Bharat snacks (Daji Misal Wale)

Bharat snacks (Daji Misal Wale) We have started in April 1993 , Our misal is quite famous in Somwar peth , Rasta peth , Bhavani Peth & Camp Area.

Bharat snacks is previously known as "Daji Misalwale " we have fabulous varieties of snacks with our hotel mainly Misal Pav , Puri Bhaji , Pohe ,Pav Sample,Thalipit , Pithle Bhakri, Rice Place We also Deliver Parcels for Misal
We take Bulk Orders also
We provides our Products to Parties / Functions

मिसळ करण्यासाठी रस्सा....  पाककृती. (महत्वाचं हे गावोगावी बदलु शकेल... एक नक्की अशी रेसेपी सांगता येणार नाही.... आम्ही च...
05/07/2017

मिसळ करण्यासाठी रस्सा.... पाककृती.

(महत्वाचं हे गावोगावी बदलु शकेल... एक नक्की अशी रेसेपी सांगता येणार नाही.... आम्ही चटकदार सणसणीत मिसळ करायला जी रेसेपी वापरतो ती इथे देत आहे कृपया या कृतीवर चर्चा – मतांतरं नकोत. आमची भारतीय खाद्यसंस्कृती अतिशय विकसीत आहे. इथे मैला मैलावर जशी भाषा बदलते तसंच घरा घरात पाककृतीही बदलते .. धन्यवाद)

साहीत्य :-

• मोड आलेली मटकी ५०० ग्रॅम ( १२ ते १५ सर्व्हिंग्ज साठी प्लेट बाऊल च्या आकारावर सर्व्हींग्ज अवलंबुन)
[ आवडी नुसार यात वाटाणे देखील वापरले जातात तेव्हा हे ऑप्शन ओपन आहे असे समजावे]
• कोथिंबीर
• लसुण
• आलं
• कांदे
• धणेपुड
• मिरपुड
• लवंग पुड
• दालचीनी पुड
• वेलदोणे ४ ते ६
• कस्तुरीमेथी
• पुदीना पावडर किंवा पुदिन्याची ताजी पानं
• काश्मीरी मिरची चं तिखट / किंवा रसगुल्ला मिरचीचं तिखट चार चमचे
• चपाटा / गावराणी मिरचीचं तिखट तीन चमचे
• हळद दोन चमचे
• हिंग
• हिरव्या मिरच्या ( तिखट असाव्यात )
• दोन मोठे टमाटे.
• चार चमचे कोकोनट पावडर (खोबरा कीस)
• मीठ
• तेल.
• दोन लहात तुकडे जायपत्री
• दिड चक्रीफुल
• दोन ते चार त्रिफळा
• दिड चमचा मोहोरीची डाळ.

कृती,

आलं-लसुण-अर्धा कांदा-एक टमाटा-खोबरा कीस-कस्तूरी मेथी-पुदिना ( पुदिना पुड) हिंग दालचीनी पुड हिरव्या मिरच्या या सगळ्यांची एकजीव बारीक वाटण करुन घ्यावे.

तिखट-हळद-आणि मसाल्याचे सर्व पदार्थ एकत्र करुन एकजीव बारीक करुन एका भांड्यात भिजवुन पेस्ट तयार करावी.

कांदा चिरुन मोठ्या भांड्यात मुबलक तेल घालुन जीरे+मोहरीची फोडणी करावी व त्यात थोडासा हिंग घालावा. फोडणी खमंग होताच यात बारीक चिरलेला कांदा टाकुन मस्त परतुन घ्यावं. आता यात ओलं वाटण घालुन दोन तीन मिनिटं परतावं आणि कडधान्य ( मटकी वगैरे) या फोडणीत टाकावे आणी पुन्हा करपणार नाही अशा पद्धतीने सतत हलवत परतुन घ्यावं. आता यात कोरडा मसाला (तिखड प्लस इतर मसाल्याचे जिन्नस जे बारीक करुन ठेवलेत ते ) टाकावा. तेल मात्र मुबलक हवं हे लक्षात घ्या अन्यथा लाल भडक तर्री येणार नाही. तिखट आणी मसाल्याची ही पेस्ट खमंग होऊ द्यावी अर्थातच न करपता. आणी शेवटी पाणी घालावे.

सुमारे दहा मिनिटांनंतर लालभडक तवंग पृष्ठभागावर दिसु लागेल. कडधान्य शिजल्यावर आंच बंद करावी आणि वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी व झाकण ठेवावे.

स्पायसी रस्सा तयार आहे.

टीप : तिखट आणि मसाले हे अक्षरश: आपल्या आवडीनुसार वापरायचे असतात. तसंच आलं आणि लसुण यांचं प्रमाणही व्यक्तीपरत्वे बदलेल म्हणून याचा प्रमाणात उल्लेख केलेला नाहीये.

मस्त मिसळ
24/08/2016

मस्त मिसळ

04/10/2015

भुतकाळ आठवला ना की त्यातच रमावस वाटत..
पण का? कारण तेच तर आपण जगलेल खर आयुष्य असत..
येईल का गं तेच पुन्हा...

होईल का गं मी तसाच पुन्हा....
जमेल का गं मला पुन्हा वेगळ व्हायला ...
देईल का गं पुन्हा मला कोणी माझ्या मनासारखे जगायला...
रमेल का गं मी तुझ्या विचारात पुन्हा..

नाही ना गं करणार वेगळ कोणी तुझ्यापासुन पुन्हा...
या वेगळेपणालाच तर मी घाबरतो हे का सांगू तुला मी पुन्हा ...

आज तु पुन्हा नकळत भेटलीस आणि भुतकाळात सोडून गेलीस..
आज ही तु दिसल्यावर वाटत कीे तुझ्यावर खुप प्रेम करावे.. तेच जीवन पुन्हा एकदा जगावे.............

पण आता ते शक्य नाही आणि तुला नुसते एकदा तरी पाहून मी तुझ्या हृदयात अजून आहे हे माझ्या वेड्या मनाला समजावण्यासारखे दुसरे सुख मी मानत नाही..........

15/01/2012

Address

449 Somwar Peth , Khadiche Maidan Chowk
Pune
411011

Telephone

9923477736

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharat snacks (Daji Misal Wale) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bharat snacks (Daji Misal Wale):

Share

Category