
टीप : हा भात प्रवासात न्यायला सोयीचा पडतो . मात्र असा प्रवासात घ्यायच्या भातात दुध जास्त घालून दह्याचे प्रमाण थोडे कमी करावे जेणेकरून भात फार आंबट किंवा कोरडा होणार नाही .

Does any one remember this?
01/12/2013

Does any one remember this?

What's your favourite Mithai among these?a - Rasmalaib - Gulab Jamunc - Mishti Doi
01/12/2013

What's your favourite Mithai among these?

a - Rasmalai

b - Gulab Jamun

c - Mishti Doi

चवदार आणि पौष्टिक … पंचामृत धिरडे !!-पंचामृतासाठी लागणारे साहित्य- एक वाटी दुध एक चमचा मध एक चमचा साखर एक चमचा दही एक चम...
01/12/2013

चवदार आणि पौष्टिक … पंचामृत धिरडे !!
-पंचामृतासाठी लागणारे साहित्य-
एक वाटी दुध
एक चमचा मध
एक चमचा साखर
एक चमचा दही
एक चमचा साजूक तूप
-धिरड्यासाठी लागणारे-
एक वाटी कणिक
आले घालून बारीक केलेली मिरची [ दोन चमचे ]
चवी पुरते मीठ !!
कृती
प्रथम दुध, मध,दही ,साखर व साजूक तूप एकत्र करून त्याचे पंचामृत बनवून घ्या । त्याचा देवाला नैविद्य दाखवून घेतला तरी चालेल !! नंतर एका पसरट भांड्यात एक वाटी कणिक घ्या त्यात चवीपुरते मीठ व वाटलेली मिरची टाका व यात पंचामृत टाकून कणिक चांगली हलवून घ्या पीठ सैलसर व्हावे म्हणून थोडे पाणी मिसळा … नंतर तवा तापत ठेवा , तवा तापला कि त्यावर थोडे तेल पसरून घ्या व आपल्याला आवडतील व जमतील त्या आकारची धिरडी करून घ्या …. आणि मग गरमागरम स्वाहा करा … बरोबर ओले खोबरे आणि कोथिंबीर यांची चटणी असल्यास उत्तम आणि नसली तरी उत्तम लागतात हि धिरडी शिवाय पौष्टिक आहेत व मुलांना , मोठ्याना प्रचंड आवडतात …

Address

Nashik
422009

Telephone

+919579730276

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Joshi Mess & Lunch Home posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Joshi Mess & Lunch Home:

Share

Category