06/04/2023
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेछ्या!
कर्जत विधानसभेसाठी लाभलेलं सक्षम व कार्यक्षम नेतृत्व
आमदार महेंद्रशेठ थोरवे
युवकांच्या मनातील लोकप्रिय नेतृत्व अर्थात कर्जत विधानसभेतील विकास पुरुष...
कर्जत विधानसभेसाठी लोकप्रतिनिधी म्हणून लाभलेला एक चेहरा अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सर्वसामान्य, युवा वर्ग, महिला वर्ग, उच्च शिक्षित अशा सर्व घटकांतील जनमानसात आमदार महेंद्रशेठ थोरवे अधिक लोकप्रिय आमदार ठरले आहेत. त्यांनी आपल्या विकासात्मक दूर दृष्टीकोनातून स्व:त एक उत्तम व्यक्तीमत्व घडवले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे या विधानसभेसाठी अस उभारत नेतृत्व म्हणून आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना संपूर्ण मतदार संघातून अधिकाधिक पसंती मिळत आहे. वारकरी संप्रदायाची कौटुंबिक व अखंड परंपरा लाभलेल्या महेंद्रशेठ थोरवे यांनी भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी सण, उत्सव व परंपरा यांसह क्रीडा, शिक्षण, आरोग्य व सामाजिक विषयांकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करत अत्यंत अल्प काळात त्यासंदर्भात सातत्याने अंमलबजावणी करत एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी या मतदार संघात अत्यंत भरीव व महत्वपूर्ण योगदान दिले आहे. सध्या जनमानसात एक आपला व हक्काचा माणूस म्हणून त्यांची जी यशस्वी प्रतिमा तयार झाली आहे ती त्यांच्या पुढील राजकीय कारकीर्दची मुहूर्तमेढ ठरणार आहे. वंदनीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास व आशीर्वाद, माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण तर, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे अनमोल मार्गदर्शन व भरभक्कम पाठिंबा त्यांना एक विशेष ऊर्जा देणारा ठरला आहे म्हणूनच त्यांना कर्जत विधानसभेचे भाग्यविधाते म्हणून संबोधले जात आहे*
आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना सन २०१९ मध्ये कर्जत विधानसभेचे नवनियुक्त लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने भरभक्कम पाठिंबा देत कर्जत विधानसभा मतदारसंघात प्रथमच एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याक्षणानंतर आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी आतापर्यंत ८०० कोटीपेक्षा अधिक रुपयांचा विकास निधी या विधानसभा क्षेत्रांत उपलब्ध करून दिला. असून करोडों रुपयांची महत्वपूर्ण विकास काम प्रस्तावित आहेत.
आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी दैदिप्यमान विकास कामांना दृष्टिक्षेपात ठेवून कर्जतमधील कर्जत- मुरबाड राज्य मार्गावर नव्याने उभे राहणारे डॉ. तिर्थरुप नानासाहेब धर्माधिकारी मुख्य प्रवेशद्वार, प्रति आळंदी, शिवसृष्टी, युवराज छत्रपती संभाजी महाराज चौक व उल्हास नदीवरील नवीन पुल अशा एक ना अनेक ऐतिहासिक विकास कामांना प्राधान्य देत कर्जतकरांच्या स्वप्नातील विषयांना महत्वपूर्ण स्थान देत त्यांनी भरीव योगदान दिले आहे. तर, माथेरान पर्यटन स्थळ, आंबिवली बुद्ध विहार, खांडेश्वर मंदिर तासगाव धाकटी पंढरी विठ्ठल रुक्माई मंदिर व कोंढाणे लेणी या महत्वकांशी कामांसह संपूर्ण मतदार संघात क्रीडा क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन देत भावी उज्वल पिढी घडविण्यासाठी भव्य क्रिडा संकुल उभे राहावे यासाठी प्रामुख्याने लक्ष दिले. तर, औद्योगिक क्षेतात या मतदार संघातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करत आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने पाऊल उचलली आहेत हे तरुणांसाठी महत्वपूर्ण काम ठरले आहे.
आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या कार्यकाळावर झालेल्या विकास कामांवर एक नजर टाकली. तर, कर्जत विधानसभेसाठी एक सक्षम, कार्यतत्पर व कार्यकुशल असं नेतृत्व लाभले असे म्हटले तर निश्चितच वावग ठरणार नाही हे वास्तव आहे. आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना कालावधीत हजारो गरजू कुटुंबीयांना सरसकट अन्नधान्यांचे वाटप करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कर्जत विधानसभा कार्यक्षेत्रातील विविध भागात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान नगरपरीषद यासह कर्जत नगरपरिषद खोपोली नगरपरिषद, खालापूर नगर पंचायत करिता नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपल्या पहिल्याच आमदारकीच्या कारकिर्दित करोडो रुपयांचा विकास निधी उपलब्ध करुन संपूर्ण विधानसभेतील जनतेची मन जिंकून घेतलेले एक सक्षम लोकप्रतिनीधी म्हणून ते ठरले आहेत.
विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या मुलभूत गरजांची पूर्तता करताना लाईट, रस्ते व पाणी या विषयांवर प्रामुख्याने भर दिला. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आज आमदार महेंद्र थोरवे या विधानसभेसाठी भरभक्कम विकास निधी उपलब्ध करत आहेत हे खरोखर या मतदार संघासाठी वाखणण्याजोग व महत्वपूर्ण योगदान म्हणाव लागेल. कर्जत विधानसभेतील लोकप्रिय, कार्यसम्राट व लोहपुरुषासारख उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणून आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे अशा विकास पुरुषाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा!
आबासाहेब पवार,नेरळ
सामाजिक कार्यकर्ता