Velas Homestay

Call Directions

Velas Homestay Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Velas Homestay, danda vadi, Velas.

Its time to see this little wonders🐢🐢
14/03/2020

Its time to see this little wonders🐢🐢

23/02/2020

अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या ऑलिव्ह रिडल सागरी कासवांच्या विणीचा हंगाम कोकण किनारपट्टीवर सुरु झालाय.

'कासवांचे गाव' म्हणून ओेळख मिळालेल्या मंडणगड तालुक्यातील वेळास गावाच्या किनारपट्टीकडे पुन्हा कासवं अंडी घालण्यासाठी येऊ लागली आहेत.

वेळास किनाऱ्यावर 16 फेब्रुवारीपासून 'कासव महोत्सवा'चं आयोजन करण्यात आलंय.

पर्यटन महामंडळाच्या आणि कासवमित्रांच्या माध्यमातून हे अनोखे पाहुणे समुद्रात झेपावताना पर्यटकांना पाहण्याची संधी मिळणार आहे.

आतापर्यंत वेळास किनाऱ्यावर 13 कासवांची घरटी आली असून दिनांक 8 मार्च 2019 पासून कासव महोत्सवाला सुरुवात होत आहे. अधिक माह...
12/02/2019

आतापर्यंत वेळास किनाऱ्यावर 13 कासवांची घरटी आली असून दिनांक 8 मार्च 2019 पासून कासव महोत्सवाला सुरुवात होत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक +918104198668
सुनीता सपकाळ
दांडा वाडी, वेळास.

आमच्याकडे जेवणाची व राहण्याची सोय होईल.

05/05/2018

Enjoy colors of every sunset 😍😍

उकडीचे मोदक ... ते पण आईच्या हातचे .. 😋😋😋😋 #वेळास
15/03/2018

उकडीचे मोदक ... ते पण आईच्या हातचे .. 😋😋😋😋
#वेळास

 #वेळास पासून ५ कि. मी. अंतरावर असलेला बाणकोट हा किल्ला
28/02/2018

#वेळास पासून ५ कि. मी. अंतरावर असलेला बाणकोट हा किल्ला

वेळास कासव महोत्सव ९ मार्च पासून सुरू होत आहे.. Velas turtle festival is starting from 9th March..          contact :Sun...
18/02/2018

वेळास कासव महोत्सव ९ मार्च पासून सुरू होत आहे..
Velas turtle festival is starting from 9th March..


contact :
Sunita Sunil Sapkal
dandavadi, velas
Tal-mandangad
District- Ratnagiri
mobile-72186 87989

13/02/2018

नुकतीच जन्मलेली कासवांची पिल्ले समुद्राच्या पाण्याकडे धाव घेतात आणि त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात करतात. हे मनमोहक दृश्य पाहायला नक्की वेळास ला भेट द्या.
#वेळास

Are you ready for kokani cuisine .. Yes we are here to provide you homestay and konkani cusine with amazing site seeing....
05/02/2018

Are you ready for kokani cuisine .. Yes we are here to provide you homestay and konkani cusine with amazing site seeing..


contact us:
Sunita Sapakal
danda vadi, velas
mobile : 7218687989

02/02/2018

*निसर्गरम्य वेळास*

केवळ अंडी घालण्‍यासाठी मोठया संख्‍येने येणाऱ्या कासवांमुळे अमाप प्रसिध्‍दी मिळालेले कोकणातील हे छोटेसे गाव - वेळास. किनाऱ्यावर अंड्यातून बाहेर पडणारी कासवांची छोटी पिल्‍ले जेव्‍हा अरबी समुद्राची वाट धरतात तेव्‍हा ते दृश्‍य अत्‍यंत नेत्रसुखद असते. हा सोहळा पाहण्‍यासाठी जगभरातून लोक इथे हजेरी लावतात. चला तर भेट देऊ वेळासला, प्रत्यक्ष त्‍या सोहळ्याचे साक्षीदार व्‍हायला.. !!

कुठे आहे हे कासवांचे वेळास?
रत्‍नागिरी जिल्‍ह्यात मंडणगड तालुक्‍यात वसलेले हे वेळास गाव तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेले दिसते. तर गावाच्‍या एका बाजूला नयनरम्‍य समुद्रकिनारा आहे. हे गाव पेशवाईतील मुसद्दी नाना फडणवीसांचे जन्‍मगाव. म्‍हणून याला ऐतिहासिक महत्वही आहे.
कोकणातील कुठल्‍याही गावाप्रमाणेच भात, नारळ, सुपारी, काजू आणि आंबा ही याही गावाची उत्‍पन्‍नाची मुख्‍य साधने आहेत.
Olive Ridley या प्रकारची ही कासवे वेळास येथे समुद्रकिनारी अंडी घालायला येतात. या कासवांचे एक वैशिष्‍ट्य असे की खूप मोठ्या संख्‍येने ती किनाऱ्याजवळ एकत्र जमतात आणि एकदम किनाऱ्यावरच रेतीमध्‍ये अंडी घालतात. अंदाजे ४५-५५ दिवसांनी त्‍या सोनेरी वाळूतून हे जीव बाहेर पडतात आणि समुद्राकडे परत वाटचाल करू लागतात. फेब्रुवारी - मार्च महिन्‍यात इथे दरवर्षी 'सह्याद्री निसर्ग मित्र' आणि 'कासव मित्र मंडळ' या दोन संस्‍था एकत्रितपणे कासव महोत्‍सव आयोजित करतात. २००१ पासून 'सह्याद्री निसर्ग मित्र'(SNM) या संस्‍थेने वेळास येथे या कासवांसाठी एक उपक्रम सुरू केला आहे. त्‍यामुळेच माणसांच्‍या कोणत्‍याही उपद्रवाशिवाय कासवांचा हा अंडी घालणे ते त्‍यातून पिल्‍ले बाहेर पडण्‍याचा काळ नैसर्गिक‍रीत्‍या पार पडायला मदत होते. कासवांची सर्व अंडी उबावीत आणि सर्व पिल्‍ले समुद्रात सुरक्षितपणे परत जावीत या हेतूने 'सह्याद्री निसर्ग मित्र'(SNM) आणि'कासव मित्र मंडळ' ही स्‍थानिक संस्‍था कार्यरत आहेत. गेल्‍या काही वर्षापासून या संस्‍था महाराष्‍ट्रातील जवळपास ३६ गावात हा उपक्रम राबवीत आहेत. अंदाजे ६८१ घरटी वाचवून त्‍यातून बाहेर पडलेली ३०४६५ पिल्‍ले समुद्रात परत सोडण्‍यात त्‍यांना यश मिळाले आहे.
रेतीत सुमारे दोन फूट लांबीचा खड्डा करून मादी कासवे त्‍यात अंडी घालतात. रेतीने तो खड्डा बुजवून त्‍या समुद्रात परत जातात. वर उल्‍लेख केलेल्‍या संस्‍था त्‍या खड्डयातून ती अंडी बाहेर काढून त्‍यातून पिल्‍ले बाहेर पडेपर्यंत त्‍यांची योग्‍य ती काळजी घेतात. ही पिल्‍ले किनाऱ्यावर परत सोडली जातात, ती एका विशिष्‍ट वेळी (सकाळी ७ आणि संध्‍याकाळी सव्‍वाचारच्‍या दरम्‍यान.) कारण यावेळी रेतीचे तापमान पिल्‍लांना समुद्रात परत जाण्‍यासाठी हितकर ठरते.
मुंबईपासूनचे अंतर २१३ किमी.
पुण्यापासूनचे अंतर 196 किमी.
कसे जाल?

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेस पुणे व मुंबई पासून उपलब्ध आहेत.
वेळास च्य वाटेवर आपल्याला छोटेखानी दोन किल्ल्यांचे देखील दर्शन होते एक मंडणगड आणि दुसरा बाणकोट चा हिम्मतगड दोन्ही किल्ले अप्रतिम आहेत.

तुम्ही जर वेळास ला येण्याचा विचार करत असाल तर आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या राहण्याची व जेवणाची सोय करतो.
संपर्क क्रमांक :-

सुनीता सुनील सपकाळ
दांडावाडी, वेळास
तालुका - मंडणगड
जिल्हा - रत्नागिरी
मोबाईल - +91-7218687989

Must visit ..  🐢🐢🐢🐢🐢
26/01/2018

Must visit .. 🐢🐢🐢🐢🐢

Address

Danda Vadi
Velas
415208

Telephone

+918104198668

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Velas Homestay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share