19/10/2021
गेली ३३ वर्षे ज्यांनी मला माझ्या आयुष्यात कधीही, कशाचीही उणीव भासू दिली नाही असे माझे व्यावहारिक आणि सामाजिक जीवनातील सर्वोत्तम मार्गदर्शक, माझे आद्य गुरू, जुन्नरवासीय आमच्या कुटुंबाचे स्फूर्तीस्थान, आमचे तीर्थरूप स्व. दिलीपशेठ बबनराव ताजणे यांच्या अखंडित कृपा-प्रेरणेतून ...
*गौरीशंकर सामाजिक प्रतिष्ठाण*
या संस्थेची अधिकृतरीत्या मुहूर्तमेढ रोवली जात आहे.
या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून छत्रपती श्रीशिवाजी महाराजांनी, भारतातील अन्यान्य दार्शनिक संत, समाजसुधारक महापुरुषांनी व आपल्या सुकृतछायी पूर्वजांनी दिलेल्या धार्मिक व सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जपण्याचा व समाजभिमुख उपक्रमांद्वारे समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास निरंतर होत रहावा, हाच दृढ संकल्पित मानस ...
*एक सीमोल्लंघन असंही .....*