04/06/2026
भाडेकरू ठेवताना सावध रहा
BSNLची ८० लाखांची कॉपर केबल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद...
वानवडी पोलिसांच्या तपास पथकाने कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान हडपसर इंडस्ट्रीयल एरियातील ड्रेनेज लाईनमधील BSNLची ३४.८० लाखांची कॉपर केबल चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पाठलाग करून पकडले.
अस्लम सगीर खान (वय. ३९, तिलकनगर, वेस्ट दिल्ली), आरिफ कुंन्दुखाँ खान (वय ४०,उत्तरप्रदेश), शोहेब हारुण खान (वय २५, उत्तरप्रदेश), सलमान इद्रीस मलीक (वय ३३, दिल्ली), नरेश कुमार श्रीशिवचरण, (वय ४३, हरियाणा), नवी मोहम्मद शान मोहम्मद (वय ३५, उत्तरप्रदेश), अनिस अन्सारी मोहम्मद गियासुद्दीन (वय २२, हडपसर, पुणे), अफाक अन्सारी रफिक अन्सारी (वय २२, हडपसर), प्रविण दादासाहेब बागुल (वय ३३, हडपसर) अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून ड्रेनेज पाईपलाईनमधून कॉपरची वायर क्रेनच्या सहाय्याने ओढुन बाहेर काढून चोरी करताना ३४,८०,००० रुपयांची कॉपर केबल व त्या काढण्यासाठी वापरलेले क्रेन, आयशर ट्रक व एक मोपेड गाडीसह ८०,७०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांच्यासोबत सरताज हुसेन (फिरोजाबाद उत्तरप्रदेश) अमन (बिहार), तौफीक (उत्तरप्रदेश), अली मोहम्मद ऊर्फ लल्लन (दिल्ली), अनिल देडे (रामटेकडी, हडपसर) यांचा देखिल सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. वरील सर्व आरोपींविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
ही कारवाई परिमंडळ ०५ च्या पोलीस उप-आयुक्त श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहा. पोलीस आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गुन्हे निरीक्षक संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, उमाकांत महाडिक व पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, शशीकांत लोंढे, पोलीस अंमलदार अमोल पिलाणे, महेश गाढवे, दया शेगर, गोपाळ मदने, अर्षद सय्यद, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे, विष्णू सुतार, बालाजी वाघमारे, गणेश भुजबळ, वैभव निकम व हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार बापू लोणकर, महावीर लोंढे या पथकाने केली आहे.
पुढील तपास पो.उप.नि. अल्फाज शेख हे करीत आहेत.
#वानवडी