04/04/2022
गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी 2 एप्रिल 2022 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडवा निमित्त रांगोळ्या, देखावे, शोभायात्रा काढून, एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं
गुढी बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. 🙏
गुढी वरील तांब्या उपडा का ठेवतात?
तांब्याची तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे ताब्यात असलेली कडुलिंबाची पाने,रेशमी वस्त्र हे शुभ लहरींनी भारित बनते.जमिनीच्या आकर्षणशक्ती मुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जाप्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे जमिनीवरील सूक्ष्म अच्छादन बनण्यास सहाय्य होते. तांब्याची दिशा तिच्या सुलट ठेवली तर,संपूर्णत: ऊर्ध्वदिशेने लहरींचे प्रक्षेपण झाल्याने जमिनी लगतच्या कनिष्ठ व माध्यमिक स्तराचे शुद्धीकरण न झाल्याने वायूमंडलातील फक्त ठराविक अशा उर्ध्व पट्ट्याचेच शुद्धीकरण होण्यास साहाय्य होते. याउलट तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा जमिनीकडे ठेवल्याने त्यातून प्रक्षेपित होणार्या लहरींचा फायदा जमिनीच्या लगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायूमंडलाला, याबरोबरच ऊर्ध्व मंडलाला मिळण्यास साहाय्य होते.
म्हणून गुढीवरील तांब्या उपडा ठेवतात.