14/03/2024
आदर्श प्रतिष्ठानचा 18 वा वर्धापन दिन,पुरस्कार सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृह ठाणे येथे मोठ्या दिमाखात साजरा झाला.
वैश्य ग्लोबल बिजनेस ग्रुप, सॅटर्डे क्लब, वैश्यवाणी समाज, ट्रेनर्स असोसिएशन आणि आदर्श प्रतिष्ठानचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून... राष्ट्रपती पुरस्कार विजेते,लेखक,प्राध्यापक अशोक चिटणीस सर, सॅटर्डे क्लबचे मॅनेजिंग ट्रस्टी अशोकराव दुगाडे सर, यशस्वी उद्योजक दीपक मेजारी जी, बेडेकर मॅनेजमेंट कॉलेज चे संचालक नितीन जोशी, वैश्य सहकारी बँकेचे संचालक प्रदीप गांगण, एडवोकेट विलास गांगण, कोकणस्थ वैश्य समाजाचे भाई शेट्ये, जागृती गांगण, मेघना थरवळ, रचना व अमित बागवे, दीपक शिंदे, आरती बनसोडे, नितीन बोरसे, काही नगरसेवक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
याप्रसंगी उद्योगभूषण या पुरस्काराने संजय भाट, मनोज आंग्रे, संतोष दलाल, गणेश महाडेश्वर आणि अनेक सामाजिक संस्थांना सन्मानित करण्यात आले. सभागृह भरून अनेक माणसं शेवटपर्यंत उभी होती. रेखा चव्हाण, वैष्णवी, साक्षी सावंत यांच्या समूहाने बहारदार नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
*अनेक लोक खूप लांबून लांबून आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाला आले होते. माझ्या वाढदिवसा निमित्ताने हजारो लोकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. तुमच्या सर्वांच्या ❤️प्रेमाने मी भारावून गेलो आहे.*
*कालच्या यशस्वी कार्यक्रमानंतर आमची जबाबदारी वाढली आहे. असेच 🤝सहकार्य, 🙌 आशीर्वाद, माया, प्रेम ❤️ आपण कायम आमच्यावरती व्यक्त कराल हिच अपेक्षा.*
रवींद्र खानविलकर, राजेंद्र गोसावी, वैशाली बुरडे, नेहा मठकर, श्रद्धा कामेरकर,बंधू नारकर, बाळकृष्ण म्हसकर, शिरीष दोशी हे आमचे पदाधिकारी तसेच हितचिंतक सभासद रमेश कल्लोळकर, रेखा चव्हाण, साक्षी सावंत, दर्शन पावसकर, अभिजीत चौधरी, सुरज ठकेकर, राकेश लेंढे, संजीव शिरसाठ, धनश्री सुकी, संतोष कोकाटे आदी
या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे आपण हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
*परमेश्वर आपणा सर्वांना सुख, समाधान, समृद्धी, संपत्ती व उत्तम आरोग्य देवो हीच प्रार्थना🙏*
*पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद 🙏*
-डॉ. संतोष कामेरकर
आदर्श प्रतिष्ठान
*१३ मार्च आदर्श प्रतिष्ठान १८ वा वर्धापन दिन, पुरस्कार सोहळा आणि मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न... पहा क्षणचित्रे..*
604 new items · Album by Navvarsha swagat Yatra