19/02/2020
जास्वंद मधे डोंबिवलीच्या स.वा. जोशी विद्यालयाची १९६५ बॅच ची ट्रिप आलेली. ही ट्रिप माझा मामा श्री.अशोक अभ्यंकर ह्याने ऑरगॅनिझ केलेली. त्यातल्याच सौ. सुनीता नवरंगे ह्यांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया.....
*नमस्कार सर्व S.V.J.1965 चे विद्यार्थी*.
खरं म्हटलं तर मी सौ.सुनिता र.नवरंगे ( पूर्वाश्रमीची पुष्पा दातार ) या बॅचची विद्यार्थिनी नाही, तरी सुध्दा माझे मि.श्री.रमेश नवरंगे यांच्या बॅचमध्ये मला अॅड करुन घेतलंत यासाठी खूप धन्यवाद...🙏
बरेचं दिवसांपासून आपल्या पिकनिकचा विषय चालू होता. अखेरीस श्री.अशोक यांच्या भाच्याच्या जास्वंद रिसाॅर्ट अक्षी इथे जायचं असे ठरले. दि.१३ फेब्रु.ला शार्प ७-१५ला खाजगी बसने आपण डोंबिवलीहून निघालो. ग्रुपमधील काहीजण स्वतःच्या कारने येणार होते. बसमध्ये बसल्यावर लगेचचं नाश्त्याला त्रिमुर्ती कॅटरर्समध्ये जायचय असा विषय सुरु झाला. तिथे गेल्यावर फारचं चविष्ट अगदी पातळ आवरणाचे बटाटेवडे खायला मिळाले चव फारचं छान. नंतर गरम गरम चहा. सुरवातचं फार छान झाली. अकरा साडेअकराला अक्षी येथे जास्वंद रिसाॅर्टमधे पोहोचलो पण. गेल्यागेल्या छान स्वागत. तिथे परत भरपूर ओलं खोबरं कोथिंबीर घातलेला दडपेपोह्याचा नाश्ता सगळ्यांना खूप आवडला. नंतर अगदी जवळचं असलेल्या अक्षी बिचवर गेलो. समुद्रावर फोटोसेशन, बाहेर उभ्या असलेल्या होडीत बसलेले फोटो...हे सर्व फोटो प्रसिध्द फोटोग्राफर बॅचचाच विद्यार्थी अनिल गांधी यांनी काढले. तिथे मौजमजा करुन परत रिसाॅर्टवर आलो. जरावेळाने दुपारच्या जेवणाची तयारी. ताटातले सगळे पदार्थ बघूनच समाधान वाटले. ताटामधे डाव्या बाजूमधे तिळाच्या मिरच्या, गाजरटोमॅटो कोशिंबीर, वाटीत छान चवीची आमटी,कोकणातील खास पदार्थ म्हणजे डाळींब्यांची उसळ, उकडलेल्या बटाट्याभाजी, मऊ पोळ्या आणि वेगळ्या ताटलीत अगदी रेशमासारखी मऊ अशी पुरळपोळी त्यावर तुपाची धा, नंतर पांढराभात, ग्लासमधे ताक.....असा फारचं सुंदर बेत. त्यादिवशी दुपारपण बालपणात घेऊन गेली. अशोक यांनी बर्फाच्या गोळ्याची गाडीच रिसाॅर्टमधे सांगीतली होती सगळ्यांनी त्याचा मनमुराद आस्वाद घेतला. रात्री त्यांच्या बहिणीच्या घराच्या वरच्या मजल्यावरच्या प्रशस्त पण नीटनेटक्या हाॅलमधे याच बॅचचा प्रसिध्द गायक शरद अभ्यंकर याच्या गाण्याचा कार्यक्रम झाला. त्याला सौ.घुले यांची हार्मोनिअमची फारच सुरेल साथ होती फारचं छान वाजवतात त्याबद्दल त्यांचे अभिनंदन💐सौ.वनमाला, जयश्री या दोघींनी पण गाणी म्हणून बहार आणली. शरदनी पण आधी त्या गाण्याची पार्श्वभूमी सांगून मग गाणी म्हटली फारचं छान. रात्री उशिरापर्यत मैफल छान रंगली.👏👏नंतर सर्वजण आपापल्या रुममधे झोपी गेलो.
सकाळी उठल्यावर गरम चहा, नाश्त्याला गरम गरम तिखटमिठाचा सांजा मला फारचं आवडला😋 आदल्या रात्री मटारची चटमटीत मिसळ पाव ,टोमॅटोसार, अगदी साधा असा पुलाव, दहीबूंदी असा बेत होता. हे सगळं मॅनेज करणार्या अशोक तुमचं अगदी मनापासून कौतुक....
दुसर्या दिवशी सकाळी चहा पिऊन झ्याल्यावर बदलापुरचे जोशी यांनी योगासंबंधी योग्य माहिती देऊन सगळ्यांकडून योगासनं करुन घेतली .....फार छान वाटलं. श्री राम शिंत्रे यांनी त्यांनीचं लिहिलेली आयुर्वेदावरील छोटीशी पण त्यात सगळं अशी पुस्तिका सगळ्यांना भेट दिली. ......त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे म्हणून सौ. शोभा हिने छान कॅटबरीची वेगळ्या आकारीची चाॅकलेटस् वाटून डे साजरा केला. नंतर चौल अलिबाग इथे शितळादेवीचं दर्शन फारचं छान झालं. तिथेच बाहेर कवठी चाफ्याची टपोरी फुलं घेऊन बायका बसल्या होत्या. त्यांच्याकडून दोन फुलं घेतली. एक देवीला एक मला. आत गेल्यावर त्या पुजार्याने मी दिलेलं फूलं देवीच्या मस्तकावर वाहिले समाधान झाले. देवीला नमस्कार केला. तिथे शरदने देवीचे गाणे म्हटले. तिथून निघालो. वाटेत भाजीबाजारात स्त्रीसुलभ भावनेतून भाज्या घेतल्या. रामेश्वरमंदीरात जायचे होते पण काही कारणानी जमले नाही. वाटेत खादाडी चालूच चकली मुगाची चकली छानचं. शोभानी दिलेला चिवडा खूपचं छान. दुपारच्या जेवणाचा बेत खूप खासचं. अगदी मऊमुलायम अशी तांदूळाची उकड काढून केलेली भाकरी, पावटे वांंग बटाटे मिक्स भाजी, मटकीची पातळ भाजी, फारचं सुरेख. कधी नव्हे ते मी भरपूर जेवले आणि हो इतके पदार्थ त्यामुळे एक सांगायचं राहीलं. मिक्स भाज्यांचं ताज लोणचं फारचं अप्रतिम सगळ्यावर कडी म्हणावं असचं.😋😋 यासगळ्यासाठी अगदी हे सगळं हसतमुखपणाने सगळ्यांना वाढणारी स्वाती ,दोघं भाचे बाकीच्या मदतनीस यांचं विशेष कौतुक.
अजून लिहावं असं खूप वाटतय पण खूप लांबडपण नको. या सगळ्या सहलीचं योग्य आयोजन नियोजन याबद्दल अशोक तुम्हाला मनापासून 🙏🏻 ..... अगदी निघतांना त्यांच्या भाच्याला पण अगदी गहिवरुन आले होते...😓😓 मामा भाच्याचं नातं असचं असतं....एकंदरीत आपली ही सहल न भूतो अशीचं झाली. आता थांबते. हे सगळं मी जे आले होते त्यांना उजळा आणि जे सहलीला येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी खास.....सगळ्यांच्या वतीने अशोक यांना दाद म्हणून लिहीलं आहे.🤝🤝🤝🙏आता थांंबते.
सौ.स्वातीने स्वतः केलेल्या मोरावळ्याची प्रत्येकाला दिलेली बाटलीची गोड भेट त्यासाठी 👏👏
सौ.विजूच्या फार्म हाउसला पण भेट दिली काही क्षणासाठीचं जायची संधी मिळाली फारच सुरेख.
सुनिता
१८.०२.२०२०