Kothrud Parisar - कोथरूड परिसर

  • Home
  • India
  • Pune
  • Kothrud Parisar - कोथरूड परिसर

Kothrud Parisar - कोथरूड परिसर Kothrud, known Kothrud Baag in the era of the Peshwas, is the western suburb of the city of Pune, Maharashtra in India.
(1177)

कोथरूड
कोथरूड हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. पूर्वी या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होत असे.कोथरूड सर्वाधिक वेगाने वाढणारे उपनगर आहे ]एखाद दोन प्रमुख खासगी उद्योग संस्था(कारखाने) वगळता मुख्यत्वे मध्यमवर्गीय निवासी क्षेत्रांचा या विभागात समावेश होतो.
भौगोलिक सीमा

महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा कोथरूड परिसरातील पुतळा
कोथरूड गावठाण हा भाग बहुधा विस्तारपूर्व मूळ कोथरूड गाव असावे.महापालिका प्र

भाग क्रमांक २६ , २७ , २८ , २९ आणि ३४ मध्ये कोथरूड प्रभाग विभागला आहे.[४]पौडफाटा/एस.एन.डी.टी. परिसरापाशी एरंडवणे परिसर संपल्यानंतर कोथरूड परिसराची सुरवात होते. ’कर्वे रस्ता’ आणि ’पौड रस्ता’ हे कोथरुडमधील दोन महत्त्वाचे रस्ते आहेत. पौडफाटा ते चांदणी चौक तसेच कर्वे रस्त्यावरील डहाणूकर कॉलनी च्या पलीकडील वनदेवीची टेकडी या सर्वसाधारणपणे कोथरूडच्या सीमा मानल्या जातात. डहाणूकर कॉलनीनंतरचा हिंगणे आणि कर्वे नगर परिसर हा स्वतंत्र कर्वेनगर परिसराचा भाग असला तरी बऱ्याचदा त्यांना विस्तारित कोथरूडचा भाग म्हणून उल्लेखिले जाते.
कोथरुडमधील काही महत्त्वाची ठिकाणे
कोथरूड गावठाणातील म्हातोबा मंदिर ग्राम दैवत, कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणेश मंदिर, हनुमान मंदिर, मॄत्युंजयेश्वर मंदिर, वनदेवी मंदिर ही पुरातन प्रमुख देवळे, आणि एम.आय.टी. रस्त्यावरील जयभवानी मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगॄह, सिटीप्राईड चित्रगॄह, वेदभवन, थोरात उद्यान. कोथरूड गावठाण्याच्या सुरवातीस लागणारा कर्वे यांचा पुतळा आणि गावठाणाच्या एका बाजूस शिवाजीचा पुतळा आणि पौडफाटा उड्डाणपूल, या प्रमुख परिचय खुणा आहेत.
प्रमुख निवासी क्षेत्रे
कोथरूड गावठाण, कर्वे रस्ता आणि पौड स्त्यावरील निवास क्षेत्रांव्यतिरिक्त,राहुल नगर, डहाणूकर कॉलनी, मयूर कॉलनी, आयडियल कॉलनी, गुजरात कॉलनी, भुसारी कॉलनी, गणंजय सोसायटी, कुमार परिसर, महात्मा सोसायटी ही प्रमुख निवासी क्षेत्रे या परिसरात मोडतात.
केळेवाडी,जयभवानीनगर , किष्किंदानगर आणि सुतारदरा या परिसरात निम्नमध्यमवर्गीय वस्त्या आणि झोपडपट्टया देखिल आहेत. [५]
उद्याने आणि टेकड्या
उद्याने
थोरात उद्यान, धोंडीबा सुतार बालोद्यान, मयूर कॉलनी, पं. जितेंद्र अभिषेकी उद्यान ही कोथरूडमध्ये आहेत, तर कर्वेनगर परिसरातील ताथवडे उद्यान आणि सिंहगड रस्त्यावरील पु.ल.देशपांडे उद्यान हीही या परिसराच्या जवळची दुसरी उद्याने आहेत.
टेकड्या
वनदेवी/हिंगणे, हनुमान टेकडी(एआरएआय), रामबाग कॉलनी टेकडी, एनडीए(चांदणी चौक)
वाहतूक
डेक्कन/एरंडवण्यातून कर्वे रस्त्याने येणारी वाहतूक एस एन डी टी/पौडफाटा येथे पौड रस्ता आणि पुढे सरळ जाणारा कर्वे रस्ता यात विभागली जाते. मुठा नदीवरच्या गरवारे, म्हात्रे पुलांवरून येणारी रहदारी एरंडवण्यातील कर्वे रस्तास समांतर सीडीएसएस समोरून जाणाऱ्या रस्त्यावरून पुढे जाऊन राहुल नगर परिसरातून, अथवा संगमप्रेस समोरून जाऊन करिश्मा चौकात पुन्हा कर्वे रस्त्यावर येते. अथवा कॅनॉल रस्त्याने काही अंतर जाऊन, कर्वे रस्त्याला समांतर जाऊन परत कर्वे रस्त्यावर येते. पौड रस्त्यावरून पुढे जाणारी रहदारी चांदणी चौक परिसरात आणि कर्वे रस्त्याने पुढे जाणारी वाहतूक वारजे चौकात मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्य वळणरस्त्याला जाऊन मिळते.
पौडफाटा, आनंदगर, करिष्मा चौक, मृत्युंजयेश्वर येथील मयूर कॉलनी फाटा, कर्वे पुतळा, कोकण एक्सप्रेस चौक, डहाणूकर कॉलनी चौक येथे वाहतूक नियंत्रक आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

पुणे, पिंपरी-चिंचवड परिवहन मंडळाच्या बसने सार्वजमनिक वाहतुकीचा भार वाहिला जातो. पुणे,पिंपरी-चिंचवड परिवहन मंडळाचे कर्वे रस्त्यावर धोंडीबा सुतार कोथरूड बसस्टँड आणि पौडरस्त्यावर कोथरूड बस डेपो हे वेगवेगळे प्रमुख बस टर्मिनस आहेत.
कोथरूड परिसर सार्वजनिक वाहतुकीकरिता मेट्रो रेल्वे ही पौड रस्त्याने वनाज कंपनीपर्यंत आणि कर्वे रस्त्याने वारजे परिसरापर्यंत पोहोचण्याचे प्रस्तावित आहे.
इतर खासगी सार्वजनिक वाहतूक मुख्यत्वे ऑटोरिक्षाने होते.
संस्था
खासगी संस्थांमध्ये, पूर्वाश्रमीच्या किर्लोस्कर समूहातून वेगळी झालेली, डिझेल इंजिनांची उत्पादन करणारी कमिन्स मर्यादित या प्रमुख संस्थेशिवाय किर्लोस्कर समूहांतर्गत, आणि पौड रस्त्यावरील वनाझ इंजिनियरिंग कंपनी व काही दुय्यम कंपन्यांचा समावेश होतो. पौड रस्त्याजवळील टेकडीवर एआरएआय ही राष्ट्रीय स्तरावरील स्वयंचलित वाहनांसंदर्भात उच्चस्तरीय संशोधन आणि मानांकन करणारी स्वायत्त संस्था आहे.
एरंडवणे आणि कोथरूड परिसरातील मध्यमवर्गीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बऱ्याच व्यापारी साखळ्यांनी त्यांची दालने कर्वे रस्ता आणि पौडरोड परिसरात उभारली आहेत.
डीपी रोड परिसरातील महापालिकेचे विभागीय कार्यालय, गुजरात कॉलनी परिसरातील विभागीय इस्पितळ, आणि भाजी मंडई, कचरा डेपो परिसरातील कोथरूड पोलिस ठाणे यांच्या मार्फत विविध सार्वजनिक सुव्यवस्थांचा कारभार पाहिला जातो.
शिक्षण

श्री. छन्नूलाल मिश्रा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यक्रम सादर करताना
पौडफाट्याच्या सीमेवर एस एन डी टी, पौड रस्त्यावर एम. आय. टी. आणि कर्वे नगर परिसरात कमिन्स कॉलेज ही प्रथितयश महाविद्यालये, शिवाय मराठवाडा मित्रमडळाचे अभियांत्रिरीकी महाविद्यालय, एकलव्य, शिवराय प्रतिष्ठानची महाविद्यालये, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, भारती विद्यापीठाचा कोथरूड परिसर, तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मुख्यालय हे मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या परिसरात आहे. जोग, बालशिक्षण, एम् आय् टी,, शिवराय प्रतिश्ठान, भारती विद्या भवनची परांजपे प्रशाला, माहेश्वरी शिक्षण मंडळाची प्रशाला, आणि महापालिकेच्या प्रशाला या शाळाही येथे आहेत. एन सी ई आर टी चे फील्ड युनिट कार्यालय मयूर कॉलनी परिसरात आहे.
विस्तारित कोथरूडचा परिसर संपल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए च्या परिसराची सुरुवात होते
संस्कृती

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड
मुख्यत्वे सुशिक्षित सधन मध्यमवर्गीय मराठी संस्कृतीचा प्रभाव कोथरूड परिसरात आढळून येतो. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे प्रासंगिक कार्यक्रम, नाटके, संलग्न कला दालनातील प्रदर्शने यांच्या व्यतिरिक्त काही वार्षिक सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजनही केले जाते. कोथरूडच्या विविध उपपरिसरात वेगवेगळ्या वसंत व्याख्यानमालांचे वार्षिक आयोजन केले जाते.
पारंपरिक वार्षिक गणेशोत्सवासोबत, नवरात्री, गरबा, भोंडला, दही हंडी इत्यांदीचाही थोडा सहभाग असतो.
प्रदूषण समस्या आणि आपत्ती
कोथरूड परिसरात मुख्यत्वे वाहनांमुळे झालेले वायुप्रदूषण तसेच ध्वनिप्रदूषण होते
मुसळधार पावसातील रस्त्यांवरील पूरसदृश्य परिस्थिती
कोथरूड परिसर वस्तुतः नदीपात्र पातळीपासून बऱ्यापैकी उंचावर असल्यामुळे तसेच उपलब्ध नालाप्रणालीतून मुसळधार पावसाने टेकड्यांवरून येणारे पाणी सहज वाहून नेले जात असे. इसवीसन २००० पासून झालेल्या टेकड्यांवरील व इतरत्रची बांधकामे, नाल्यांमधील अतिक्रमणॅ तसेच नाल्यावर स्वतः महापालिकेनेच बांधलेला डेव्हेलपमेंट प्लान रोड यामुळे मुसळधार पावसात रस्त्यांवर तसेच रहिवासी भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. खासकरून २९ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर २०१० ला अतिवृष्टीमुळे २०१० पर्यंतच्या सर्वांत वाईट अनुभव कोथरूड परिसराने घेतला. खासकरून परांजपे शाळा, कर्वे पुतळा या भागात पूरसदृश्य परिस्थितीचा अनुभव येतो.

स्थळ: कोथरूड, पुणे   😄
17/08/2026

स्थळ: कोथरूड, पुणे 😄

कोथरूडची ५०० कोटींची जागा खाजगी संस्थेच्या घशात? पुणेकरांनी आता जागं व्हायलाच हवं!पुणेकरांनी प्रचंड विश्वासाने एकाच राजक...
01/07/2026

कोथरूडची ५०० कोटींची जागा खाजगी संस्थेच्या घशात? पुणेकरांनी आता जागं व्हायलाच हवं!

पुणेकरांनी प्रचंड विश्वासाने एकाच राजकीय पक्षाला महापालिकेत स्पष्ट बहुमत दिलं. शहराचा विकास होईल, पारदर्शक कारभार होईल, सार्वजनिक संपत्तीचं रक्षण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आज परिस्थिती उलट दिसू लागली आहे.

बहुमताच्या जोरावर पुणे महानगरपालिकेत कुठलेही विषय चर्चा न करता, जनभावनांचा विचार न करता मंजूर केले जात आहेत. पुणेकरांच्या मालकीच्या शेकडो कोटी रुपयांच्या जागा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा उद्योग सुरू असल्याचा गंभीर आरोप आता समोर येत आहे.

कोथरूडमधील तब्बल एक एकर मोक्याची जागा, ज्याचे बाजारमूल्य सुमारे ५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते, ती तब्बल ३० वर्षांच्या भाडेकरारावर एका बाहेरील खाजगी संस्थेला देण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा निर्णय कोणत्या निकषांवर घेतला गेला? खुली व स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया का राबवली गेली नाही? कोथरूडमधील स्थानिक सामाजिक संस्था डावलून बाहेरच्या संस्थेची निवड का करण्यात आली? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुणेकरांना मिळायलाच हवीत.

कोथरूडमध्ये आधीच पार्किंगची कमतरता, खेळाच्या मैदानांचा अभाव आणि सार्वजनिक सुविधांसाठी जागेची टंचाई आहे. अशा परिस्थितीत पुणेकरांच्या हक्काची जागा खासगी संस्थेला देण्यामागे नेमकं कोणाचं हितसंबंध जपले जात आहेत?

सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे या विषयावर कोणी आवाज उठवू लागलं की सरळ "मुंबई आणि दिल्लीतील भाजपच्या बड्या नेत्यांचा विषय आहे, हात घालू नका" असा धमकीवजा सल्ला दिला जातो. पण आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत. आम्ही कोणाच्याही दबावाला किंवा धमकीला घाबरणारे नाही.

कोथरूडची ही जागा कोणत्याही राजकीय नेत्याची किंवा खाजगी संस्थेची मालमत्ता नाही. ती कोथरूडकरांची, पुणेकरांची आणि जनतेच्या कराच्या पैशातून उभी राहिलेली सार्वजनिक संपत्ती आहे.

आज प्रश्न केवळ एका जागेचा नाही, तर पुणेकरांच्या हक्कांचा, पारदर्शक प्रशासनाचा आणि शहराच्या भवितव्याचा आहे. पुणेकरांच्या मालकीच्या संपत्तीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही.

आम्ही बोलत राहू, लढत राहू आणि पुणेकरांच्या हक्काची प्रत्येक इंच जागा वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू.

"सत्तेच्या जोरावर निर्णय होऊ शकतात, पण जनतेच्या हक्कांवर कुणाचाही डल्ला चालणार नाही!"

#पुणे #कोथरूड #पुणेकरांचाहक्क #५००कोटींचीजागा #पारदर्शकताहवी #मनसे #महाराष्ट्रसैनिक

कोथरूडमधील ५०० कोटींच्या महापालिका जागेच्या प्रस्तावित हस्तांतरणाला मनसेचा तीव्र विरोध
29/06/2026

कोथरूडमधील ५०० कोटींच्या महापालिका जागेच्या प्रस्तावित हस्तांतरणाला मनसेचा तीव्र विरोध

सर्जेराव देशमुख : कोथरूड येथील सुमारे ५०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली पुणे महापालिकेची सुमारे एक एकर जागा 'प्रज.....

कोथरूड मधील सुमारे एक जागा खासगी संस्थेला देण्यास मनसेचा तीव्र विरोध; महापालिकेने प्रस्ताव त्वरीत स्थगित करण्याची मागणी
29/06/2026

कोथरूड मधील सुमारे एक जागा खासगी संस्थेला देण्यास मनसेचा तीव्र विरोध; महापालिकेने प्रस्ताव त्वरीत स्थगित करण्याची मागणी

पुणे : कोथरूड येथील सुमारे ५०० /- कोटी रुपये किमतीची महापालिकेची सुमारे एक एकर जागा 'ग्रॅव्हिटी वेल्फेअर फाउंडेशन' ....

21/06/2026

कोथरूडच्या सायंकाळी आज एक वेगळंच रूप धारण केलं होतं... 🧡🚩
जणू आकाशाने स्वतः भगवा शालू पांघरला होता आणि त्या तेजस्वी भगव्या छटांमध्ये उभं असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अधिकच दिमाखदार भासत होतं.
मावळत्या सूर्याच्या साक्षीने, महाराजांच्या तेजस्वी मूर्तीसमोर क्षणभर काळही थांबून गेला असावा असं वाटलं...
हा फक्त एक फोटो नाही, तर प्रत्येक मराठी मनातल्या स्वाभिमानाचा, प्रेरणेचा आणि हिंदवी स्वराज्याच्या अमर तेजाचा अनुभव आहे. 🚩✨
"जिथे जिथे भगवा फडकतो, तिथे तिथे महाराजांचं तेज उजळत राहतं!"
#छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवराय #शिवस्मारक #कोथरूड #भगवाआकाश #मावळतीचेसौंदर्य #हिंदवीस्वराज्य #मराठीअभिमान #जयजिजाऊ #जयशिवराय 🚩🧡

Address

Karve Road, Poud Road
Pune
411038

Telephone

+91 88620 80808

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kothrud Parisar - कोथरूड परिसर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share