Malhar Bungalow

Malhar Bungalow Excellent place to stay in Panchgani. Hill site location.

PRICE:-
MEDIUM MASTER ROOM WITH FURNITURE- 2,000 Rs/Day
BIG MASTER ROOM WITH FURNITURE- 2,500 Rs/Day
FULL BUNGALOW- 25,000 Rs/Day

09/03/2023
14/01/2023

१४ जानेवारी १७६१ पानिपत शौर्यदिन. तळहातावरती शीर घेऊन देशरक्षणासाठी लढणाऱ्या आणि लढता लढता मातीत मिसळणाऱ्या शुरांना, वीरांना शतशः नमन व विनम्र अभिवादन.
#पानिपत
#मराठाशौर्यदिवस🚩

20/10/2022

🙏🙏🚩🚩🚩🙏🙏

19/10/2022

कुणाला देव वाटले
कुणाला दैवत वाटले
कुणाला आपलेसे वाटले
कुणाला शत्रू असूनही विश्वासू वाटले
कुणाला धर्मनिरपेक्ष वाटले
कुणाला स्वातंत्र्ययोध्दा वाटले
कुणाला मुक्तिदाता वाटले
कुणाला रयतेचे वाली वाटले
कुणाला विश्ववंद्य वाटले
कुणाला राष्ट्रनिर्माता वाटले
कुणाला शेतकरी-कष्टकरी कामगार - सर्वसामन्यांचा कैवारी वाटले

"शेवटी कुणीही कुठल्याही बाजूने कुठल्याही अंगाने बघतीले तरी आपले शिवराय सर्वांना आपलेसे वाटले. "

जय जिजाऊ जय शिवराय

मराठा

26/09/2022

⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳

📜 २६ सप्टेंबर इ.स.१६७७
( अश्विन शुद्ध दशमी, शके १५९९, संवत्सर पिंगळ, बुधवार )

ज्ञछत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमे वेळी जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला व त्याच्या बंदोबस्तासाठी पुष्कळ पायदळ व घोडदळ ठेवून दिले. त्यांनी १४ मोठे किल्ले व ७२ मजबूत टेकडया काबीज केल्या. कर्नाटकातील बहुतेक सधन लोकांकडून अपार द्रव्य घेतले. महाराजांनी कर्नाटकांत जिंकलेल्या किल्ल्यांची डागडुजी व जिंकलेल्या प्रांतांचा बंदोबस्त रघुनाथ नारायण हणमंते यांनी केली म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांस २६ सप्टेंबर १६७७ या दसऱ्याच्या मुहूर्तावर दख्खनची मजमू व जिंजी प्रांताचा सरसुभा असे महत्त्वाचे अधिकार सोपविले. हणमंते यांनी कर्नाटक प्रांताचा बंदोबस्त चांगला ठेवून त्यांत आणखी भर घातली. पण छत्रपती श्री संभाजी महाराजांविरुद्ध जे कट रायगढला शिजले त्यांत हणमंते यांचे अंग आहे असे छत्रपती संभाजी महाराजांस कळून आले तेव्हा त्यांस कैद करवून त्या प्रांताचा कारभार हरजीराजे महाडीक या आपल्या मेहुण्यांकडे सोपविला. त्यांच्या मदतीस जैताजी काटकर आणि दादाजी काकडे या दोन मराठे सरदारांना जिंजीस पाठवून दिले. हरजीराजेंनि आपला जम कर्नाटकात चांगला बसविला होता. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत कर्नाटकातील महसूर, मदुरा, रामनाड, त्रिचनापल्ली एकेरी इत्यादी पाळेगारांची छोटी-छोटी राज्ये होती.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २६ सप्टेंबर इ.स.१६७९
महाराजांनी शामजी नाईक यांना विजापुरास रवाना केले.
विजापुरचा सरदार मसाऊदखान हा दिलेरखानास दाद देत नव्हता, म्हणून विजापुरचे भले भले सरदार व सर्जाखानासही फोडून आपल्या झेंड्याखाली आणले. दिलेरखानाने मोठ्या उत्साहाने भीमा ओलांडली व लगेच सप्टेंबर मध्ये त्याने मंगळवेढे जिंकून घेतले. नाईलाजाने मसाऊदखानाने विजापुरच्या रक्षणार्थ महाराजांना विनवणी केली. महाराजांनी शामजी नाईक यांच्या बरोबर १० हजार स्वार धान्य, आणि सामानसुमानांचे २ हजार बैल आनंदराव यांच्या नेतृत्वाखाली विजापुरास पाठविले. वकिल म्हणून विसाजीपंत नीळकंठराव हेपण विजापुरास निघाले. मसुदखानाने विजापुरच्या किल्ल्यावर संरक्षणाची व्यवस्था मजबूत करून ठेवली. महाराजांनी विजापुरवरिल संकट लक्षात घेऊन, मसाउदखानाशी बोलणी करण्यासाठी आपले मुत्सद्दी शामजी नाईक यांना रवाना केले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २६ सप्टेंबर इ.स.१६८४
सुर्यकांत इंग्रजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर झालेल्या त्यासंबंधी लंडनला पत्र पाठवले.
सुरतकर इंग्रजांच्या चुकीच्या धोरणाला कंटाळून मुंबईकर इंग्रजानी तिथल्या रहिवाश्यांच्या सहाय्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता झुगारून बंड केले आणि इंग्लंडच्या चार्लस राजाने मुंबई बेट ताब्यात घेतल्याचे जाहीर केले.मुंबईचा गव्हर्नर म्हणून रिचर्ड केजविन ची नेमणूक केली गेली.अधिकार मिळताच केजविनने मराठ्यांशी धरसोडीचे धोरण सोडून तह केला आणि सिद्दीचा बंदोबस्त करून त्याला मुंबईत प्रवेश बंद केला.केजविन ने या तहाची माहिती लंडनला कळवली होती,यावर लक्ष ठेऊन असणाऱ्या सुरतकरांनी लंडनला लिहून पाठवले की,"मुंबईच्या बंडखोराकडून संभाजीकडे गेलेल्या कॅ. गॅरीच्या कामाची आम्हाला कारवारकडून काहीच बातमी मिळाली नाही.परंतु संभाजीराजांनी त्यास झिडकारून लावला असून हा कारभार महागात पडला आहे.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २६ सप्टेंबर इ.स.१६८९
छत्रपती राजाराम महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातुन
छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर रायगडाला झुल्फिकारखानाचा वेढा पडला. रायगडावरील महाराणी येसूबाई आणि मुत्सद्दी मंडळींनी राजाराम महाराजांना स्वराज्याचे वारसदार बनवून त्यांचे मंचकरोहन केले.पुढील धोका ओळखून नियोजित योजनेनुसार राजाराम महाराज आपल्या निवडक सहकाऱ्यासह रायगड सोडून मुघलांना हुलकावणी देत प्रतापगड मार्गे पन्हाळगडावर आले.पण मुघलांनी पन्हाळ्यालाही वेढा दिला.मुघलांशी सुरू असलेली लढाई महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन आघाड्यावर लढण्यासाठी राजाराम महाराजानी जिंजीला जायचे ठरवले.त्यानुसार वेषांतर करून मानसिंग मोरे,प्रल्हाद निराजी,कृष्णाजी अनंत, निळो व बहीरो मोरेश्वर,खंडो बल्लाळ,बाजी कदम,खंडोजी कदम या व इतर काही सहकाऱ्यासह राजाराम महाराज पन्हाळ्यावरून मध्यरात्री गुप्तपणे निसटून गेले.छत्रपती राजाराम महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून गेले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २६ सप्टेंबर इ.स.१७१५
आदिलशाही राज्यात लपविलेली करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती छत्रपतींनी पुन्हा मूळ मंदिरात स्थापन केली, तो आजचा ऐतिहासिक दिनविशेष....
पातशाह्यांच्या काळात कोल्हापूर प्रांतावर आदिलशहाचा ताबा होता. या काळात सर्वत्र धामधूम माजलेली असायची. राज्यव्यवस्था स्थिर नव्हती. युद्धप्रसंगी मंदिरांची नासधूस केली जायची. अशावेळी देवीच्या मूर्तीस काही अपाय पोहोचू नये या हेतूने करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी देवीची मूळ मूर्ती मंदिरातून काढून नेऊन कपीलतीर्थाजवळ गुप्त ठेवली होती. पुढील काळात कोल्हापूर प्रांत स्वराज्यात आला. छत्रपतींचे स्थिरस्थावर राज्य स्थापन झाले, तेव्हा वेदशास्त्रसंपन्न नरहरभट सावगावकर यांनी करवीर राज्याचे अधिपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांची पन्हाळगडावर भेट घेऊन महाराजांस हा सर्व वृत्तांत सांगितला व आपणांस साक्षात्कार होऊन आई अंबाबाईने आपली मूर्ती मूळ ठिकाणी स्थापन करावी, असा दृष्टांत दिल्याचे महाराजांस सांगितले. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी आपले सेनापती सिदोजी घोरपडे - हिंदूराव गजेंद्रगडकर यांना अंबाबाईच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्याची आज्ञा दिली. महाराजांच्या आज्ञेनुसार सेनापती घोरपडेंनी सन १७१५ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करवीरनिवासिनीच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना केली. ती तारीख होती दिनांक २६ सप्टेंबर १७१५.

तोच हा आजचा ऐतिहासिक दिवस, जेव्हा एक शतकाहून अधिक काळ गुप्तपणे लपवून ठेवलेल्या अंबाबाईच्या मूर्तीची तिच्या मूळ मंदिरात पुनर्स्थापना झाली. छत्रपतींच्या स्थिर व सुरक्षित राजसत्तेचे ते प्रतीक होते. मूर्तीबद्दलची माहिती देऊन आपल्याकडून हे शुभकार्य घडवून घेतल्याबद्दल छत्रपती संभाजीराजांनी नरहरभट यांना काही पेठा व वतने इनाम दिली व देवीच्या नित्य पूजाअर्चेसाठी सावगाव हे गाव इनाम दिले.

छत्रपती संभाजीराजे (दुसरे) म्हणजे छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र होत.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २६ सप्टेंबर इ.स.१७५९
पेशवाईतील वन्यजीव रक्षण व जंगलतोड बंदी
पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य तीर्थशेत्र श्रीभीमाशंकर येथील होणारी वृक्षतोड व जंगली प्राण्यांची शिकार यावर बंदी घालावी याकरिता महादजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना २६-०९-१७५९ रोजी पत्रे लिहून यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी केली. जंगल व वन्यप्राणी यांचे संवर्धन याविषयी असलेली जागरूकता याविषयीचे महत्व विषद करणारी हि पत्रे म्हणजे तत्कालीन निसर्गाविषयी असलेली काळजी दर्शविते.

श्रीभीमाशंकर क्षेत्राच्या आजूबाजूस तीर्थक्षेत्र व वनराई असून त्यात विविध प्रकारचे प्राणी व पक्षी वास्तव्यास असतात. त्या ठिकाणी झाडांची तोड केली जाते. त्यासंबंधी ताकीद देण्यात यावी . तीर्थक्षेत्राच्या परिसरातील वृक्षतोड न करता तीर्थक्षेत्राच्या राईबाहेरील झाडांची तोड करावी. महादाजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना विनंती केली की, रामचंद्र कृष्णराव तसेच मुकादम आणि देशमुखांना भीमाशंकरच्या आसपासच्या प्रांतात झाडे न तोडण्याचे आदेश जारी करावेत.

श्रीभीमाशंकर क्षेत्रात निरुपद्रवी सांबर व अन्य वन्यजीव आश्रयास असतात. भोवर गावातील गावकरी व कोकण प्रांतातील लोक वन्य प्राण्यांची शिकार करतात. तीर्थक्षेत्राच्या तीन कोस परीसरात शिकार करण्यास मनाई करण्यात यावी . शिकार करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी. महादाजी राम कानिटकर यांनी नानासाहेब पेशवे यांना विनंती केली की, यासंबंधी ताकीद देणारी पत्रे जारी करावीत .

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀

24/09/2022

#शिवराय हा शब्द किती मोठा आहे हे लक्षात घेण्यासाठी शिवरायांच्या राजमुद्रेचा आशय खुप काही सांगुण जातो यामध्ये महत्वपुर्ण #तीन टपे पडतात अस मला वाटत
1) #प्रतीपचंद्रलेखववृद्धीष्णु
आहो शाहीजीपुत्र शिवराय तुम्हाला प्रतीपदेच्याचंद्राप्रमाणे स्वराज्याची सुरवात करायची आहे कारण स्वराज्य उभारणीसाठी तुमच्याकडे भांडवल शुन्य आहे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करायच आहे ...

2) #विश्ववंदीता #शाहाष्णाशिवशेषा
पण हे राज्य जरी छोटे असले तरी ते भारतापुरत मर्यादित नाही ठेवायच विश्ववंदीता याचा अर्थ ते आख्या विश्वाला वंदनीय आसल पाहीजे .....

3) #मुद्राभद्राय #राजते......
जरी हे राज्य तुम्ही निर्माण केलात तरी ते मराठ्यासाठी आणि कुणाच्या मालकीसाठी नाही तर ते रयतेतील सामान्य ते सामान्य प्रत्येक मावळ्यांसाठी आसेल ....
आणि हे राजमुद्रेतील अट शिवरायांनी आयुष्य भर पाळली याचाच अर्थ शिवरायांचा जन्म विश्वाच्याच उद्धारासाठी होता पण ईथे प्रत्येक पक्षाणी /नेत्यांनी शिवराय स्वताच्या स्वर्थासाठी वापरला आणि स्वार्थी भावनेतून शिवरायांच्या जन्माचा महाराष्ट्रातील वाद आख्या जगाला दाखवून दिला .....
#लेखन
सोपान कदम पाटील (नांदेड)
9921807339
9049786580
.

24/09/2022

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳

📜 २४ सप्टेंबर इ.स.१६५६
(अश्विन वद्य १ शके १५७८ प्रतिपदा वार बुधवार)

सुपे परगणा स्वराज्यात दाखल!
महाराजांनी मोहीते मामांना पत्र पाठवले की, "पागा घेऊन पुणे मुक्कामी येणे" पण मोहीते मामांनी महाराजांचे पत्र आणणार्‍या जासुदासमोर उर्मट जाबसाल करताना म्हटले की "शहाजीराजे समक्ष असता हे मालक नाहीत. हुकूम करितात आणि राज्यात पुंडावे करून ठाणी बसवितात हे राजांच्या प्रतिष्ठेवरी निभावले होते. याउपरी फैल (=पुंडावा) केला तरी राजांची शोभा राहणार नाही आणि हेही प्राणेकरून वाचणार नाहीत. काही आपले पायाकडे पाहून करावे. म्हणजे मामांनी भाच्यालाच "प्रौढ" उपदेश केला. आपल्याच तोऱ्यात वावरणाऱ्या मामांनी पत्राचा जबाब पेश केला नाही की ते स्वतःही महाराजांच्या भेटीस गेले नाहीत. महाराजांच्या सूचनेकडे त्यांनी सरळसरळ दुर्लक्ष केले. संभाजी मामा हे जसे शहाजीराजेंचे शालक व महाराजांचे मामा होते तसेच ते शहाजीराजेंचे व्याहीही होते. म्हणजे मामाची मुलगी अन्नुबाई ही शहाजीराजेंचे पुत्र व्यंकोजीराजे यांना दिली होती. बहुधा या नाते संबंधांमुळे महाराज आपणास हात लावणार नाहीत असा मोहीते मामांचा अंदाज असावा. पण मामा बऱ्या बोलाने वळत नाहीत हे लक्षात येताच महाराजांनी इ.स.१६५६ च्या अश्विनात दसरा उलटल्यावर अकस्मात सुप्यावर हल्ला चढविला. गढीत फारसे बळ नव्हतेच. सुपे लगेच महाराजांच्या ताब्यात आले. महाराजांनी क्षणार्धात मोहीतेमामांना कैद केले. गढीत बरेच द्रव्य कापडचोपड, वस्तू व पागेत ३०० घोडे होते. हे सर्व महाराजांनी जप्त केले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://youtube.com/shorts/XSUNBCNI2Zc?feature=share

📜 २४ सप्टेंबर इ.स.१६७१
छत्रपती शिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर
१६७१ साली कोकणातील दाभोळ इथे नारळ स्वस्तात विकले जात होते. ज्यामुळे आसपासच्या परिसरात नारळाच्या व्यापारावर परिणाम होत होता. शिवाजी राजांच्या हे लक्षात येताच त्यांनी मामले प्रभावळीचे सुभेदार तुकोराम यांना नारळाच्या विक्रीबाबत दक्षता घ्यावी ह्याबद्दल हे पत्र लिहिले आहे. शिवाजी राजांचा आत्मविश्वास आणि व्यापार नीती पत्रात स्पष्ट दिसून येते. मशहुरल हजरत मायन्याचे २४ सप्टेंबर १६७१ रोजी लिहिलेले हे पत्र शिवाजी राजांच्या राज्याभिषेक पूर्वीच्या पत्रात दिसणाऱ्या जुन्या मायन्यांपैकीचे एक आहे. शिवशाहीच्या त्रिशुळाने जिंकलेला कोकणच्या प्रदेशात स्थिर झाल्यानंतर, मराठ्यांचा आत्मविश्वास चांगलाच बळावला असावा. त्याचा परिणाम अश्या पत्रांतून रूंदावणाऱ्या व्यापारी हेतूतून आणि एक केंद्रशासित सत्ता आणि व्यवस्थापन व्हावे ह्या नीतीतून दिसतो. स्वराज्य चौफेर वाढत असताना देखील केंद्रशासित रहावे तेव्हा कुडाळच्या नरहरी आनंदराव सुभेदाराला देखील डिसेंबर १६७१ मध्ये असाच एक जबर जकातीचा हुकुम महाराजांनी पोर्तुगीज मीठावर लावावा असे लिहिलेले दिसून येते.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २४ सप्टेंबर इ.स.१६७४
( अश्विन शुद्ध पंचमी, शके १५९६, संवत्सर आनंद, गुरुवार )

शिवरायांचा दुसरा राजाभिषेक :-
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक का करून घेतला? तो कोणी व कसा केला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल का?
स्वराज्य चे स्वप्न २ पिढ्यांनी पाहिले होते. फर्जंद महाराजा शहाजीराजेंनी अथक प्रयत्न करून केलेल्या पायाभरणी वर त्यांच्या पुत्र शिवरायांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करत सुवर्ण कळस चढविले आणि ह्या मायभूमीचे पांग फेडले. ई. स. १६७४ साली रायगडावर अवघ्या इतिहासाच्या साक्षीने वैदिक पद्धतीने राज्याभिषेक सोहळा पार पडला. अखेर मराठी मातीला गादी मिळाली. हिंदूंचे तख्त निर्माण झाले. ह्या म्लेंच्छ बादशाही मध्ये एक मऱ्हाटा एवढा पातशहा झाला. ६ जून, १६७४ साली झालेला राज्याभिषेक सोहळा जवळपास सर्वांनाच माहीत आहे. परंतु, त्याच्या २-३ महिन्यांच्या नंतर सप्टेंबर महिन्यात शिवरायांनी अजुन एक* *राज्याभिषेक करुवून घेतला , तो म्हणजे तांत्रिक राज्याभिषेक. ह्या राज्याभिषेकाबद्दल ची माहिती आपल्याला गोविंद नारायण बर्वे लिखित " शिवराज राज्याभिषेक कल्पतरू " नावाच्या ग्रंथामध्ये मिळते. मूळ ग्रंथ हा ई. स. १६९९ मध्ये लिहलेला असून तो संस्कृत भाषेत होते. आज ही पोथी Indian Asiatic Society, Calcutta मध्ये ठेवण्यात आली आहे.

तांत्रिक राज्याभिषेकाच्या पौरोहित्य हे निश्चल पुरी गोसावी ह्यांनी केले. ते गोसावी पंथाचे असून यजुर्वेदाचे निष्णात अभ्यासक होते. ते मूळचे वाराणशीचे होते. निश्चल पुरींनी हा तांत्रिक राज्याभिषेक " आनंद नाम संवत्सर अश्विन शुद्ध पंचमी " ह्या तिथीला (म्हणजेच २४ सप्टेंबर, १६७४) प्रातःकाळी उठून कलश स्थापन करून राज्याभिषेक विधी सुरू केला.

उपलब्ध पोथी मध्ये एकूण ८ शाखा (भाग) आहेत. ह्यातील पहिल्या ४ प्रकरणात निश्चल पुरी आणि गोविंद बर्वे ची झालेली भेट आणि वैदिक राज्याभिषेकाचे वर्णन आहे. ५ व्या प्रकरणात निश्चल पुरी नी केलेल्या तीर्थ यात्रेचे वर्णन तसेच महाराजांनी निश्चल पुरीस केलेली विनंती, असा गोषवारा आहे. ६ व्या आणि ७ व्या प्रकरणात तांत्रिक राज्याभिषेकाचे वर्णन आहे. तसेच ८ व्या प्रकरणात राज्याभिषेकाचा महाराजांवर झालेल्या परिणामाचे वर्णन केलेले आहे.

हा विधी फक्त एका दिवसाचा होता. निश्चल पुरींनी प्रातःकाळी उठुन कलश स्थापना केली. त्यानंतर सर्व पूजा विधी तंत्रानुसार केली. नाना रंगानी आकर्षक बनवलेले मेरुयंत्र यंत्र उचलून घेतले. ललित पंचमीच्या योगावर अभिषेकाचा महोत्सव झाला. ते स्थान छतानी आणि खांबानी सुशोभित झाले होते. मंडपानी अलंक्रुत झालेले होते.

त्यानंतर सिहासनाच्या ठिकाणी मंडपामध्ये कलशांची पुजा करुन भुमी विधीपुर्वक शुद्ध केली. ती पंचरत्नानी पुर्ण केली.

त्यानंतर सिंहासाठी बळी अर्पण केले. आसनाच्या पूर्व दिशेस हर्यक्ष नावाच्या सिंहास पशुचा बळी दिला. दक्षिणेला पंचास्य नावाच्या यमाला घाबरविणारा स्थापन केला व बळी दिला. नैऋत्येला केसरी नावाचा बळीचे भरपूर भोजन करणारा स्थापन केला व बळी आर्पण केला. पश्चिम बाजुस मृगेंद्र स्थापन करून बळी दिला. वायव्येला शार्दुल स्थापित करुन त्यास पशुचा बळी दिला. उत्तरेला गजेंद्र स्थापन करून त्यास पशुचा बळी दिला. शंकराच्या दिशेला बळीचे रक्षण करणारा हरी नियुक्त केला. अशाप्रकारे आठ जणाच्या पाठीवर आसन स्थिर केले.

निश्चल पूरीनी रत्नमय वेदीवर रुप्याचे मोठे आसन स्थापित केले आणी अभिषेकासाठी महाराजांना त्यावर बसवले. तेथे आठ दिशेला आठ कलश स्थापन केले आणि त्याची रत्नानी पूजा केली.

त्यानंतर त्यांनी महाराजांना आसनावर बसविले. स्वजनाना दुर पाठवुन सर्व आवयवाना शुभप्रद अशा महामंत्रानी वेष्टन घातले. त्यावेळी राजसभेत नगारा वगैरेवाद्ये वाजविली जात होती. वेदपारंगत ब्राह्मण साममंत्र गात होते.

त्यानंतर महाराजांनी नवीन वस्त्रे परिधान केले व अन्नाच्या पर्वतास नैवेद्य दाखवला.त्यामुळे रायरी पर्वत संतुष्ट झाला.त्यानंतर निश्चलने महाराजाना विद्येचा उपदेश केला.

त्यानंतर महाराजानी घरात प्रवेशकेला व भोजन करुन राजसभेकडे आले. या विधीत दहा महामंत्र,राजराजेश्वरी विद्या, ब्रह्मस्त्र महाविद्या व ६४ तंत्र विद्या महाराजाना दिल्या, असे ह्या पोथी मध्ये लिहला आहे.

निश्चलपुरी गोसावी नी दुसरा राज्याभिषेक केला.तमाम इतिहासकारांनी संभाजी महाराजांना शाक्त पंथ चे पूजक असल्याचे आरोप केले अन निश्चलपुरी गोसावी हे पण शाक्त पंथांचे होते .

शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक हा वेदिक पद्धतीने गागाभट्ट यांनी केला. गागाभट्ट ने त्यानुसार शिवाजी महाराजांनी गागाभट्ट यांच्या शी चर्चा करून राज्यभिषेक रायगड वर करण्याचा निर्णय घेतला.

१४ व्या आणि १५ स्या शतकात पैठण हे विद्वानांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते.तिथेच भट्ट आणि शेष नावाचे दोन घर प्रसिद्ध होते.भट्ट यांच्याच घरातील गोविंद भट्ट हा पैठणहून काशीस गेले आणि त्यांच्या च घरात हे गागाभट्ट जन्माला आले होते.

अकबर च्या कारकिर्दीत शेष नावाचे यांनी शुद्रचार्शिरोमनी ग्रंथ लिहिला आणि त्यात लीहाले की क्षत्रिय या जगात संपले याचाच समाचार गागाभट्ट यांनी कर्यास्याधर्मपदिप नावाचं एक ग्रंथ लिहिला आहे.त्यात त्यांनी शुद्रचार्शिरोमनी नावाच्या ग्रंथाचा समाचार घेतला आहे.

महाराष्ट्रात काही शतके असा राज्यभिषेक झाला नव्हता आणि खिलजी च्या आक्रमण नंतर अशी विद्वान लोक शिल्लक नव्हती.त्यामुळे या शेष घराण्याचे मत शिवाजी महाराजांना मानावल नाही बाळाजीआवाजी, केशावभट्ट , भालचंद्र भट्ट यांनी राजस्थानला जाऊन सर्व महाराजांच्या कुळाची माहिती घेतली. रीतीने ६ जून १६७४ ला पहिला राज्यभिषक झाला.

याच राज्यभिषेक ल निश्चलपुरी गोसावी आमंत्रित म्हणून उपस्थित होते. राज्यभिषेक नंतर ते कोकणात सर्व क्षेत्री फिरले तिथे त्यांनी गोविंद या ब्राम्हण विद्वान ना भेटले आणि राज्यभिषेक ची माहिती दिली. त्यात त्यांनी घटना सांगितल्या शिवाय पहिला राज्यभिषेक झाल्यावर निश्चलपुरी नी शिवाजी महाराज ना जाताना सांगितले की राजा १३ व्य, २२ व्यां ,५५ व्यं आणि ६५ दिवशी खेद जनक गोष्टी घडतील. १३ व दिवशी जिजाबाई आऊसाहेबांचे निधन झाले.रायगडवर हत्ती मरण पावला.

१) राज्यभिषेक अगोदर राजांची पत्नी काशीबाई यांचे निधन झाले

२) राज्यभिषेक आधी सेनापती गुर्जर यांचे पण निधन झाले

३) राज्यभिषेक का वेळी गायोच्युदेश च्यां आदल्या रात्री उल्कापात झाला.

४) राज्यभिषेक च्याच वेळी शिवाजी महाराजांनी पुनः आपल्या पत्नीशी विवाह केला जे अपशकुनी होते असे निश्चलपुरी चे म्हणणे होते

५) सुवर्णतुला वेळीस एक लाकूड पडले आणि गागाभट्ट च्या नाकास लागले

६) गागाभट्ट ने त्याच्या ब्राम्हणांना आहेत दिला याच राग पण निश्चलपुरी ने बोलून दाखविला

७) राज्यभिषेक वेळी बळभट्टाच्या अंगावर लाकडी फुले पडले

८) निश्चलपुरी मात्र राज्याभिषेक हा कुमुहूर्तावर होता

९) स्थानिक देवांचे पूजन आणि बलिदान न दिल्यामुळे निश्चलपुरी बोलले की राज्यभिषेक अपशकुनी झाला आहे.रायगडवर शिकाई देवीची पूजा केली नाही.कोकण रक्षक भार्गव ची पूजा केली नाही.हनुमान आणि वेताळ ल पुजले नाही.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २४ सप्टेंबर इ.स १६८४
(भाद्रपद वद्य १०, दशमी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर वार बुधवार)

फितुरी सुरुच!
राअंदाजखानाच्या कौलनाम्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांचा नोकर भद्रोजी हा चाकरीच्या आशेने आला. त्यास मनसब येईपर्यंत रोजीना दिला जावा असा हुकूम खंडोजी हासुद्धा काझी हैदर याच्या मध्यस्थी मार्फत मुगलांकडे आले त्यांना मनसदी व त्यांचा उत्कर्ष करण्याचा हुकूम देण्यात आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २४ सप्टेंबर इ.स.१६९०
छत्रपती संभाजी महाराजांच्या अखेरच्या काळात स्वराज्यातील अनेक वतनदार मुघलांच्या सेवेत जायला सुरुवात झाली होती. याला प्रमुख कारण होते वतनदारांची वतनाप्रती असलेली आसक्ती. छत्रपती शिवाजी महाराजांचा वतनदारीला विरोध होता. त्यांनी वतने सरकारजमा केली होती व त्यांच्या सेवेबद्दल रोख रक्कम म्हणजे वेतन द्यायला सुरुवात केली होती. पण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बदललेल्या परिस्थितीत छत्रपती राजाराम महाराजाना हा निर्णय बदलावा लागला. वतनदार मंडळी स्वराज्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी महाराजाना देशमुख, देशकुलकर्णी,मोकदम व इतरांची वतने परत करावी लागली. छत्रपती राजाराम महाराजाना हा निर्णय कोणत्या परिस्थितीत घ्यावा लागला ते आपल्याला मुठेखोरेच्या हवालदार व कारकून यांना मावळ प्रांताचे सुभेदार महादजी शामराज यांनी पाठवलेल्या पत्रातून लक्षात येते.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २४ सप्टेंबर इ.स.१७०९
"राजा शाहू मोठी फौज घेऊन चंदनगडातून बाहेर पडला ,त्याने मराठे सरदारास आज्ञा केली, बादशाहने सरदेशमुखी वतन आम्हास बहाल केले आहे, तुम्ही उत्तर प्रांतातून त्याचा वसूल आणा , चौथाईचा वसूल यावयाचा तो आला नसेल तर बादशाही "खजिने लुटून " भरपाई करून घ्या ." हे आदेश मोगलांनी नोंदविलेले आहेत व ते उत्तरेशी संबंधित आहेत.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २४ सप्टेंबर इ.स.१७२४
पेशवे बाजीराव यांची निजामाशी दिनांक १८ मे सन १७२४ रोजी नालछा येथे भेट झाली. मुबारिजखान याच्या विरोधात निजामास मदत करण्याचे पेशवा बाजीराव यांनी आश्वासन दिले. चारच महिन्यांनी म्हणजे सन १७२४ च्या सप्टेंबर महिन्यात पेशवा बाजीराव यांनी पातशाही सुभेदार मुबारिजखान याचा सपशेल पराभव केला. हा पराक्रम पाहून निजामाने पेशवा बाजीराव यांना "शहामतपनाह" हा किताब दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २४ सप्टेंबर इ.स.१८६१
मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म
या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. १९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ’वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २४ सप्टेंबर इ.स.१८७३
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणार्‍या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -
“विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”
जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀

Don't wait book with Malhar Bungalow this diwali!
28/10/2018

Don't wait book with Malhar Bungalow this diwali!

Featuring a garden, Malhar Bungalow is located in Panchgani in the Maharashtra region, 2.2 miles from Sydney Point.

Address

Khinger Road
Panchgani
412805

Telephone

+919821554135

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malhar Bungalow posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Malhar Bungalow:

Share

Category

Our Story