Bambusa Agro Tourism Center, Mangurda बांबूसा कृषी पर्यटन केंद्र, मांगुरडा

  • Home
  • India
  • Pandharkawada
  • Bambusa Agro Tourism Center, Mangurda बांबूसा कृषी पर्यटन केंद्र, मांगुरडा

Bambusa Agro Tourism Center, Mangurda बांबूसा कृषी पर्यटन केंद्र, मांगुरडा Bambusa Home Stay was started by Ajay and Yogini Dolke at their farm in Mangurda Village near Pandharkawada.

It is situated next to central India's biggest Bamboo plantation with 54 species, and the Dolke Family Farm.

Hearty Wishes on Word Bamboo Day 18th Sept 2025. Dendrocalamus gigentus (ब्रम्हा बांबू) at Bambusa Agro Tourism Center a...
18/09/2025

Hearty Wishes on Word Bamboo Day 18th Sept 2025. Dendrocalamus gigentus (ब्रम्हा बांबू) at Bambusa Agro Tourism Center at Mangurda, Taluka Kelapur, District Yavatmal.

बांबूसा   एक बेधुंद अनुभव!भाग 2सगळ्यांची अगत्याचे चौकशी करून खाण्या पिण्याचे नखरे  समजून घेण्यात थोडा वेळ गेला असेल. मग ...
09/09/2025

बांबूसा एक बेधुंद अनुभव!
भाग 2
सगळ्यांची अगत्याचे चौकशी करून खाण्या पिण्याचे नखरे समजून घेण्यात थोडा वेळ गेला असेल. मग आम्ही नाश्ता करून टेरेस बघून आलो. वा वा काय तो निसर्गाचा टुमदार साज! नुकताच पाऊस होऊन गेल्यावर मातीचा एक वेगळाच गंध ,त्यात पुढं पूर्ण हिरव्यागार गवतावर पडलेलं पाण्याच प्रतिबिंब, एकदम आगळावेगळा, तारुण्यात घेऊन जाणारा आनंदी जल्लोष!
बाग बगीच्याची माहिती देतांना अजय ला जोश च सांगत हा नितांत निसर्गप्रेमी असावा.
मग आम्ही थोडं रस्त्याने फेरफटका मारायला निघालो. तर आमच्याबरोबर त्यांचा कडील 3 कुत्रे पण मालकाच्या बरोबर निघाले.आमच्याकडे कुत्रा बद्द्ल अजिबात च आत्मीयता नाही कुठल्याही कुत्रा ला हाड हाड करणे एव्हढ च माझं श्वान प्रेम! पण सारखे शेपटी हालवून अंगलट करायचे मग कोणी काडी घेऊन रस्त्यावर भ्रमंती सुरू होती. एवढी शुद्ध हवा ,आजूबाजूला नवनवीन पक्षी त्यामुळे उत्साह चेतवणारा तो फेरफटका होता. त्यात गुण सगुण बद्दलची महती मिळाली.आता संध्याकाळ बेधुंद होणार याची खातरजमा झाली एकदाची!
मग मैत्री ची वीण घट्ट करण्यासाठी आम्ही गाडीने लगेच पांढरकवडा गाठून उचित साहित्य घेऊन थोडाफार आस्वाद रस्त्यातच घेऊन आम्ही पुन्हा बांबूसा ला पोहोचलो.

आता नवं ऊर्जा प्राप्त झाल्याने बांबूवन चा फेरफटका खरेच अविस्मरणीय अनुभव होता. त्यांनी त्याची अभ्यासपूर्ण माहिती आम्हाला दिली. बांबू कोणत्या species मध्ये येतात पासून त्याचे उपयोग, त्यांच्या जाती,त्यांचे आयुष्य ,त्यांची रोजची होणार वाढ अबब किती तो गाढ अभ्यास! मला पण अश्या गोष्टी जास्तच आकर्षित करतात. खूप कमी लोकांच्या बाबतीत असे घडते तुमचा छंद ,तुमची आगळीवेगळी आवड तुम्हाला समाजात प्रतिष्ठा मिळवून देते. तिथे एक झोपाळा व वर लोखंडी structure वर टेरेस तयार असबेस्टस च्या शीट लावून एक प्रशस्त view पॉईंट केला आहे . खरोखरच तिथून जेव्हा बांबूवनात बघितलं की आपण च निसर्गाच्या या किमये पुढे नतमस्तक होतो!
क्रमशः

Guest Testimonials, part 1बांबूसा ,बांबूमय आदरातिथ्यभाग१बऱ्याच दिवस काय वर्षांपासून मुकुंदा कडून  अजय च्या बांबूवन महती ...
08/09/2025

Guest Testimonials, part 1
बांबूसा ,बांबूमय आदरातिथ्य
भाग१
बऱ्याच दिवस काय वर्षांपासून मुकुंदा कडून अजय च्या बांबूवन महती ऐकून होती आणी bucket लिस्टमध्ये त्याच नाव होतेच. शेवटी योग आलाच.
सकाळी च आम्ही 8 जण दोन गाड्या घेऊन प्रस्थान सुरू झाले. Driving कोणी करत बा म्हणूनच मी नेहमीप्रमाणे जोखीम व जबाबदारी पूर्ण अशी उपदेशक ची भूमिका घेऊन, पल्लवी ला गाडी चालविण्यासाठी देऊन टाकली.
मुकुंदा , अपर्णा व आम्ही legend च्या समोर फोटो सेशन करून legends मंडळी ची वाट बघत होतो.
पावसाळ्यात मस्त निसर्गाने हिरवी शाल पांघरून सज्ज असतो आभाळ हळू हळू काळेभोर होत होते . एकदम आल्हाददायक वातावरणात आमचा प्रवास सुरु असताना कधी जांब आले कळलेच नाही. नुसतं गंतव्य ठिकाणी पोहोचणे हे च उद्दिष्ट न ठेवता खात पीत रमत गमत जावं
नाश्ता करून आम्ही पुन्हा मार्गी लागलो पावसाने आता चांगलाच जोर पकडला होता शेवटी 11 च्या सुमारास आम्ही mangurda ला गेट वर पोहोचलो पण अक्राळविक्राळ पाऊस गाडीतून बाहेर ही पडू देई ना. आत गेलो
मुकुंदा चा मित्र अजय स्वागतासाठी सज्ज होता पहिल्या क्षणी त्याने मन जिंकले होते.बांबूसा मध्ये आमच्या स्वागतासाठी खास वरूण राज प्रेमाचा वर्षाव करीत होता. काही क्षणात आम्ही सर्व त्या आल्हाददायक ,मेहनतीने फुलवलेल्या निसर्गाच्या मोहात पडलो. खरेच हे असामान्य,अवलिया अजय सारख्या चे काम. राहण्याची व्यवस्था खूपच मस्त पुढं निसर्गाने पसरवले ला हिरवागार गालिचा!
एका बाजूला टुमदार प्रशस्त बंगला चहुबाजूंनी घरात येणे जाणे सुलभ असे होते तिथेच अजय ची सहचारिणी योगिनी ची ओळख झाली. ह्या दोघांनीही आम्हाला इतक्या लवकर आपलंसं केले . मी त्या बाबतीत खूप selective आहे पण कोणी पटले की resonance लगेचच होतो.अजय आणी योगिनी ला बांबू प्रेमी अवलिया च म्हणायला हवे.बांबू म्हणजे सरळ,लवचिकता,टिकाऊ व साधेपणाचे साक्षात प्रतिक! म्हणून च या दोघानीं हे गुण पूर्णपणे आत्मसात केले आहेत.

08/08/2025
Celebrating Raksha Bandhan with us at Bambusa! Special snacks for all!!
06/08/2025

Celebrating Raksha Bandhan with us at Bambusa! Special snacks for all!!

Address

Bambusa Agro Tourism Center, Near Mangurda Village, Kelapur Taluka, Yavatmal District
Pandharkawada
445302

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bambusa Agro Tourism Center, Mangurda बांबूसा कृषी पर्यटन केंद्र, मांगुरडा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bambusa Agro Tourism Center, Mangurda बांबूसा कृषी पर्यटन केंद्र, मांगुरडा:

Share