03/07/2023
*श्रीगुरुसारिखा असता पाठीराखा ।*
*इतरांचा लेखा कोण करी ॥१॥*
*राजयाची कांता काय भीक मागे ।*
*मनाचियां जोगे सिद्धी पावे ॥२॥*
*कल्पतरु तळवटीं जो कोणी बैसला ।*
*काय उणे त्याला सांगिजो जी ॥३॥*
*ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों ।*
*आतां उद्धरिलों गुरुकृपे ॥४॥*
*-महावैष्णव विश्वमाऊली संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज*
*गुरूपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा...!*