20/03/2023
नमस्कार,
आमचे सद्गुरु *नगरनिवासी प.पू.श्रीरामकृष्ण सरस्वती स्वामींच्या आर्शीवादांनी आम्ही डॉ.बापट कुटुंबिय *आद्य श्री शंकराचार्य जयंती* निमित्त
*श्रीरामकृष्ण आनंदवन मुक्काम पोस्ट केल्ये आंबेकोड रत्नागिरी* येथे *श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड* यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक *२३ एप्रिल ते दिनांक २९ एप्रिल असे सात दिवसाचे *श्री समर्थ ज्ञानसंस्कार शिबिर* आयोजित करीत आहोत.हे शिबीर पाल्य आणि पालक या दोघांसाठी असणार आहे.*विद्यार्थ्यांचा वयोगट ०९ ते १४ वर्षे *असे असणार आहे.
ज्या प्रकारे सज्जनगडावरती हे शिबिर आयोजित होते त्याच प्रमाणे हे शिबीर *रत्नागिरी येथे आयोजित होणार आहे. "श्री समर्थ ज्ञानसंस्कार शिबिराची" सर्व धुरा *श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड येथील मुख्य *रामदासी श्री योगेश बुवा* तसेच *रामदासी अजय बुवा* हे समर्थपणे सांभाळणार आहेत.
निवास, अल्पोपहार व भोजन व्यवस्था सर्व जबाबदारी ही रामकृष्ण आनंदवन घेणार आहे.
या शिबिरामध्ये सर्व *पालकांसाठी दासबोध पारायण*तसेच व्याख्याने आयोजित केलेली आहेत, आणि *विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्ग, योगासने, व्यायाम, पारंपारिक खेळ, संतचरित्र तसेच कथाकथन* असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी २३ एप्रिल ते २९ एप्रिल अशा या शिबिराचे रजिस्ट्रेशन शुल्क फक्त रु. १००/- आहे. ही फी श्रीरामकृष्ण आनंदवन यांच्याकडे खालील मोबाईल नंबर वर नाव नोंदणी करून जिपे करावी. विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्था भोजन व्यवस्था निशुल्क आहे.
एकूण ६ रात्री ७ दिवस पालकांसाठी निवास व भोजन व्यवस्था यासाठी रू.५०००/- भरायचे आहेत.
*श्री समर्थ रामदास स्वामींचा दासबोध आणि मनाचे श्लोक यांनी आपल्या पाल्यांवर उत्तम संस्कार होण्यासाठी या शिबिरात लवकरात लवकर नाव नोंदवा व या सुवर्णसंधीचा लाभ रामकृष्ण आनंदवन कृषी पर्यटन केंद्र : Janhvee Chandrasekhar Bapat 9325183283