10/05/2024
अक्षय तृतीयाच्या शुभदिन आजच्या दिवशी १९५४ साली माझ्या आजोबांनी
‘उदय विहार‘ नावाचे हॉटेल टिळक रोड ,स. प. महाविद्यालयाच्या समोर सुरू केले आज त्याला ७० वर्ष पूर्ण झाली .
फेब्रुवारी २०२१ मधे आम्ही ते बंद केले पण तो पर्यंत अनेक लोकांच्या हृदयाची ती शान होती .
असंख्य लोकांच्या असंख्य आठवणी हॉटेल उदय विहार नी जगवल्या आणि अजून ही जगवत आहे अजून ही त्या काळातले कोणी भेटले की जुन्या आठवणी सांगत असतात..
खूप किस्से उदय विहार मधे घडले तसेच खूप लोकांचे कॉलेजच्या शिक्षणाचे तास उदय विहार नी वाया घालवले …
आठवणी न संपण्या इतक्या आहेत किती लिहू आणि किती नको असे झालंय.
काळच्या ओघात सगळं बदलतं हे खरे आहे .
आता फक्त आठवणी उरल्यात बाकी काहीच नाही ….
तुम्हां सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!💐💐
तुमच्या काही आठवणी असतील तर नक्की सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद