24/11/2017
सह्याद्री पुष्प आयोजित ऐतिहासिक वनदुर्ग वासोटा गडमोहीम . सातारा व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमारेषेवर असणाऱ्या प्राचीन वनदुर्ग वासोटा उर्फ व्याघ्रगडाची गडमोहीम.
किर्रर्र रान , मोठमोठे डोंगर , वन्य पशूपक्ष्यांचा मुक्त वावर...- वासोटा किल्ला...
.वसिष्ठ ऋषीमुनींच्या शिष्यांचे वसतिस्थान... मग शिलाहार दुसरा भोजराजा याने या किल्ल्यास चढविलेला साज... मग किल्ल्याच्या दुर्गमतेवर जावळीच्या मोऱ्यांचा गर्वाभिमान.. जावळी जिंकल्यानंतर शिवरायांनी या उत्कृष्ट किल्ल्याच्या तुरुंग म्हणून योग्य वापर... तर पेशवाईत ताई तेलीण नावाच्या शूर स्त्री ने बापू गोखले या सरदारांशी दिलेला लढा...ताई तेलीण सातारजवळच्या औंध संस्थानची स्वामिनी. वासोटा किल्ल्यावर पेशव्यांचे कसलेले सेनापती बापू गोखल्यांना लढाईत ताई तेलणीबरोबर लढताना शर्थ करावी लागली होती. त्या वेळी तत्कालीन कवीने रचलेल्या '' ताई तेलीण मारील सोटा बापू गोखल्या सांभाळ कासोटा '' या ओळी बरंच काही सांगून जातात.कासोटा सुटणं हा वाक्प्रचार त्या वेळी भंबेरी उडाल्यावर कुचेष्टेने वापरण्याची पद्धत होती.
या किल्लाचा इतिहास प्राचीन आहे. किल्ला शिलाहार राजवटीच्या भोजराजाने बांधला, असं म्हणतात. नंतर जावळीच्या चंदराव मोऱ्यांकडून शिवाजी महाराजांनी तो ताब्यात घेतला. आज जरी सह्यादी बहुतेक ठिकाणी उजाड झाला असला तरी ' त्या 'काळी इथल्या भौगोलिक समृद्धतेमुळे तो बलिष्ठच होता. उत्तुंग गिरीशिखरं , त्यातल्या असंख्य खिंडी... घाट , घाटमाथ्यावरची विस्तीर्ण पठारं , प्रचंड कडेकपाऱ्या ,गोदावरी ,भीमा , वारणा , कृष्णा , कोयनेसारख्या अखंड वाहणाऱ्या नद्या... काठावरची जंगलं आणि या सगळ्या विविधतेची गुंफण असणारं जनजीवन.
पर्यावरणाविषयी जागरूक असलेल्या आजच्या जमान्यात सामाजिक वनीकरण ,निसर्गसंतुलन , जंगल बचाव या आधुनिक शब्दांची अजून तरी गरज नाही एवढं हे रान समृद्ध आहे. किर्रर्र रान , मोठमोठे डोंगर , भरपूर पाऊस आणि वन्य पशूपक्ष्यांचा मुक्त वावर...असं स्वप्नवत वाटणारं हे वर्णन आजदेखील इथे पाहायला मिळतं. हा परिसर देशावरच्या सातारा आणि कोकणातल्या खेड-चिपळूण यांच्या मधल्यापट्ट्यात येतो
सदाहरित वनांत येणाऱ्या कोयना अभयारण्य क्षेत्रातला हा वनदुर्ग.. एकीकडे महाकाय कोयनासागर तर दुसरीकडे उंचच उंच झाडे, अजस्त्र वृक्षवल्लीने अन जंगली जनावरांच्या भोवताली असूनदेखील मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा किल्ले वासोटा..
चला तर मग येताय ना...???
__________
ट्रेक शुल्क: रु 1300- फक्त (यामध्येएक मुक्कामाची व्यवस्था , बोटीचा खर्च. वनविभाग शुल्क , ३ वेळेचा चहा नास्ता व २ वेळचे जेवण याचा समावेश असेल.)
* संपर्क: सोमनाथ जाधव 9420488363/9422592035 टीप :- नोंदणी अनामत रक्कम मिळाल्यावरच निश्चित केली जाईल.
----------------------------------------------------------------------------------------
ट्रेकचा अंदाजित गोषवारा
दिवस पहिला...
==================
दुपारी ३:०० वाजता हॉटेल सह्याद्री पुष्प येथे पोहचने
हॉटेलमधील रुमवर आराम करने ५:०० snacks अँड tea
६:०० वाजता जंगल ट्रेक सफ़ारी ८:०० वाजता कॅम्पफायर आणि संगीताचा आस्वाद ९.:०० वाजता रात्रीचे जेवण (शाकाहारी /मांसाहारी)
दिवस दुसरा ..
सकाळी ०६:०० वाजता - अंघोळ इत्यादी
७:०० वाजता - चहा नास्ता
७.३० वाजता - पॅकिंग जेवण सोबत घेऊन बोटीकडे रवाना
९. ३० वाजता - वासोटा किल्याच्या पायथ्यापासूनच्या जंगलातून ट्रेकला सुरुवात .
दुपारी १२. ३० वाजता - किल्याच्या माथ्यावर पोहोचणे. किल्ला पाहणे आणि दुपारचे जेवण ..
२. ३० वाजता - किल्ला उतरण्यास सुरुवात
५. ०० वाजता - बोटीतून बामणोलीकडे रवाना
६. ३० वाजता - चहा नास्ता
७.०० वाजता - परतीचा प्रवास ट्रेकची सांगता
** सोबत काय आणाल :-
१) खूप थंडी असल्याने स्वेटर आणि पांघरून -- अत्यावश्यक
२) पाण्याची बाटली (२ ते ३ लिटर) -- अत्यावश्यक
३) ओडोमोस, सुका खाऊ -- अत्यावश्यक
४) ट्रेकिंग शूज किंवा चांगली ग्रीप असेल असे शूज -- अत्यावश्यक
५) औषध चालू असल्यास ती सोबत असावीत.
६) ओळखपत्र
७) स्वत:च्या मौल्यवान वस्तूंची काळजी स्वत: घ्यावी.
# # # वासोटा गडभ्रमंतीसाठी येणाऱ्यांनी कृपया नोंद घ्यावी. # # #
१) सोबत ओळखपत्र असणे अत्यावश्यक आहे.
२) प्लास्टिकचा वापर टाळावा किंवा कमीत कमी वापर असावा.
प्लस्टिक चा वापर करत असाल तर वनविभाग त्यावर अतिशुल्क आकारत आहे....... कळावे
-- मुक्कामा ची . सोय .... हॉटेल सह्याद्री पुष्प आटाळी सातारा कास पठार सातारा