16/08/2017
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐
नमस्कार ,
आज १५ ऑगस्ट २०१७ भारताच्या स्वातंत्र्याचा ७१ वा स्वांतत्र्य दिन सोहळा. खरोखरच या दिवसाचे महत्त्व वर्णावे तेवढे थोडेच कारण याच दिवशी आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतुन स्वातंत्र्य लाभले. त्यामुळे आपण या दिवशी दर वर्षी ध्वजारोहण करुन आपल्या देशाचा सन्मान करतो. तसेच देशाबद्दल असलेल्या प्रेमाचे व अभिमानाचे प्रतिक देतो. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने "स्मायलींग हार्ट सोशल गृप " ने "नवीन समर्थ विद्यालय" या शाळेस भेटी दिली. शालेय विद्यार्थी , शिक्षक, पालकवर्ग , तसेच माजी विद्यार्थी व उपस्थित पाहुणे यांच्यासमवेत ध्वजारोहण साजरे केले. सकाळी ७.३० वाजता ध्वज फडकवण्यात आला. यावेळी वातावरण अत्यंत प्रफुल्लित व आनंददायी असे होते. ध्वजाला सलामी देताना प्रत्येकाच्या मनात देशाभिमानाची ज्योत तेवत होती. त्यानंतर राष्ट्रगीत व प्रतिज्ञा म्हणण्यात आली. याबरोबरच देशभक्तिपर गीतांच्या सुराने चारी दिशा मोहरुन गेल्या. उपस्थित पाहुणे मंडळीनी मग स्वातंत्र्य दिनावर अत्यंत उत्तम व बोधपर असे भाषण केले. त्यानंतर पाहुणे मंडळीचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. स्मायलींग हार्ट सोशल ग्रूपच्या वतीने शाळेतील काही निवडक गरजु विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले. तसेच गृपतर्फे शाळेचे माननीय मुख्याध्यापक यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्यात आले. धन्यवाद.
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐