Ananddoh Nature Resort is nestled in the unspoiled sylvan setting of the Western Ghats with serene natural beauty and various recreational activities.
Address
At Post Mose, Tal. Mulshi
Pune
Telephone
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when AanandDoh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Contact The Business
Send a message to AanandDoh:
Category
Nature stay 6 locations in Sahyadri
नेचर स्टे...एक नयनरम्य निसर्ग सहवास......... लॉक डाउनमधून अनलॉक होताच निसर्गाच्या कुशीत जाऊन ताजंतवानं होण्याचा विचार पक्का होताच फार्म टू होमच्या नेचर स्टे रिसॉर्टला जायचा बेत नक्की केला माझ्याबरोबर मित्रमंडळी असल्यामुळे सह्याद्रीतल्या बाईक रायडिंगच्या आनंदाला मुकावं लागणार होतं मित्राच्या होंडा सिटी गाडीतून जायला हिरवा कंदील दाखवला भल्या सकाळी उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून मावळतीच्या दिशेला इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंहगड रस्त्यावरून आमचा चमू मावळातल्या निसर्गाच्या ओढीने मार्गस्थ झाला शहरी गोंगाटापासून दूर हिरवाईनं नटलेला नागमोडी वळणं घेत खडकवासला धरणाच्या जलाशयाच्या साथीन अन् मुठा नदीपात्राच्या जोडीने पानशेत जवळ करत होतो धरतीमाता हिरवा शालू नेसून स्वागताला उत्सुक होती सकाळच प्रसन्न वातावरण हवेतला गारवा मित्रांची संगत, अन सोबतीला मोरांचा मियाव मियाव असा आवाज पक्षांचा किलबिलाट तर धुंद पावसाळी नेत्रसुख देणारा मन प्रफुल्लीत करणारा धुतल्या तांदळासारखा आसमंत वीर बाजी पासलकर यांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून पानशेतला मागं ठेवून वरसगाव धरणाच्या जलाशयाच्या बाजूने मोसे खोऱ्यातल्या अप्रतिम निसर्गात प्रवेशलो एका बाजूला पाणी आणि दुसऱ्या बाजूला जंगल मधून जाणाऱ्या लाल मातीच्या मृदगंधाने स्वागताला हरित तृणांच्या मखमली हिरववागार गालि च्या मधून निसर्ग सुखाचा आनंद घेत आम्ही नेचर स्टे च्या टेकडीच्या पायथ्याशी आमचा टेलरथ उभा करून गर्द झाडीतून जाणाऱ्या टेकडीवर चढायला सुरुवात केली चढणीचा रस्ता सोबतीला अन स्वागताला करवंदाचा रानमेवा होता दहा मिनिटांच्या छोटेखानी ट्रेक नंतर नेचर स्टेच्या गेट मधून आत प्रवेशलो तर स्वर्गसुखाचा आनंद देणारा नजारा पाहिल्यावर चढणीचा थकवा अन आपण कुठून आलो याचा विसर पडावा असा निसर्ग चित्रातला देखावा आमच्या स्वागताला अवतरला होता दोन्ही बाजूला डोंगर रांगा अथांग जलाशय घनगर्द झाडी पक्ष्यांचा किलबिलाट या सर्वांमध्ये कोंदणात बसल्यासारखे नेचर स्टे हिल टॉप रिसॉर्ट पाहून मन भरून पावलं स्वागताला वाफाळलेला गवती चहा अन् खुमासदार पोह्यांचा बेत निसर्गाच्या वेडानं झपाटलेल्या आमच्यासारख्या सह्य वेड्यांना आपुलकीच्या नात्यातल्या मावळी आदरातिथ्याने आपलंसं केलं चुलीवरच्या मिष्टान्नाचे गोडी चाखून थोडं फ्रेश होऊन रपेट मारायला बाहेर पडलो सभोवताली शांत सुंदर निसर्गरम्य परिसर ना गाड्यांचा आवाज माणसांचा गोंगाट लालचुटुक मातीतला मेघराजाने घातलेल्या सड्या मुळे मृदगंधित झालेलं वातावरण वस्तीकडे जाणारा वळणदार रस्ता बांबूची बेटे करवंदाची जाळी गावरान आंब्या फणसाची झाड वाऱ्यावर डोलणारी गवताची पाती पक्षांचा नादमधुर स्वर फुलपाखरांचा शिवणापाणीचा खेळ पहात निसर्गाचा आस्वाद घेत दहा-बारा घरांच्या कातकरी वस्तीला मागे टाकून पानशेत वरसगाव च्या मधल्या डोंगर धारेवर पोहोचलो तर काय तेथून दिसणारा पानशेत वरसगाव खडकवासला धरणांचा जलाशय मानवनिर्मित लवासा इतिहासाची साक्ष देणारे सिंहगड तोरणा राजगडला नजरेत साठवत पानशेत धरण आतलं शिर्कोली जवळच पाचू सारखं दिसणार हिरवगार बेट याचं निसर्ग चित्र मनात साठवत माध्या नेचर स्टे ला परतलो तोपर्यंत लज्जतदार चुलीवरील मावळी जेवणाचा बेत स्वागताला तयार होता तिन्ही बाजूला आरसपाणी सौदर्य न्याहाळत पिठलं भाकरी मिरचीचा खर्डा इंद्रायणी तांदळाचा भात अन् भरलं वांग आणि बाजरीच्या भाकरी वर यथेच्छ ताव मारला जोडीला तिथल्या मावशीने केलेल्या तांदळाच्या खिरीचा आस्वाद घेतला बांबू हाऊस मध्ये येऊन वामकुक्षीच्या अधीन झालो कांदा भजी गवती चहाच्या खमंग वासानं जाग येऊन ढगांच्या आड लपलेल्या मावळतीच्या सूर्याला अर्ध्य दिलं अन् चटकदार पोपटी पार्टीचा शेकोटीवर आंब्याच्या पानांमध्ये माठातल्या खरपुस पोपटीचा समाचार घेतला तिन्हीसांजेला घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांच्या साथीन विघ्नहर्त्याला आरती नं वंदन करून धूप दीप नैवेद्द्यान ववी वातावरणात मांगल्य भरून आल होत शेकोटीभोवती गप्पांच्या मैफलीत भौतिक सुखाच्या पलीकडे जाऊन निसर्गाच्या अधीन होऊन सुखसागरात बुडून गेलो होतो की रात्रीचे 10 केव्हा वाजले ते कळलं देखील नाही लोणचे पापड अन् खिचडीच्या अवीट गोडीच्या बेतानं कंदिलाच्या उजेडात रंगत आणली ढगाआडची चंद्रकोर अन मधेच डोकावणाऱ्या लुकलुकत्या चांदण्या च्या साथीने आम्ही सृष्टी सोबत रातकिड्यांच्या आवाजात अन् काजव्यांच्या प्रकाशात रात्रीच्या शतपावली नंतर निद्राधीन केव्हा झालो ते कळत देखील नाही पहाटेच्या गार वाऱ्याने पक्ष्यांच्या किलबिलाटाने चराचराला जाग आली तांबड फुटायची विलोभनीय दृष्य टिपायला ढगांनी आपली दाटीवाटी काहीशी विरळ करून साथ दिली वाफाळलेल्या चहाचे घोट घेऊन आनंद जंगल सफरीचा थ्रील अनुभवायला मोर हरिण ससा यांची ओझरती चाहूल देऊन निसर्गाचा समतोल साधण्याचा माणसाला संदेश देणाऱ्या झाडीतून परतून आल्यावर लज्जतदार मिसळीचा आस्वाद घेऊन नेचर स्टेच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर स्वार होऊन रोजच्या धबडग्यात नाइलाजानं सामील व्हायला परतीच्या मार्गावर चालू लागलो ....आनंदाचे डोही आनंद तरंग याची देही याची डोळा निसर्गाचं रूप मनात साठवून पुणे मुक्कामी पोहोचलो असं नितांत सुंदर निसर्गरम्य नेचर स्टे आपली वाट पाहतोय केव्हा येताय मग केव्हा येताय नेचर स्टे ला.....