Agriwala

Directions Website

Agriwala agriwala is a network of 8500 plus of farmers, trained to grow best quality residuefree vegetables. B2B- Food processors, exporters, trders
B2C- Hou.

we also supply organic perishable and nonperishable agroproduce. Societies, hotels, kitchens etc.

 #मारिको_इनोवेशन_फाऊंडेशन (MIF) तर्फे इनोवेशन फॉर इंडिया अवॉर्ड्स 2025 साठी अप्लाय करा दर दोन वर्षांनी होणारा हा कार्यक्...
21/06/2024

#मारिको_इनोवेशन_फाऊंडेशन (MIF) तर्फे इनोवेशन फॉर इंडिया अवॉर्ड्स 2025 साठी अप्लाय करा
दर दोन वर्षांनी होणारा हा कार्यक्रम सामाजिक, पर्यावरणीय किंवा आर्थिक प्रभाव निर्माण करणाऱ्या भारतीय संस्थांचा सन्मान करण्यासाठी आहे. यात फॉर प्रॉफिट (व्यावसायिक संस्था) किंवा not फॉर प्रॉफिट (सामाजिक संस्था, ट्रस्ट, सरकारी आस्थापने) असे अप्लाय करू शकतील.
कमेंटमधील लिंक वर अर्ज करा, जिंका आणि पुढील लाभ मिळवा.
विजेत्यांना मिळणारे फायदे:
१. MIF च्या विशेष "इनोविन डे" मध्ये संभाव्य भागधारकांशी नेटवर्क करण्याची संधी
२. प्रत्येक विजेत्याला 1.5 कोटी रुपयांचे मीडिया कव्हरेज आणि डिजिटल प्रसिद्धी, जोश टॉक्समध्ये मिळणार संधी आणि "द बेटर इंडिया" सोबत एक विशेष व्हिडिओ
३. MIF च्या "स्केल-अप" कार्यक्रमात प्रवेश (पात्रता निकष पूर्ण केल्यास)
४. प्रसिद्ध प्रशिक्षक श्री रविशंकर अय्यर आणि अपर्णा मेहरा यांच्याकडून कोचिंग
५. ग्रँड फिनालेमध्ये भारतातील टॉप लीडरशीप पुढे आपले काम सादर करण्याची संधी

अर्जासाठी लिंक कमेंटमध्ये

एफपीओचे डिजिटलीकरण का गरजेचे? अक्ख जग डेटावर चालते आहे. डेटाचा वापर ज्यांना करता आला ते उद्योगात यशस्वी होत आहेत. म्हणून...
17/06/2024

एफपीओचे डिजिटलीकरण का गरजेचे?
अक्ख जग डेटावर चालते आहे. डेटाचा वापर ज्यांना करता आला ते उद्योगात यशस्वी होत आहेत. म्हणूनच आजच्या व्हिडिओत समजून घेऊयात की शेतकरी उत्पादक कंपन्यांना डेटा व्यवस्थापन आणि डिजिटलीकरणाची गरज का आहे.

१. डेटा व्यवस्थापन:
एफपीओ कडे शेतकऱ्यांचा, त्यांच्याकडील संसाधनांचा, उत्पादनाचा, खरेदी विक्रीचा रियल टाइम डेटा असायलाच हवा. यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात कोणती पिके, किती क्षेत्रात लागवडीखाली आहेत, संभाव्य उत्पादन आणि त्यानुसार पुढील नियोजन करता येईल.

२ पुरवठा साखळी व्यवस्थापन :
डेटा-चलित पुरवठा साखळी व्यवस्थापन अमलात आणा. कृषी निविष्ठा विक्री , साठ्याची माहिती, वितरण नियोजनासाठी तसेच कृषिमाल गोळा करणे (लॉजिस्टिक), विक्री, करार शेती नियोजन यासाठीही सॉफ्टवेअर वापरा.

३. प्रिसिजन फार्मिंग:.माती, पाणी आणि पीकाचा डेटा गोळा करा. संसाधनांचा योग्य वापर करून पीक उत्पादन वाढवा. आयओटी, खते व्यवस्थापन, सूक्ष्मसिंचन , रिमोट सेन्सिंग, हवामान अनुकूल शेती तंत्राचा अवलंब करा.

४ ग्राहक संबंध व्यवस्थापन (CRM):
शेतकऱ्यांशी झालेल्या संवादांचा मागोवा घेण्यासाठी आवश्यक असे सॉफ्टवेयर CRM प्रणाली वापरा. यामध्ये खरेदी इतिहास, प्राधान्ये आणि अभिप्राय नोंदवून ठेवा. या डेटाच्या आधारावर सेवा, उत्पादने विक्रीचे नि योजन करा.

५. प्रशिक्षण आणि कौशल्य विकास: शेतकऱ्यांना कोणत्या क्षेत्रात प्रशिक्षणाची गरज आहे हे ओळखण्यासाठी डेटा वापरा. त्यांची उत्पादकता सुधारण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करा.

थोडक्यात एफपीओ ने आता टेक्नोसॅव्ही व्हायलाच हवे.

10/01/2023

फीलीपिंस मध्ये कांद्याचे दर भडकले आहेत.
मागील १४ वर्षां मधील ही सर्वात मोठी दरवाढ आहे. लाल कांदा तेथे १००० रू. / किलो पर्यंत पोचला आहे. पुढील महिन्याभरात फीलीपिंस २२,००० मे. टन कांदा आयात करणार आहेत.
भारताच्या एकूण निर्यातीच्या एक टक्याहून कमी आकारमान आहे त्यामुळे हा कांदा निर्यात झाल्याने याचा देशांतर्गत भावावर फार मोठा परिणाम होणार नसला तरीही सेंटीमेंट सकारात्मक राहू शकतील.

04/12/2022

िसेंबर_कृषी_शिक्षण_दिवस
"दुर्लक्षित असलेले कृषी शिक्षण"
संशोधन आणि शिक्षण हे कृषी विकासाचे मुख्य पाया आहेत, कृषी शिक्षण हे महाराष्ट्रात १९०५ पासून सुरू आहे, कृषी शिक्षणात सुध्दा महाराष्ट्र राज्य नेहमी आघाडीवर राहिलेले आहे, सद्यस्थितीला राज्यात ३० शासकीय कृषी महाविद्यालये आहेत, २००१ पर्यंत महाराष्ट्रात १४ शासकीय कृषी महाविद्यालये होते २००३ नंतर खासगी महाविद्यालयांना परवानगी मिळाली त्यानंतर राज्यात अनेक खासगी कृषी महाविद्यालयांची संख्या वाढत गेली, आज घडीला १५० पेक्षा जास्त खासगी कृषी महाविद्यालये आहेत, त्यात यातील काही महविद्यालये अतिशय चांगले आहेत तर काहींची दशा म्हणजे खूप कठीण आहे, त्यांनी कुठलाही निकष पूर्ण केलेला दिसत नाही, तिथे पाहिजेत त्या सुविधा उपलब्ध नाहीत तसेच प्राध्यापक वर्ग नाही या सर्व गोष्टी विचारात घेता फक्त पैसा कमवायचा उद्देश आहे बाकी काही नाही परंतु शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय ? अजून एक म्हणजे नवीन कृषी मंत्री झाले की आपल्या मतदार संघात कृषी महाविद्यालय सुरू करतात परंतु ते सुरू करत असताना सुविधांचा विचार करत नाहीत किंवा त्याची अंमलबजावणी करत नाही, असलेला प्राध्यापक वर्ग हा आहे त्याच ठिकाणी पुरेसा नाही त्यात हे नवीन महविद्यालये सुरू केले गेलेले आहेत तर त्यांची दशा काय असेल याचा विचार करावा, त्या ठिकाणी खरच शिक्षणाची गुणवत्ता काय असेल?! हे बघत असताना आपल्याला हेच दिसून येते की कृषी शिक्षण हे किती दुर्लक्षित आहे.
आज घडीला कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य काय आहे, हजारो विद्यार्थी दरवर्षी बाहेर पडत आहेत त्यांना खरच शेतीचे ज्ञान येत आहे का? ते त्यांचा भविष्यात त्याचा फायदा करू शकतात का ? किंवा त्यांना नोकरी लागेल का? किंवा घरी गेल्या नंतर ते खरच आपल्या शेतकरी बापाला सल्ला देऊ शकतील का ? जर या प्रश्नाची उत्तरे बघितले तर नाही येतील, तर मग काय अर्थ आहे या शिक्षणाचा, बाजार करून पैसे कमावणे इतकाच ना ??!! दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी पुरते शिक्षण हा सामाजिक दृष्टीकोन झालेला आहे कृषी शिक्षणाचे ही तसेच आहे, पदवी नंतर पदवित्तर शिक्षणासाठी राज्यात फक्त ८०० जागा आहेत, त्यात खासगी महाविद्यालयांना ICAR च्या प्रवेश प्रक्रियेसाठी बंदी घालण्यात आलेली आले, यांनी कॉलेज तर काढून ठेवले आहेत परंतु यांना ICAR प्रमाणीकरण (Acredation) नको आहेत त्या पद्धतीने हे सुविधा देऊ शकत नाहीत, व त्या विद्यार्थ्यासाठी हे भांडू सुध्दा शकत नाहीत.
राहिला प्रश्न तो एमएससी चा, शिक्षण घेऊन नोकरी ची हमी नसल्याने मुले एमपीएससी कडे वळतात, परंतु हे सर्व होत असताना मात्र कृषी शिक्षण आणि संशोधन या गोष्टी बाजूला पडतात व हे विद्यार्थी कृषी पासून खूप दूर जातात, यावर खऱ्या अर्थानं लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, शिक्षण हे मुलांना कळत नाही व ते त्यापासून दूर जातात व त्यामुळे कृषी उद्योग क्षेत्रात आपलयाला कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण नगण्य दिसते, हे सर्व होत असताना प्रशासन आणि शासन हे सुध्दा त्या गोष्टीला प्राधान्य देताना दिसून येते, परंतु खऱ्या अर्थाने ज्या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात काम करायचे आहे त्यांना मात्र संधी मिळत नाही, कारण कृषी विद्यापीठात एमएससी साठी प्रवेश घेणारे विद्यार्थी एमपीएससी करताना दिसतात त्यामुळे संशोधन व शिक्षण या दोन्ही गोष्टीवर त्या ठिकाणी दगड मारला जातो, मान्य करता येईल की एमएससी करून नोकरी मिळत नाही, तर नोकरी साठी शिक्षणच नाही शिक्षण हे आपल्या विकासासाठी असते आपल्या आजूबाजूच्या लोकांचा विकास करण्यासाठी असते, तर यात ज्या मुलांची इच्छा असते एमएससी करायची त्यांचे नंबर या मुलांमुळे लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एमएससी व आचार्य पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असताना संशोधनासाठी लागणाऱ्या गोष्टीवर खर्च होत असतो आज घडीला तो खर्च करण्यासाठी विद्यापीठ स्थरावर राज्य सरकारचा निधी उपलब्ध नाही आहे, बरेच शेतकरी पुत्र या गोष्टींमुळे वेळेत आपले संशोधन पूर्ण करू शकत नाहीत.
खासगी महाविद्यालयाच्या बाबतीत बघितले तर त्यांना सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडण्यासाठी नियमावली सरकार ने दिली परंतु त्यात कुठेही प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या तरुणांचा विचार केला गेला नाही त्यांचे भरती प्रक्रिया असेल पगार असेल किंवा सुविधा असतील यावर काहीच नाही, बरेच खासगी महाविद्यालये असे आहेत की तिथे प्राध्यापक वर्ग नाही किंवा असलेला गुणवत्तापूर्ण नाही, यावर कोणाचेही लक्ष नाही, हे सर्व होत असताना विद्यार्थी प्रवेश संख्या वाढल्या परंतु भरती प्रक्रिया काही झाली नाही, मग प्रश्न पडतो तो हे सर्व चालत कसे असेल ?
या सर्व गोष्टी राज्यात कार्यरत असलेली संस्था MCAER (महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे) बघते की नाही हा सुध्दा प्रश्न आहे ? यावर उपाय म्हणून आजवर काम झालेले दिसत नाही, कोणत्याही महाविद्यालयावर कार्यवाही झालेली दिसत नाही किंवा विद्यार्थी दृष्टीने पाऊल उचलले दिसत नाही.
कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समोर काय भविष्य आहे हे सुध्दा बघणे आवश्यक आहे, उद्योग असेल किंवा कृषी क्षेत्रात त्यांना प्राधान्य दिले जाते का, हे सुध्दा बघणे आवश्यक आहे कारण, सद्यस्थितीला तसे दिसत नाही, कारण असा एकही उद्योग नाही की त्यामध्ये प्रामुख्याने कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. ज्या प्रमाणे फार्मसी साठी म्हणजे ड्रग कंपनी असेल किंवा फार्मसी सदर्भात काही उद्योग असेल तर त्याठिकाणी फार्मसी झालेल्या लोकांना मूळ प्राध्यान्य दिले जाते नाहीतर आपण तो उद्योग करू शकत नाहीत. कृषी संदर्भात वेगळी स्थिती आहे कोणीही कृषी सेवा केंद्र सुरू करू शकतो, कोणीही बियाणे कंपनी सुरू करू शकतो, कोणीही कृषी निविष्ठा तयार करू शकतो किंवा विकू शकतात याचा परिणाम असा आहे की एकतर कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठेही प्राधान्य नाही, त्याच बरोबर त्याचे शिवाय हे कोणीही करू शकतो त्यामुळे त्यांना नोकरी सुध्दा मिळत नाही, याच उलट जर या ठिकाणी त्यांना सक्ती केले तर कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी ची संधी उपलब्ध होईल व चांगले परिणाम सुध्दा मिळतील. जर एखादी कंपनी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी बियाणे तयार करून विकणे हा व्यवसाय करत असेल तर त्यांना बियाणे क्षेत्रातील तज्ञ त्यांचेकडे असणे आवश्यक आहे तसेच जे सेंद्रिय खत व जैविक खते तायर करून विकणार असतील, तर त्यांच्याकडे तसा कृषी तज्ञ असणे गरजेचे आहे तरच शेतकरी वर्गाला चांगले व गुणवत्ता पूर्ण निविष्ठा मिळतील, हे सांगण्याचा उद्देश असा आहे की कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात प्राधान्य मिळावे जेणेकरून कृषी शिक्षणाचा शेतकरी वर्गाला फायदा होईल.
खऱ्या अर्थाने या सर्व बाबींचा समावेशक विचार केला तर कृषी शिक्षण आणि संशोधन हे दूरलक्षितच आहे हे दिसून येते, परंतु आज घडीला ही स्थिती बदलणे आवश्यक आहे कारण अजून ३-४ वर्षात खूप वेगळे परिणाम याचे दिसून येतील, यावर प्रकाश पडावा वास्थविकता लोकांना कळावी म्हणून हे सर्व मांडण्याचा प्रयत्न केला आहे, प्रामाणिक उद्देश एकच आहे कृषी प्रधान देशात व राज्यात कृषी शिक्षण व संशोधन यांची झालेली अवस्था अतिशय दयनीय आहे त्यावर सर्व क्षेत्रातून विचार होणे आवश्यक आहे व राजकीय हेतू - स्वार्थ बाजूला ठेवून उभारणी देणे गरजेचे आहे तरच भविष्यकाळात शेती क्षेत्र टिकेल व कृषी क्षेत्राला चांगले दिवस येतील.
धन्यवाद
कृषी शिक्षण दिवस ३ डिसेंबर च्या निमित्ताने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न
✍🏻Dr Anant Ingle

28/08/2022

उसाला रात्रीची बारी देताना बिबट्यांची भीती असते.
त्यासाठी शोधलेला हा नामी उपाय.

Agriwala ऍग्रीवाला फार्मर्स क्लब

 #आपली_प्रतिक्रियाझिरो बजेट शेती, एमएसपी साठी केंद्र सरकार समिती स्थापन करणार.  ~नरेंद्र सिंह तोमर
22/07/2022

#आपली_प्रतिक्रिया
झिरो बजेट शेती, एमएसपी साठी केंद्र सरकार समिती स्थापन करणार.
~नरेंद्र सिंह तोमर

Agriwala has 2 positions for sales interns. ABM, MBA completed/appeared students can apply for this post. Location: Maga...
15/07/2022

Agriwala has 2 positions for sales interns.
ABM, MBA completed/appeared students can apply for this post.
Location: Magarpatta Road, Hadapsar, Megacenter.
Remuneration: Fixed remuneration 6,000 + Incentive.
Upon successfully completing the internship, the opportunity to get a full-time position with a good salary, medical allowances, and other benefits.

Send your resume to
[email protected]

Training in the last week of July. Immediate joining from 1st August 2022.

Thanks and re,
Akshay Mulik
7709195124

Address

J-103, Ground Floor, Megacenter Mall, Magarpatta City, Hadapsar
Pune
411028

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agriwala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share