18/05/2016
संकल्प प्रतिष्ठान 22 गाव - कोयना पूर्व विभाग ,शैक्षणिक मदत योजना - २०१६ ,
या वर्षीची मदत योजना "सन्मा.श्री.आमदार.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (बाबा) " यांच्या शुभहस्ते राबविण्यात आली.सदर योजनेचा साहित्य वाटप कार्यक्रम गेल्या 13 मे रोजी अंधारी येथे आमदार साहेबांच्या हस्ते वाटप करण्यात आला व बाकि रहिलेली मुलांना 14 मे रोजी प्रत्येक गावात जाऊन करण्यात आला , या मुळे प्रत्येक गावातील लोकांशी थेट संपर्क साधता आला , लोकांकडून आम्हा तरुणांस काही मार्गदर्शन ही मिळाले, लोकांचे प्रेम हि मिळाले. या वर्षी आपण 60 मुलांना या योजनेत समाविष्ट केले आहे , साहित्य देताना त्या मुलांच्या चेहर्यावरिल हसू व शिक्षणा बद्दलची त्यांची आवड मनाला प्रफुल्लित करुन गेली. हे कार्य आपल्या हातून सदैव घडत राहो, व देवाने अशीच सदबुद्धी आम्हास देवो, या योजने साठी मदतीचा हात पुढे करणारे आपल्या भागातील उधोगपती अणि संकल्प प्रतिष्ठान चे कार्याघ्यक्ष सन्मा.श्री.के के शेलार - अंधारी, संकल्प प्रतिष्ठान चे प्रमुख सल्लागार व शिवसेना शाखाप्रमुख वाकोला सांताक्रूज सन्मा.संतोष राजाराम कदम - वागळी,संकल्प प्रतिष्ठान चे उपाधेक्ष्य सन्मा.श्री.बळीराम साळुंखे - जाधव उम्बरी,संकल्प प्रतिष्ठान चे सचिव सन्मा.विजय श्रीरंग जाधव - जाधव उम्बरी,आशा प्रत्येक व्यक्तीचे आम्ही आभार मानतो, दोन दिवस पूर्ण पणे वेळ देणार्या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे ही आभार !
श्री.विठ्ठल किर्दत - कास
संकल्प प्रतिष्ठान 22 गाव
कोयना पूर्व विभाग
जावली/सातारा/ मुंबई