06/03/2020
प्रिय अतिथी - पर्यटक
सादर प्रणाम।
आपण आपल्या दैनंदिन व्यस्त कामकाजातुन स्वतः व परिवाराकरिता वेळ काढून महाराष्ट्राचे पर्यटन अनुभवन्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या पर्यटन विभागास आपणास सेवा देण्याची संधी दिल्याबद्दल आपले त्रिवार अभिनंदन।
महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या विविध नयनरम्य ठिकाणी असलेल्या विलोभणीय पर्यटक निवासास भेट देणाऱ्या पर्यटकांच्या वास्तव्याचा कालावधी अविस्मरणीय होण्याकरिता मार्च महिन्यात साजरा होणाऱ्या व भारतीय संस्कृतीत अगणित महत्व असलेल्या होळी या सणाचे औचित्य साधून पर्यटन विकास महामंडळ पर्यटन रंगोत्सव / सपतोत्सव / होलित्सव / (कार्यक्रमाचे नाव आवडीनुसार निवडता येईल) या कार्यक्रमाचे दि. 07 मार्च ते 15 मार्च 2020 दरम्यान आयोजन करत आहेत, त्याकरिता आपल्या वास्तव्यदरम्यान आपली उपस्थिती आम्हास प्रार्थनिय आहे.
दि. 07 ते 15 मार्च दरम्यान पर्यटक निवास........ येथे अपल्याकरिता आयोजन केलेल्या कार्यक्रमांची संक्षिप्त माहिती सदरच्या दूरध्वनी मेसेज /इमेल /व्हाट्सअप्प द्वारे पाठवीत आहोत।
दि. 07/03/2020 -
दि. 08/03/2020 -
दि. 09/03/2020 -
दि. 10/03/2020 -
दि. 11/03/2020 -
दि. 12/03/2020 -
दि. 13/03/2020 -
दि. 14/03/2020 -
दि. 15/03/2020 -
याव्यतिरिक्त प.नि........ आपणास आपले स्वास्थ्य निरोगी राहावे याकरिता तसेच निसर्गाच्या कुशीत फेरफटका मारण्याकरीता सायकल उपलब्ध करून देत आहोत।
कृषिप्रधान म्हणून ओळख असलेल्या देशाची पाश्चात्य संस्कृतीकडे वाटचाल सूरु असताना आपल्या काळ्या मातीशी नाळ जोडणे करीता आपणास अत्यल्प शुल्क म्हणजेच रु. 50/- संपूर्ण कुटुंबकरिता किंवा रु. 20 प्रति पर्यटक असे आकारून आपणास खरोखरच्या काळ्या मातीत म्हणजेच शेतात घेऊन जाणार आहोत, ह्या उपक्रमाद्वारे जमा होणारी संपूर्ण रक्कम ही आपण भेट दिलेल्या शेताच्या राखणदारास - शेतकऱ्यास सढळ हाताने मदत म्हणून देण्यात येते.
पर्यटन रंगोत्सव या महोत्सवाची पार्श्वभूमी पाहता आपणास खरोखरच्या रंगात आपली कला सादर करण्याची संधी देखील आम्ही आपणास उपलब्ध करून दिली आहे, ज्यामध्ये संपूर्ण मार्च महिना रेखाटन / चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये विजेत्या पर्यटकांना पर्यटन विभागामार्फत बक्षिसांची लयलूट देखील करता येणार आहे.
प्रथम पारितोषिक :-
रविवार ते गुरुवार प.नि. कुणकेश्वर, औरंगाबाद, बोधळकसा, अजिंठा फरदापुर, वेळणेश्वर, हरिहरेश्वर, पानशेत यापैकी कोणत्याही एका पर्यटक निवासात 02 रात्री, 03 दिवस मोफत वास्तव्य।
द्वितीय पारितोषिक -
रविवार ते गुरुवार प.नि. कुणकेश्वर, औरंगाबाद, बोधळकसा, अजिंठा फरदापुर, वेळणेश्वर, हरिहरेश्वर, पानशेत यापैकी कोणत्याही एका पर्यटक निवासात 01 रात्री, 02 दिवस मोफत वास्तव्य।
तृतीय पारितोषिक-
आपल्या पुढच्या आरक्षणावर 50% सवलत किंवा रु. 1500/- यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल.
उत्तेजनार्थ -
आपण रेखाटलेल्या चित्राचे फोटोफ्रेम करून आमच्या प. नि. सात दर्शनीय ठिकाणी संपूर्ण नावसाहित लावण्यात येईल किंवा आपण इच्छा व्यक्त केल्यास आपण रंगविलेल्या चित्रास आम्ही फ्रेम करून 07 दिवसात पर्यटकांच्या घरी मोफत पाठवून देणार।
तर मग विचार कसला करतायेत, या आणि अनुभवा आपले महाराष्ट्राचे अनमोल पर्यटन - पर्यंटनोत्सव च्या माध्यमातून।
MTDC फॅमिली आपल्या स्वागतासाठी आपली वाट पाहत आहे।
Booking Link : www.mtdcrrs.maharashtratourism.gov.in
Direct Walking Contact to +918657518404