Wind Chime Home Stay

Call Directions Website Contact the business

Wind Chime Home Stay A beautiful home stay amidst nature.

नुकताच  wakad Pune.येथिल १० ज्येष्ठ नागरिकांचा एक मित्रपरिवार - निवृत्त शासकीय अधिकारी, अभियंते आणि उद्योजक…🏡 Wind Chime...
06/08/2026

नुकताच wakad Pune.येथिल १० ज्येष्ठ नागरिकांचा एक मित्रपरिवार - निवृत्त शासकीय अधिकारी, अभियंते आणि उद्योजक…
🏡 Wind Chime Home Stay येथे एक रात्र मुक्कामासाठी आला होता.
निसर्गरम्य परिसर, शांत वातावरण, घरगुती स्वादिष्ट भोजन आणि मनापासून केलेले आदरातिथ्य यांचा त्यांनी मनसोक्त आनंद घेतला.
आमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण म्हणजे प्रत्येकाने आपल्या अनुभवाबद्दल मनापासून व्यक्त केलेले कौतुक. त्यांनी स्वतःहून आम्हाला दिलेले व्हिडिओ अभिप्राय त्यांच्या समाधानाची आणि आनंदाची साक्ष देतात.
अशा आनंदी आणि सकारात्मक भावना आम्हाला अभिमानाची जाणीव करून देतात आणि प्रत्येक पाहुण्याचा अनुभव आणखी सुंदर करण्यासाठी नवी ऊर्जा देतात.
आमच्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आनंद निसर्गालाही आवडतो... आणि आम्हालाही! 🌿💚
दैनंदिन धावपळीतून थोडी विश्रांती घ्या...
निसर्गाशी पुन्हा एकदा मनमोकळा संवाद साधण्यासाठी Wind Chime Home Stay ला अवश्य भेट द्या.

29/07/2026

महाराष्ट्राची प्रसिद्ध ट्रेकर,
ट्रेकिंगची आवड जपणारी किरण पोटोडे यानी wind chime la भेट दिली.

"Wind Chimes"... नावातच जणू वाऱ्याच्या झुळुकीवर झुलणारा मधुर नाद... आणि प्रत्येक भेटीत मनाला नव्याने सापडणारा निसर्गाचा स्वर! 💚🌿
Wind Chimes या होमस्टेला आम्ही अनेकदा गेलो आहोत पण या जागेचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे—प्रत्येक भेटीत ती मागच्या वेळेपेक्षा अधिक सुंदर, अधिक जिव्हाळ्याची आणि अधिक आपलीशी वाटते. नकळत आपण पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडतो.
काल आम्ही मैत्रिणी या सुंदर ठिकाणी गेलो होतो ,यावेळी तर जणू काळच मागे फिरला होता. मोठेपणाची सारी बंधनं झटकून आम्ही पुन्हा लहान झालो. पावसात मनसोक्त भिजलो, चिखलात उड्या मारल्या, खळखळून हसलो, एकमेकींची चेष्टा केली... आणि प्रत्येक क्षण मनाच्या कप्प्यात कायमचा जपून ठेवला.
सभोवताली हिरवाईची अथांग शाल पसरली होती. धुक्याच्या अलगद मिठीत हरवलेले डोंगर, पावसाच्या तालावर डोलणारी झाडांची पानं, पक्ष्यांच्या किलबिलाट,आणि गार वाऱ्याची हलकीशी साद... निसर्ग जणू प्रत्येक क्षणी कुजबुजत होता—"थोडंसं थांबा... लहान व्हा"
त्या वातावरणात घेतलेला वेगवेगळ्या प्रकारच्या गरमागरम चहाचा प्रत्येक घोट हा केवळ चहा नव्हता; तो पावसाळ्याने दिलेला एक सुगंधी, अविस्मरणीय अनुभव होता.
त्यानंतर प्रेमाने वाढलेलं घरगुती, स्वादिष्ट जेवण... प्रत्येक घासात मायेची चव होती. पोट तर भरलं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे मन समाधानाने आणि कृतज्ञतेने भरून आलं.
Wind Chimes हा केवळ एक होमस्टे नाही; तो मनाला पुन्हा जिवंत करणारा अनुभव आहे. मैत्रीला नव्याने फुलवणारा, निसर्गाशी हरवलेलं नातं पुन्हा जोडणारा आणि आयुष्यभर जपून ठेवाव्या अशा आठवणींची उबदार शिदोरी देणारा एक सुंदर प्रवास आहे.
हिरव्यागार झाडांच्या सान्निध्यात वसलेलं हे छोटंसं नंदनवन शहराच्या गोंगाटापासून दूर मनाला शांततेची कुशी देतं. ताजी हवा, स्वच्छ परिसर, पक्ष्यांची मधुर गाणी आणि प्रत्येक कोपऱ्यात जाणवणारा निसर्गाचा स्पर्श... इथे घड्याळाचे काटे चालू असतात, पण वेळ मात्र थांबलेली वाटते.
संपदाने या होमस्टेची जपलेली स्वच्छता, प्रत्येक गोष्टीत दिसणारी सौंदर्यदृष्टी आणि मनापासून केलेलं आदरातिथ्य खरंच मन जिंकून घेतं. तिच्या प्रेमाची ऊब या ठिकाणाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवते. त्यात नरेन दादांच्या कल्पक कलाकृतींनी या जागेला एक वेगळंच व्यक्तिमत्त्व दिलं आहे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक कोपरा एखादी गोष्ट सांगतो आणि पाहणाऱ्याच्या मनात कायमचा घर करून राहतो.
आजच्या आधुनिकतेच्या गर्दीत काही जागा अशा असतात जिथे महागड्या सजावटीपेक्षा जुन्या अँटिक वस्तू, साधेपणा आणि आत्मीयता अधिक श्रीमंत वाटतात. त्या जागा फक्त डोळ्यांना सुंदर वाटत नाहीत, तर मनालाही स्पर्शून जातात. Wind Chimes ही अशीच एक जागा आहे.
आणि म्हणूनच प्रत्येक वेळी इथून निघताना पावलं पुढे पडतात, पण मन मात्र तिथेच हिरवाईच्या कुशीत, पावसाच्या सरींमध्ये, वाऱ्याच्या झुळुकीत आणि मैत्रीच्या त्या खळखळत्या हास्यात रेंगाळत राहतं...
कारण आयुष्यात काही ठिकाणं अशी असतात की ती आपण फक्त पाहत नाही... ती आपण मनापासून जगतो. ती आठवण बनत नाहीत, तर आपल्या आयुष्याचा एक सुंदर, जिवंत भाग बनून कायमची मनात वसतात. 💚🌿☘️

✍️ किरण निशिकांत पोटोडे
Pune

काल आम्ही ४/५मैत्रिणी गिरीवन येथील wind chime या होमस्टेला गेलो. ही आमची दुसरी तिसरी भेट असावी.प्रत्येक वेळी आम्हाला ते ...
29/07/2026

काल आम्ही ४/५मैत्रिणी गिरीवन येथील wind chime या होमस्टेला गेलो. ही आमची दुसरी तिसरी भेट असावी.प्रत्येक वेळी आम्हाला ते घर येथील निसर्ग वेगळा वाटतो. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विसावा मिळावा असे हे निसर्गाच्या सानिध्यातील सुंदर शांत ठिकाण आहे.
इथे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची गरज ओळखून त्याची सोय केली आहे. प्रशस्त खोल्या, कपाटे, स्वच्छता, टापटीप याची विशेष काळजी घेतली आहे. जुन्या आणि नव्या गोष्टीचा मेळ घातला आहे. आजी - पणजीच्या काळातील काही वस्तू तिथे आहे. इनडोअर गेम साठी कॅरेम, सापशिडी, पत्ते UNO असे खेळ आहे. बाहेर अंगणात खेळण्यासाठी ही बरीच जागा आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीची गरज आणि आवड लक्षात घेतली गेली आहे. मंदिर, बाहेर बसण्यासाठी आकर्षक बैठक, लायब्ररी त्यात लहानमुलानं पासून मोठ्या वयोगटातील लोकांना आवडतील अशी पुस्तके आणि वाचन करण्यासाठी विशेष जागा आहे. तेथील वर्णन जेवढ करावे तेवढे थोडे आहे . तिथे स्वतः, आपले कुटुंबिय, आप्तेष्ट, मुले मित्र परिवार जाऊन अनुभव घेण्याची , निसर्गाशी एकरूप होण्याची जागा आहे.
हसतमुखाने वावरणारे caretaker, काय हवं नको ते आग्रहाने वाढणारे मदतनीस, सुग्रास गरमा गरम चविष्ट चुलीवरचे जेवण.
आम्ही इतकी मज्जा केली , पाण्यात उड्या मारल्या, पावसात चिंब झालो, खेळलो, बागडलो. लहान मुलंच जणू पत्ते खेळलो. गप्पा, हास्य विनोद, चेष्टा मस्करीत वेळ कसा गेला कळलेच नाही. तिकडून परत यावे असे वाटतच नव्हते. आम्ही शरीराने जरी इकडे आलो तरी मन अजूनही तिकडेच आहे. याचे सर्व श्रेय गंगाखेडकर दाम्पत्यांचे आहे.
त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. मग तुम्ही कधी येताय आपल्या wind chime ला?
🌼प्रिया वेल्हे , पुणे

29/07/2026

मैत्रिणींनो ,बरोबर ह्यावेळी wind chime Home stay कडे जाण्यासाठी आपण प्रवास सुरू केला. शहराच्या गोंगाटा पासून दूर जात ,गप्पा च्या नादात आपण wind chime chya अगदी हिरव्यागार कुशीत जाऊन पोहोचलो, समजलेच नाही, . घराच्या आजुबाजूची हिरवाई ने, वेगवेगळ्या पान फुलानी आमच्या साठी मंडप घातलेला,जणू माहेरपणाला आलेल्या लेकीचे जसे घराचा कोपरा न कोपरा करते , तसे सुख आम्ही मैत्रिणीनी अनुभवले. पोहोचल्या बरोबर गरम गरम ग्रीन टी, त्यानंतर fruit डिश ne जंगी स्वागत. मग पावसाचा आनंद घेत आख्या घराचा फेरफटका, डोंगरावर अगदी ढग उतरलेले अनुभवत मस्त लहान होत ,पावसात, भिजलो नाचलो,मनाच्या होड्या करून पाण्यात सोडून दिल्या . .. ..... त्यानंतर गरमभाकरी पिठले,ठेचा असा गावरान बेत पोटभर हाणला.पाहता संध्याकाळ झाली. अन् आता परतीचे वेध लागले, निघायची इच्छा नव्हतीच.पण घर बोलावत होतं ,शेवटी,आनंदाची ओटी भरगच्च भरून घेत माहेरवाशिणी परतल्या.💃💃💃💃💃💃 असा अविस्मरणीय आनंद देणाऱ्या *wind chime* khup thanks , तर मग मै त्रिणीनो कधी निघताय तुम्ही.💦☔️☔️🌼💦☔️
🌼अश्विनी पाटनकर पुणे

Contact ☎️Wind Chime Home Stay
9423588303

निसर्गाच्या सानिध्यात पानांना समजून घेण्यासाठी. 💚🍃      पानं.    🍃काही पानं खुडायची असतात. (चहा)काही पानं वाढायची असतात....
21/07/2026

निसर्गाच्या सानिध्यात पानांना समजून घेण्यासाठी.
💚🍃 पानं. 🍃

काही पानं खुडायची असतात. (चहा)
काही पानं वाढायची असतात. (केळी)
काही पानं चिरायची असतात. (कोथिंबीर)
काही पानं शिजवायची असतात.
(पालक, मेथी)
काही पानं तळायची असतात.
(अळू, कढीपत्ता)
काही पानं खायची व रंगवायची असतात.
(नागवेल, विडा)
काही पानं कुटायची असतात.(पुदिना)
काही पानं लुटायची असतात.(आपटा)
काही पानं पुरायची असतात.
(पालापाचोळा कंपोस्ट)
काही पानं जपायची असतात.(पिंपळ)
काही पानं तोरणात सजवायची असतात.(आंबा)
काही पानं केसांत माळायची असतात.(केवडा)
काही पान वाहायची असतात. (बेल)
काही पानं मानाची असतात.(नागवेली)
काही पानं खमंग फोडणी साठी असतात.
(कढीपत्ता)
काही पानं शेवटी सोबती येतात.(कडबा)
काही पानं हातावर रंगवण्यासाठी असतात.(मेंदी)
काही पानं नैवेद्याच्या परिपूर्णते साठी असतात.(तुळस)
काही पानं फक्त स्वादासाठी असतात.(पुदिना)
काही पानं मसाल्यासाठी असतात.
(तेजपत्ता/तमालपत्र)
काही पानं सुशोभिकरणासाठी असतात.
(नारळाच्या झावळ्या,केळीची पाने)
काही पानं पत्रावळी बनविण्यासाठी असतात.(पळस)
काही पानं तल्लफ भागविणारी असतात.(तंबाखू)
काही पानं सत्यनारायण पूजे साठी उपयुक्त असतात.(कर्दळी)
काही पानं गणपतीला आवडतात.(आघाडा,हराळी)

आणि आपल्यासाठी
काही पानं भरायची असतात.(वही)
काही पानं खेळायची असतात (पत्ते)
काही पानं जोडायची असतात. (पुरवणी)
काही पानं लपवायची असतात. (प्रगती पुस्तक !)
काही पान तोंडाला पुसायची असतात. (आश्वासन)
काही पानं उलटायची असतात.(भूतकाळ/ दुःखाचे क्षण)
तर काही नवीन पानं उघडायची असतात.(उद्याची आशा/भविष्यकाळ)

💚 *थोडक्यात काय, तर पानोपानी आनंदी आनंद..* .!💚 ☺️

07/07/2026
🏔️ Looking for the perfect mountain workation?Wind chime home stay🏡Our homestay is ideal for groups of 6–15 adults and o...
04/07/2026

🏔️ Looking for the perfect mountain workation?
Wind chime home stay🏡
Our homestay is ideal for groups of 6–15 adults and offers everything you need for a comfortable, productive stay:

• Separate, fully equipped kitchen
• Reliable high-speed Wi-Fi for seamless work
• Peaceful location that’s away from the crowds, yet not too remote
• Perfect for workations, retreats, family gatherings, and group getaways

If you’re looking for a quiet mountain escape with the convenience of nearby essentials, we’d love to host you. Get in touch to know more or book your stay!
Wind chime home stay
9423588303

Wind chime home stay, Girivan , Mulshi, Pune, 9423588303
29/05/2026

Wind chime home stay, Girivan , Mulshi, Pune, 9423588303

Address

D-87, A/6, Girivan, Vill:Dongargaon, Ta: Mulshi
Pune
411011

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wind Chime Home Stay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Wind Chime Home Stay:

Shortcuts

Share